नवीन लेखन...

परिसस्पर्श… (मी आणि ती कथा)

आज नेहमीप्रमाणे आमदार निवासासमोर
चहा पीत टाईमपास करत होतो,
सगळे पांढरे कपडेवाले ये-जा करत होते,
गावोगावचे लोक मंत्रालयात जाऊन येतो
म्हणून डिंग मारून आपापल्या विभागातून
तेथे येत होते आणि तेथेच कटींग आणि वडापाव
खात उभे राहून साहेबांच्या गप्पा मारत होते.
त्या विभागात साहेबाच्या डायव्हरलाही
लई भाव..साहेब ‘ चा पिता का ‘ , ..पासून..बरेच काही
ते विश्वच वेगळे होते, त्यात गरीब गाववाले होते,
भल्या मोठ्या गाड्या घेऊन येणारेही होते..
त्या सर्वांचे चेहरे एकच सांगत असतात ..
मला काहीतरी हवे आहे..
देणारा बसलाय ना..
तेथे पांढऱ्या कपड्यात…
इतक्यात मला ती दिसली..
गावाकडे पहिली होतो..
आता ओळखू येत नव्हती..
कोणत्या साहेबाची , कृपा ‘ झाली कोण जाणे.
मी तिच्या समोरच होतो…
तिनेही रोखून बघीतले आणि मला ओळखले..
तू इकडे…
अरे मी तुला म्हणतोय तू इकडॆ कशी…
तुझा नंबर दे , मी कॉल करते..
वरती अपॉइंटमेंट आहे..येतेच..
ती नंबर घेऊन निघाली.
मी म्हणालो आयला काय बदल झाला आहे हिच्यात ..
गावात पार काकूबाई होती.
कुणाचा एवढा ‘ परिसस्पर्श ‘ झाला कोण जाणे.
दुपारीच फोन आला .
आम्ही संध्याकाळी नरिमन पॉइंटला भेटण्याचे ठरवले.
आली तिची गाडी घेऊन.
आत्ता ड्राइव्हर नव्हता.
काय ग गावातून एकटी आली ड्राईव्ह करत.
नाही रे त्याला सांगितले जा…
मजा कर…उगाच बोबाबोब नको..
बोबाबोब…तुला नाही कळणार.
तू काय करतोस , इथेच आहे बाजूच्या बिल्डिंगमध्ये
प्रोग्रॅम डायरेक्टर आहे..
तू काय करतेस..
मी आपल्या गावात ‘ सोशल वर्क ‘ करते..
‘सोशल ‘ ह्या शब्दावर ती जोर देउन म्हणाली.
त्या एक उच्चारात समजले..
मी चावटपणे म्हणालो जितके सोसेल तितकेच ना…
कळले तुला काय म्हणावयाचे ते…
तशी हसली..सगळे समजून गेले..
कॉलेजमध्ये असताना खूप भटकत असायचो ,
आमचा वेगळा ग्रुप होता.
पण ती आणि मी नेहमी एकत्र असावायचो.
तू कशी काय ह्या क्षेत्रात…
माझा नवरा बिझनेसमन आहे…
त्याची बरेच कामे असतात ..
मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट आहेत त्याच्याकडे…सरकारी.
मग तिच्या बोलण्यातूनच सगळे कळू लागले..
त्याच्या दुर्ष्टीने ती ‘ आयटम ‘ म्हणजे वस्तू होती…
मग तिनेही ठरवले आपण नवऱ्याला पण ‘ वस्तू ‘ बनवायचे..
दोन्ही ‘ वस्तू ‘ एकत्र आल्या होत्या…
काय गम्मत आहे ..
तू कुठे राहतोस इथेच बांद्र्याला,
दोन फ्लॅट्स आहेत एक बांद्रा , एक बोरिवली.
फॅमिला बांद्रा..बोरिवली असाच घेऊन ठेवला आहे ..
‘ सेकण्ड होम ‘ म्हणून या वेळी..
मी मुद्दामच ‘ सेकण्ड ‘ या शब्दावर
जोर दिला …ती समजली..
खुप गप्पा झाल्या…
परवा शनिवार आहे…मी बोरिवलीतच आहे…
भेटणार का तुझ्या ‘ सेकण्ड होम ‘ मध्ये…
मी एकदम फ्लॅट…
तशी ती हसली..
नाही जरा..
बसू ..गप्पा मारू ..
असे मित्र आता नाहीत रे…
मी मनाशी जुळवाजुळव करत होतो..
बायकोला काय ‘ फेकावी ‘ ते…

सतीश चाफेकर. 

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..