नवीन लेखन...

रिव्हर ऑफ नो रिटर्न

काही जुन्या सिनेअभिनेत्री, या सौंदर्यांचं परिमाण समजल्या जात होत्या. जशी हाॅलीवुडची मर्लिन मन्रो, बाॅलीवुडची मधुबाला व मराठीतील जयश्री गडकर! या तिघींनीही आपल्या सौंदर्याने, रसिक प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं.

मर्लिनचा जन्म १ जून १९२६ रोजी, लाॅस एंजलिस येथे झाला. तिचं बालपण मात्र अनाथाश्रमात गेलं. नंतर अकरा पालकांनी तिचा सांभाळ केला. वयाच्या सतराव्या वर्षापासून तिनं माॅडेलिंग सुरु केलं. १९४६ साली तिनं चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. चार वर्षांच्या परिश्रमानंतर तिला प्रसिद्धी मिळू लागली.१९५३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नायगारा’ चित्रपटाने ती प्रकाशझोतात आली. १९५५ मधील तिच्या ‘सेव्हन इयर इच’ या चित्रपटाने तुफान व्यवसाय केला. याच चित्रपटावरुन ‘सखी शेजारिणी’ हे मराठी नाटक बेतले होते. १९५९ सालातील ‘समलाईक इट हाॅट’ या चित्रपटाने तिला सर्वोच्च असा ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ मिळवून दिला.

१९४९ साली मर्लिनने एक न्यूड फोटोशूट अवघ्या ५० डाॅलरमध्ये केले होते. त्याचे फोटो १९५३ साली सुरु झालेल्या ‘प्लेबाॅय’ मासिकात झळकले. तिच्या एका चित्रपटात हवेने उडणाऱ्या स्कर्टचे चित्रीकरण झालेले होते. त्या दृष्याचे अनुकरण जगातील कित्येक नायिकांनी केले मात्र त्यांना, मर्लिनची सर काही आली नाही. २०११ साली झालेल्या एका लिलावात मर्लिनचा तो स्कर्ट, ५० लाख डाॅलरला विकला गेला! तिने आपले सौंदर्य टिकवण्यासाठी हनुवटी व नाकावर प्लॅस्टीक सर्जरी करुन घेतली होती. त्या सर्जरीच्या वैद्यकीय कागदपत्रांना लिलावात २५,६०० डाॅलर, एवढी मोठी किंमत मिळाली.

मर्लिनच्या डाव्या गालावरील नैसर्गिक तीळ, तिच्या सौंदर्यात भर घालत होता. तसाच तीळ अनेक स्त्रियांनी त्याकाळी आपल्या गालावर, गोंदवून घेतला होता. ३६ वर्षांच्या आयुष्यात तिने तीन वेळा लग्न केले. १९६२ साली जाॅन केनेडी यांच्या वाढदिवसानिमित्त तिने ‘हॅपी बर्थडे.’ हे गाणं गायलेलं होतं. त्याबद्दल केनेडी यांनी तिचे आभार मानले होते. आयुष्याच्या शेवटी तिला आजारपणाने पछाडले होते. निद्रानाशाचा विकार जडला होता. ५ ऑगस्ट १९६२ च्या रात्री तिने झोपेच्या गोळ्या जास्त प्रमाणात घेतल्यामुळे सकाळी, ही सोनेरी केसांची राजकन्या अचेतन झालेली होती.

मर्लिन आणि मधुबाला या दोघींमध्ये साम्य असणाऱ्या काही गोष्टी. दोघीही सौंदर्यसम्राज्ञी!! दोघींचेही बालपण हलाखीत. लग्न करुनही, सुखापासून वंचित. दोघीही अवघ्या ३६ वर्षांच्या अल्पायुषी. मृत्यूसमयी आजारपण. दोघींचही खळाळतं हास्य, पहाणाऱ्याला चैतन्यमय करणारं.

तिचा ९६वा जन्मदिवस! तिचं हसणं, हे एका खळाळत्या पाण्यासारखं होतं. तो खळाळता प्रवाह साठ वर्षांपूर्वी, समुद्रात विलीन झाला. जणू काही ‘रिव्हर ऑफ नो रिटर्न’ या तिच्या गाजलेल्या चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणेच.

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

१-६-२२.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..