नवीन लेखन...

२६/११ दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानचा खरा चेहरा उघड होणार

Pakistan Getting exposed in 26/11 Attacks

१० डिसेंबरला मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सुत्रधार डेव्हिड हेडलीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी त्याने शिक्षा माफ झाली तर माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचे कोर्टात सांगितले. त्यानंतर कोर्टाने त्याला माफी देऊन माफीचा साक्षीदार बनविले.

मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील गुन्ह्यांची कबुली त्याने दिली. यावेळी त्याने शिक्षा माफ झाली तर माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचे सांगितले. दरम्यान याप्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तपास अधिका-यांसोबत सल्ला-मसलत करण्यासाठी काही वेळ मागितला. त्यानंतर त्याला कोर्टाने माफी देऊन माफीचा साक्षीदार बनविण्याचा निर्णय घेतला. डेविड हेडली हा लष्कर-ए-तयब्बाचा या दहशतवादी संघटनेचा सदस्य असून मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अमेरिकेतील तुरुंगात तो ३५ वर्षांची शिक्षा भोगत आहे.

हेडली ४ अटींवर माफीचा साक्षीदार बनला

26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड कोलमन हेडली माफीचा साक्षीदार झाल्याने पाकिस्तानचा खऱा चेहरा उघड होणार आहेत.मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटाची माहिती जगासमोर येणार असून पाकिस्तान आणि आयएसआयचं पितळ उघड पडणार आहे.कारण मुंबई हल्ल्यातील एक प्रमुख आरोप डेव्हिड कोलमन हेडली माफीचा साक्षिदार बनला आहे.हा हल्ला कोणी ? आणि कसा केला ? त्याचं षडयंत्र कोणी रचलं होतं? हे सगळं काही उघ़ड होणार आहे. अमेरिकेच्या ताब्यात असलेला हे़डली भारतीय कोर्टाला ही सगळी माहिती देणार आहे.

मुंबई सत्र न्यायालयात सुरु असलेल्या २६/११ च्या खटल्यात हेडली ४ अटींवर माफीचा साक्षीदार बनला आहे. जकीउर रेहमान लखवी, अबू जुंदाल आणि डेव्हिड हेडली हे तिघेजण 26/11 च्या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार असल्याचं तपासात उघड झालं आहे.भारताने अमेरिकेकडे डेव्हिड हेडलीला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी केली होती. तो अमेरीकन नागरीक असल्याने आणि त्याने स्वत: गुन्हे कबुल केल्याने अमेरिकेने हेडलीला भारताच्या स्वाधीन करण्यास नकार दिला. मात्र भारत सरकारच्या पाठपुराव्यामुळे त्याची व्हिडिओ कॉन्फर्न्सिंग द्वारे साक्ष घेणे शक्य झाले. जकीउर रेहमान लखवीचे पाकिस्तान सरकार, आयएसआय आणि लष्कर ए तैय्यबाशी असलेले संबंध उघड होणार आहेत. या दहशतवादी हल्ल्यातील फरार आणि संशयीत आरोपींची माहिती मिळणार आहे. हेडलीच्या साक्षीचे अनेक फायदे या खटल्यासाठी होणार आहेत.

चार अटी

१) मुंबईवर झालेल्या २६/११ या दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील सर्व माहिती तुला सांगावी लागणार.
२) २६/११ दहशतवादी हल्ल्यातील तुझी काय भूमिका होती.
३) २६/११ च्या हल्ल्यातील सर्व संशयीतांबद्द्ल तू विशेष न्यायालयाला सर्व माहिती द्यायची. जी तू अमेरिका न्यायालयाला दिली आहेस ती.
४) तू माफीचा साक्षीदार झाल्यास तुला विशेष सरकारी वकील सुनावणी दरम्यान जे प्रश्न विचारतील त्याची सर्व खरी आणि स्पष्ट उत्तरे द्यावी लागतील.

इशरत जहां लष्कर ए तोयबाची आत्मघातकी दहशतवादी हल्लेखोर

गुजरात पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मारली गेलेली इशरत जहां ही लष्कर ए तोयबाची आत्मघातकी दहशतवादी हल्लेखोर होती. इशरत हिला लष्करच्या मुजामिल यानं आपल्या ग्रुपमध्ये सामील केलं होतं.मुंबई दहशतवादी हल्याचा मास्टरमाईंड डेव्हिड हेडली यानं एनआयए आणि विधी विभागाच्या टीमला शिकागोमध्ये ही माहिती दिली. हेडलीच्या या खुलाशानंतर गुजरात पोलीस आणि केंद्राच्या भूमिकेला पृष्टी मिळाली. इशरत 15 जून 2004 रोजी जावेद शेख ऊर्फ प्रणेश पिल्लई आणि पाक तरुण अमजद अली आणि जीशान जोहर अब्दुल गनी यांच्यासोबत एन्काऊंटरमध्ये मारली गेली होती.

हेडली सध्या मुंबईवरच्या हल्ला प्रकरणी शिकागोमध्ये २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.इशरत जहॉं ही कॉलेज तरुणी होती, सेल्समन होती. निरपराध होती. तिला विनाकारण पोलिसांनी बनावट चकमक करून मारले. तिचा खून केला, असा कांगावा करून प्रचंड गदारोळ माजविला गेला.काही आमदारांनी आमदारनिधीतून इशरत जहॉंच्या कुटुंबीयांना मदतही केली होती. वास्तविक इशरत जहॉं ही अतिरेकी होती ही काही माहिती आता हेडलीने माफीचा साक्षीदार म्हणून साक्ष दिली आणि पुढे आली असे नाही. ही घटना घडली त्यावेळी दहा वर्षांपूर्वीही याबाबत पुष्टी करणारे अनेक मुद्दे पुढे आले होते. मात्र, या माहितीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले.

तपास यंत्रणेचे अधिकारी जेव्हा अमेरिकेत हेडलीचा जबाब घेण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांनाही हेडलीने इशरत जहॉं लष्कर ए तोयबाच्या आत्मघातकी पथकाची सदस्य होती हे सांगितले होते. मात्र, या हेडलीच्या दाव्याला सिद्ध करणारे पुरावे नाहीत, असे कारण सांगून त्याच्या जबाबातील हा भाग काढून टाकण्यात आला.
अनेक प्रसारमाध्यमे यांची विश्वाससार्हता या इशरत प्रकरणात पूर्णपणे मोडीत निघाली आहे. माफीचा साक्षीदार हेडली झाल्याने २६/११च्या हल्ल्याचा तपासात अनेक गोष्टी पुढे येण्याची शक्यता आहे. हेडलीने चार अटी मान्य केल्याने या अटींवर आधारित २६/११ च्या दहशतवादी खटल्यायाठी डेव्हिड हेडलीची जबाब ८ फेब्रवारी २०१६ रोजी रेकॉर्ड केला जाईल. या खटल्याची पुढील सुनावणी ८ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे.

हेडली आणि २६/११: अमेरिकेचे कारस्थान!

हेडली डबल नव्हे चौघांचा हा एजन्ट होता, तो अमेरिकेच्या ड्रग इनफोर्सेंट अॅडमिनीस्टे्रशन (डीइए), द फेडरल ब्युरो ऑफइनव्हेस्टिगेशन (एफबीआय), द सेंटरल इन्टेलिजन्स एजन्सी (सीआयए) आणि लष्कर-ए-तोयबा (एलइटी)यांच्यासाठी काम करत होता. त्याचे अमेरिकेच्या गुप्तहेर खात्याशी असणारे संबंध न्यायालयात समोर येऊ नयेत यासाठी सर्व पुरावे नष्ट करण्याचा करार एफबीआयने त्याच्या बरोबर आधीच केला होता.एफबीआय त्याला भारताच्या हवाली करणार नाही आणि त्याचे अमेरिकेच्या व पाकिस्तानच्या गुप्तहेर खात्याबरोबर असणार्‍या संबंधांबाबत भारतीय एजन्सीजने त्याला कोणतेही प्रश्न विचारू नयेत, यासाठी भारतीयएजन्सीला त्याची चौकशी करण्याची परवानगी अमेरिका कधीही देणार नाही. त्याच्या विरोधात कोणतीही उलट तपासणी होणार नाही.एफबीआयला हे महत्वाचे आहे की एलइटीला मुंबईवरील हल्ल्यासाठी जबाबदार धरावे ज्यामुळे त्यावर पाकिस्तानला कारवाई करावी लागेल.

अमेरिकेच्या यंत्रणांचा अभ्यास करा

लष्कर-ए-तोयबाविरुद्ध कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर फ़ारसा दबाव अमेरिकेने आणला नाही. त्याचे कारण हेडलीचा अमेरिकेसाठीच्या हेरगिरीत दडले आहे. थोडक्यात हेडली हा डबल एजंट होता. उद्या हेडलीची खरीखुरी माहिती जगापुढे आली तर अमेरिकेचा दुटप्पीपणा जगापुढे येईल, अशी शक्यता होती. पण अमेरिकेने मोठ्या मुत्सद्दीपणे हा प्रकरण हाताळले. अमेरिकेच्या या प्रकरणातील एकंदर वागण्यावरून भारतीय यंत्रणेने बोध घ्यायला हरकत नाही. यापूर्वी भारतात झालेल्या अनेक घातपातांचे धागेदोरे हाती आलेले नाहीत. या उलट आपले सहा नागरिक मुंबई हल्ल्यात मारले गेल्यानंतर ज्या गतीने अमेरिकेने हेडली आणि राणा यांना अटक केली, त्यावरून या देशांची गुप्तचर यंत्रणांची ताकद किती आहे ते दिसून आले. भविष्यात अमेरिकेच्या यंत्रणांचा अभ्यास करून त्याचा आदर्श ठेवण्यात भारताला हरकत नसावी.

मुंबईवरच्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी डेव्हिड हेडली हा माफीचा साक्षीदार बनला आहे. त्याच्या साक्षीमुळे मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यामागचा पाकिस्तानचा नापाक आणि हिंस्र चेहरा जगासमोर उघडा पडणार आहे. या देशात राहूनही जिथे तिथे राजकीय फायदा पाहणार्‍या , त्यासाठी वाट्टेल त्या थराला जाऊन देशाचे नुकसान करणार्‍यांचे बुरखेही फाटणार आहेत.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..