प्रसिद्ध लेखक राजेंद्र खेर

प्रसिद्ध लेखक राजेंद्र खेर यांचा जन्म ३ जानेवारी १९६१ रोजी झाला. राजेंद्र खेर हे, आपले आजोबा द. म. खेर आणि वडील भा. द. खेर यांच्या लेखनाचा वारसा पुढे चालवणारे लेखक म्हणून ओळखले जातात. एक विशेष योगायोग म्हणजे ‘हॉलिवूडचे विनोदवीर’ हे त्यांचं पहिलं पुस्तक त्यांच्या वडिलांच्या, भा. द. खेरांच्या ‘पूर्णाहुती’ या १०० व्या पुस्तकाच्या प्रकाशानाच्या सुमारासच प्रसिद्ध झालं होतं! त्यांच्या पुस्तकांचे इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषांमधून अनुवाद झाले असून अलीकडच्या यशस्वी साहित्यिकांमध्ये त्यांची गणना होते. त्यांची जवळपास सर्व पुस्तकं रसिकमान्य ठरली आहेत.

बिंदुसरोवर, देह झाला चंदनाचा, देवांच्या राज्यात, धनंजय, दिग्विजय, गीतांबरी, दी साँग ऑफ सॅल्व्हेशन, उदयन अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. राजेंद्र खेर यांचे पांडुरंगशास्त्री आiठवले यांच्या जीवनावरचे ‘देह झाला चंदनाचा’ हे पुस्तक, त्याच्या १९ आवृत्त्या निघाल्या, त्याचे गुजराती, हिंदी आणि इंग्रजीत भाषांतरे ही झाली. यातील गुजराती अनुवादाची दहावी आवृत्ती, हिंदी अनुवादाची दुसरी आवृत्ती, इंग्रजी अनुवादाची दुसरी आवृत्ती, असं लखलखतं यश लाभलेलं पुस्तक आणि त्याचा लेखक राजेंद्र खेर हा वेगळाच विक्रम आहे.

राजेन्द्र खेर यांनी आजपर्यंत महाभारताचे वास्तव दर्शन, महाभारतातील अतर्क्य, प्राचीन विचार आणि आधुनिक आचार, मृत्यूनंतरचे जीवन आणि परलोकांचं स्वरूप, आद्य क्रांतिकारक भगवान श्रीकृष्ण, भग्वदगीतेची वैश्विकता, देव हे परग्रहावरील अतिमानव होते? अश्या विविध विषयांवर जवळपास ४०० व्याख्यानं दिली आहेत. राजेन्द्र खेर यांची स्वताची विहंग प्रकाशन या नावाने प्रकाशन संस्था आहे. चार भाषांमध्ये उत्तमोत्तम पुस्तकं प्रकाशित करण्याचा लौकिक या संस्थेनं मिळवला आहे. अनेक वेबसाइट्सवरून विहंग प्रकाशनाच्या पुस्तकांची जगभर विक्री होते.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2183 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…