नवीन लेखन...

‘सिमटी हुई ये घडियां’ – नात्यांचा लेखाजोखा !

सांगलीत वालचंदला असताना आम्ही “चम्बल की कसम ” नामक एक पडेल चित्रपट पाहिला तो खय्याम आणि साहिर या जोडगोळीच्या एका हळुवार प्रेमगीतासाठी ! अन्यथा राजकुमार, त्याला प्रतिकूल मौशुमी आणि होडीवाला ठोकळा शत्रुघ्न असलं कॉम्बिनेशन बघणं नजरेला फारसं आल्हाददायक नव्हतं. (अर्थात त्याकाळी तोंडाला तितकीशी चव डेव्हलप नसल्याने आम्ही होस्टेलधारी टाईमपास साठी कोठलाही चित्रपट पाहात असू हा भाग वेगळा !)
पण हे गाणं रेडिओवर लागलं आणि आम्ही गानप्रेमी मंडळी लता/रफीच्या प्रेमस्वरांनी भारावून गेलो. साहिरचे शब्द जसजसे कानी पडू लागले आणि आतवर पसरले तसतसे आम्ही आणखी भारावलो.
पडद्यावर बोटीतील राजकुमार-मौशुमी आणि गाण्याच्या पार्श्वभूमीला अत्यंत तरल वातावरण !
आज फक्त शब्दांचा आस्वाद आणि भाष्य ( स्वर/ताल/लयीसाठी मूळ गाणे अवश्य ऐकावे)
सिमटी हुई ये घड़ियाँ
फिर से न बिखर जाएँl
इस रात में जी ले हम
इस रात में मर जाएँ ll
(आजकाल आपणही याच टप्प्यावर आहोत. हातातील सारं ओघळण्यापूर्वी ते पुनःपुन्हा जगून घ्यावंसं वाटतंय. याला समांतर भावना – ” जाते हुए ये पल छिन ” ! पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी)
अब सुबहा न आ पाये
आओ ये दुआ मांगेl
इस रात के हर पल से
राते ही उभर जाएँ ll
(सकाळ होऊच नये ,या सहवासाच्या रात्रीतून नवनव्या रात्री उगवाव्यात. प्रेमिकांची ही वैश्विक मागणी असते. पुन्हा अपवाद- शन्नांची “शहाणी सकाळ “)
दुनिया की निगाहें अब
हम तक न पहुँच पायें l
तारो में बसे चलकर
धरती में उतर जाएँ ll
(जमिनीवर पाय रोवले तरी ताऱ्यांची तमन्ना आहेच, कारण इथे लोकांच्या नजरांचे असह्य पहारे सदोदित असतात. परत एकदा “पाकिझा “- चलो दिलदार चलो l “)
हालात के तिरो से
छलनी है बदन अपने l
पास आओ के सिनो के
कुछ ज़ख्म तो भर जाएँ ll
(किती घायाळ विनवणी आहे ही ! परिस्थितीचे बाण – “हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे” हाच सार्वत्रिक अनुभव प्रेमिकांना येत असतो. मग प्रेयसीचा स्पर्श हाच मलम , थोडेफार तरी घाव भरण्यासाठी)
आगे भी अन्धेरा है
पीछे भी अन्धेरा है l
अपनी है वही साँसे
जो साथ गुज़र जाएँ ll
(प्रेमिकांना अंधाराची सवय असली तरी तमा नसते. श्वासांची साथ पुरेशी ! ती सोबतीला कायम असणार याची खात्री असते.)
यापुढील दोन कडव्यांमध्ये गीताचा भाग दोन आहे तोही तितकाच रुहानी आहे. मात्र विस्तारभयास्तव त्यांचे रसग्रहण तुमच्यावर सोपवतो. जरूर ऐका.
साहिरचे शब्दप्रभुत्व आणि अगदी सोपी शब्दरचना जीवघेणी आहे. खय्यामने तब्येतीत , निवांत गोडवा ओतलाय चालीत !
लता-रफी अशा गाण्यांचे सोने करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. जणू ते टपून बसले असावेत.
विरहानंतरची प्रेमभेट भलेही अवघडलेल्या राजकुमारला (हा त्याचा प्रांत कधीच नव्हता) व्यक्त करता आली नाही तरी ती प्रेमभावना गायकांनी यथायोग्य पोहोचविली. एक श्रवणीय, रसरशीत गाणं आपल्याला अंतर्बाह्य स्पर्शून जातं.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..