नवीन लेखन...

रोड टू संगम – ही पण बाजू !

साधारण हीच सकाळची वेळ ! ब्रेकफास्ट आटोपून दुसऱ्या चहाची वाट पाहात असताना सहज टीव्ही च्या रिमोटची खुंटी पिरगाळली. स्टार गोल्डवर ” रोड टू संगम ” पाटी दिसली. नांव न ऐकलेले पण ओम पुरी व परेश रावल (सोबतीला काही मराठी नांवे – राजन भिसे, स्वाती चिटणीस वगैरे) ! चहा होईपर्यंत बघावा म्हटलं आणि पडदयावर नजर चिकटली. पूर्ण चित्रपट इलाहाबाद (अजून प्रयागराज नामकरण नव्हतं झालेलं ) . परेश एक “मुस्लिम ” मेकॅनिक – हाताला अपयश नसलेला  ! कोणतेही इंजिन दुरुस्त करण्यात हातखंडा ! त्याच्याकडे एक ६० वर्ष न वापरलेलं इंजिन येत दुरुस्तीला !! तो आणि त्याची टीम लागते कामाला.

दरम्यान एका प्रसंगावरून तकलादू असलेले हिंदू-मुस्लिम संबंध थोडे खिळखिळे होतात. या देशात त्याला काहीही कारण पुरते. लगेच मौलवी ( पंकज मल्होत्रा ) आणि समाजधुरीण (ओम पुरी ) निर्णय घेतात – ” १४ दिवस दुकाने बंद !! शासनाला इंगा दाखवायलाच पाहिजे- आमच्याकडे दुर्लक्ष्य करता म्हणजे काय?”

Wisdom  Prevails म्हणतात तसं – सुबुद्ध परेश सगळ्यांना अजीजीने विनवतो- आपली पोटं हातावर आहेत  तेव्हा पुनर्विचार करा . कोणी ऐकायच्या मूडमध्ये नसतं.

परेशला काळजी – हाती घेतलेलं इंजिन दुरुस्तीचं काम वेळेवर व्हावं ! ” अपने काम को मैं इबादत मानता हूँ ! ” अशी त्याची जडण घडण ! तसा तोही कमिटीचा जनरल सेक्रेटरी, पण त्याला आधार मिळत नाही.

अचानक एक दिवस एन डी टी व्ही वाले त्याची मुलाखत घ्यायला येतात. त्याला माहित नसलेली एक बातमी सांगतात- गांधीजींचा एक अस्थिकलश बँकेच्या लॉकर मध्ये ठेवल्याने विस्मरणात गेलेला. गांधीजींचे पणतू – तुषार गांधी त्याचे ( उशिरा का होईना ) विधिपूर्वक संगमात विसर्जन व्हावे या मताचे ! मग त्याच इतमामात , त्याच जुन्या गाडीतून (जिचे इंजिन परेशकडे तातडीने दुरुस्तीसाठी आलेले असते) तो कलश मिरवणुकीने जावा असे नियोजन असते.

आता विचारी परेश पुन्हा संघटनेकडे जातो आणि सगळ्यांना विनवतो- “किमान मला तरी दुकान उघडायची परवानगी द्या. त्या महात्म्याचे काम मला करू द्या. ” फलस्वरूप त्याच्यावर फर्मान , बहिष्कार, धक्काबुक्की, “कौम ” वगैरे !

प्रवाहाविरुद्ध आतला आवाज ऐकून तो दुकान उघडतो. दुरुस्तीचे काम सुरु करतो. दरम्यान संग्रहालयात जाऊन गाडी बघून येतो. त्याचा बंगाली डॉक्टर मित्र खंबीरपणे त्याच्यामागे उभा ! ” बापूंची माफी मागणाऱ्या हजारो हातांमध्ये माझेही दोन हात असू द्या म्हणणारा “.

मौलवींच्या शिक्षांना तोंड देत परेश त्यांना सुनावतो – ” माझ्या अल्लाशी माझी जेव्हा भेट होईल , तेव्हा मला मध्यस्थ लागणार नाहीत. ”

एकेकाला परेश हातोटीने आपल्या बाजूने वळवतो – त्यांच्या आतल्या स्वराला आवाहन करतो.

देखते देखते कारवा बन जाता हैं !

शेवटी तो ओम पुरीलाही समजावतो. ( मौलवीला वगळून – for obvious reasons ) फाळणीच्या जखमा आणि पूर्वेतिहास यामुळे हिंदूंवरचा विश्वास उडालेला ओम पुरी शेवटी तयार होतो. भारत आणि इथल्या चांगल्या गोष्टींकडे परेश त्याचे लक्ष वेधतो.

आणखी एक- परेश संग्रहालयाच्या क्युरेटर ला विनंती करतो , मिरवणूक आमच्या “वस्ती ” तून न्या. आम्हांलाही त्या महात्माच्या अस्थींचे दर्शन घेऊ द्या.

इंजिन दुरुस्त होते. सगळे परेशच्या आवाहनाला प्रतिसाद देतात. तो मोहल्ल्यात सांगतो- दरवेळी बारीक सारीक कारणांनी दुकाने बंद ठेवणारे आपण , आज जेव्हा मिरवणूक जाईल तेव्हा आपली दुकाने बंद ठेवून त्या महात्म्याला वंदन करू या. हे पण सगळ्यांना पटते.

गावातील रस्ते जरी वेगळ्या वेगळ्या मार्गांनी संगमाकडे जात असतील तरी त्यादिवशी मात्र सर्व धर्मीय एका “रोड ” ने  संगमाकडे जातात.

नंतर मी यू ट्यूब वर शोध घेतला. २००८-०९ चा हा चित्रपट अनुल्लेखाने मारला गेला असावा.

माझी उतरंड अशी आहे –

नसीर पहिला , ओम पुरी दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकावर  परेश रावल आणि अनुपम खेर ! या चित्रपटात मात्र परेश एक पायरी वर चढून माझ्या यादीत दुसरा आला.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 40 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर नऊ पुस्तके ( ६ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..