नवीन लेखन...

माझे खाद्यप्रेम – २

साधारणपणे ज्या लोकांना चवीने वेगवेगळ्या गोष्टी खाण्याची सवय आहे त्यांना खाऊ घालण्याची सवय सुद्धा असते, किंबहुना ती असावी. वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालण्यात एक वेगळीच मजा आहे अर्थात ती स्वत: अनुभवावीच लागते, तिचा देखावा करून चालत नाही. तस पाहिलं तर आज जग खूप पुढे गेलय त्यामुळे आज अनेक जणांना जेवण करता आलच पाहिजे ही बाब पटेनाशी झाली आहे. स्वतःचा चहा देखील करता न येणारी आज समाजात अनेक माणसे आहेत. अर्थात त्यांना ह्या गोष्टीची लाज नव्हे तर भूषण वाटत.

पण त्या त्या सर्वांनी एक कला म्हणून तिचा आस्वाद घ्यायला काहीच हरकत नाही.अनेक पदार्थ असतात जे आपणाला माहीत नसतात असे पदार्थ स्वतः करून खाऊ घालणं ह्या सारख ते सुख नाही.पूर्वी गृहिणीला एखादा पदार्थ माहीत नसला तर त्या त्यांच्या शेजारी किंवा जिला येतो अशा गृहिणींकडून लिहून घेत आणि मग तो बनवत,पण आज मात्र इंटरनेट वर अगदी कोणत्याही संस्कृती चा पदार्थ आपण कसा बनवायचा ते पाहू शकतो.अगदी अमेरिके पासून ते जर्मन,इटली,फ्रांस येथील खास पदार्थ करता येण सहज शक्य आहे.मग एखादा पदार्थ करताना जर काही चुकलं आणि त्यातून एखादा वेगळाच पदार्थ निर्माण झाला तरीही त्या आनंदात किंचितही फरक पडत नाही उलट तो वाढतोच.साधारणपणे घरातील गृहिणी ही ह्या गोष्टीत पारंगत असायलाच हवी पण त्याचप्रमाणे पुरुषांनीही मोकळ्या वेळात विरंगुळा म्हणून ह्या कलेचा आस्वाद घेऊ शकता.

आमच्या कुटुंबात वास्तविक सर्व पुरुषांना खाणं हा विषय अत्यंत लाडका आहे (खाणं करण ही आणि खाण ही) त्यामुळे हेच संस्कार माझयातही आहेत.आणि जो माणूस खवय्या आहे त्याला खाण्यासाठी कुठंचही बंधन आडवं येत नाही तसच खाणं बनवण्यासाठी देखील हाच नियम लागू होतो.मला अनेकदा रिकाम्या वेळात नवनवीन पदार्थ करायला आणि खाऊ घालायला फार आवडतात. दडपे पोहे ,चिवडा,भडंग ,भेळ इत्यादी ह्या पदार्थांची रेलचेल आमच्याकडे अनेकदा पहायला मिळेल.ह्या पदार्थाना त्यांचं अस एक अस्तित्व आहे.साधारणपणे सकाळच्या नाश्त्याच्या वेळी चिवडा हा अनेकदा उपयोगी ठरतो.त्याचा स्वतःच्या अशा चवीमुळे अनेकदा गृहिणींना नाश्त्याच्या झंझटीतून तो सहज सोडवतो.सकाळी सर्वांना अगदी मोठ्यांपासून लहानपर्यंत कागदावर एकेक मूठ वाढून वरती कांदा,खोबर,फरसाण पसरलं की बायका दुपारच्या जेवणाला लागतात.थोडक्यात काय तर बायकांचा हा सच्चा मदतनीस आहे.अगदी ह्याचप्रमाणे ह्याच्या आधीपासूनच अस्तित्वात असेलला नाष्टा म्हणजे पातळभात किंवा माऊभात गावठी भाषेत खिमट म्हणून ह्याला पुष्कळ मान आहे अगदी आजारी माणसापासून ते कामावर किंवा शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यास अगदी पोटभरीचा ठरतो.माउभात वरती तुपाची धार ,मेतकूट आणि आंब्याचं लोणचं ह्याच्याशी त्याच चांगलं मेतकूट जुळलेलं आहे.त्यानंतर भडंग किंवा भेळ हे सारखेच ह्यांना वेगळं अस्तित्व नाही कारण भडंग मध्ये कांदा,टॉमेटो,खजुरपाणी टाकून तो भडंग, ती म्हणून ताटात येतो.ह्याची खरी मजा संध्याकाळी.झाडांना पाणी घालून आल्यावर,भाजी घेऊन आल्यावर जर ही समोर आली आणि सोबत चहा आला तर ती संध्याकाळ अविस्मरणीय बनते ह्यात तसूभरही शंका नाही.मग येतात ते दडपे पोहे हे अनेकदा रात्र पाळीवर असतात.एखादा कार्यक्रम झाल्यावर किंवा पत्ते वैगेरे खेळताना खेळ रंगात आल्यावर त्यात आणखी रंगाची बरसात करण्याची सर्वस्वी जबाबदारी ह्यांची असते अर्थात ह्यात चहा हा या सर्वात सहकार्याची भूमिका नेहमीच बजावतो.एखाद्या यज्ञाचा शेवट जसा पूर्णाहुती ने होतो अगदी तसच ह्या क्षुधा नामक यज्ञाची पूर्णाहुती म्हणजे चहा.अशाच प्रकारे काही पदार्थ हे लहरी ह्या प्रकारात मोडतात.थोड्यक्यात आली लहर आणि केला कहर अस त्यांचं ब्रीदवाक्य च असत.ह्यामध्ये तुम्हाला बरीच मुभा आहे कारण तुम्हाला कशाची लहर येईल हे थोडीच सांगता येणार आहे.माझ्या शेजारी एक आचारी राहायचे घरोघरी नाना तर्हेचे पदार्थ अगदी फक्कड बनवायचे त्यांची स्पेशालिटी होती ती मात्र जिलबीत, पण म्हणतात पिकतं तिथे विकत नाही त्याचप्रमाणे ह्यांना डायबिटीस मुळे ह्या पदार्थाची चव चाखण कठीणच.पण खरा आचारी त्यामुळे खवय्येपणा नसानसात च भिनलेला
एकदा आम्ही सारे जमलो असता अचानक संध्याकाळी लहर अली म्हणून ह्या माणसाने जिलब्या करून आम्हाला देऊन बिनधास्त रेटवल्या.ह्याला खरा खवय्या म्हणतात.पण तशी काळजीही घेता आली पाहिजे.

थोडक्यात ह्या साऱ्याची नशा ही मात्र बेधुंद असते ज्यातून फक्त आनंद आनंद आणि आनंद च मिळतो…

P3 coming soon

©® तेजस नारायण खरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..