नवीन लेखन...

हिंदी चित्रपटसृष्टीचे जंपिंग जॅक जितेंद्र

Jumping Jack of Bollywood - Jeetendra

जितेंद्र हे बॉलीवुडचे केवळ एक लोकप्रिय नायक अथवा अभिनेते नाहीत तर त्याचबरोबर अनेक दूरदर्शन मालिका आणि चित्रपट यांचे ते निर्माते आहेत. बालाजी टेलेफिल्म्स, बालाजी मोशन पिक्चर्स या उद्योगांचे ते अध्यक्ष आहेत.

जितेंद्र यांचा जन्म ७ एप्रिल १९४२ रोजी अमृतसर पंजाब येथे झाला. आज वयाच्या ७५ व्या वर्षी देखील त्यांची जंपिंग जॅक ऑफ बॉलीवुड ही ओळख टिकून आहे.

जितेंद्र यांचे खरे नांव आहे रवि कपूर. मा.जितेंद्र हे त्यांच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये त्यांच्या खास नृत्यशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. तरुणांनाही लाजवेल असे स्वास्थ आणि चिरतारुण्य त्यांना लाभलेले आहे. मा.जितेंद्र यांच्या वडिलांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय होता. अभिनेते राजेश खन्ना हे मा.जितेंद्र यांचे शालेय जीवनापासूनचे मित्र. चित्रपट निर्माते/दिग्दर्शक व्ही.शांताराम यांना चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी बनावट पद्धतीच्या दागिन्यांचा (इमिटेशन ज्वेलरी) पुरवठा करतांना अभिनेत्री संध्या अभिनित ‘नवरंग’ या चित्रपटातील लहानश्या भूमिकेसाठी मा.जितेंद्र यांची निवड झाली. पुढे व्ही.शांताराम यांनीच त्यांच्या ‘गीत गाया पत्थरोनेँ’ या चित्रपटात अभिनेत्री राजश्रीच्या नायकाची भूमिका यांना दिली. आणि प्रारंभ झाला तारुण्याने सळसळणाऱ्या एका नृत्यनिपुण, व्यावसायिक, रोमांटिक तसेच कौटुंबिक चित्रपट कारकीर्दीचा. १९६० ते १९९०च्या काळात जवळपास सर्व नायिकांसोबत मा.जितेंद्र यांची जोडी जमली आणि यशस्वी झाली. सर्वाधिक नायिकांसोबत पडद्यावर जोडी जमवण्याचा विक्रम करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये मा.जितेंद्र यांचे नांव अग्रक्रमाने घेतले जाते. राजश्री, लिना चंदावरकर, मुमताज, रेखा, रीना रॉय, हेमामालिनी, नीतू सिंग, मौसमी चटर्जी, सुलक्षणा पंडित, श्रीदेवी, जयाप्रदा, भानुप्रिया या सारख्या अनेक नायिकांसोबत मा.जितेंद्र यांची जोडी लोकप्रिय ठरली. जितेंद्र यांना दिग्दर्शकाचा अभिनेता असे संबोधण्यात येई. एक चांगला दिग्दर्शक त्यांचेकडून उत्तम अभिनय करवून घेऊ शकत असे. जितेंद्र त्यांच्या अभिनयासाठी कधीही फारसे चर्चेत नसले तरी त्यांच्या अभिनयावर फारशी टीका देखील झाली नाही. आपल्या भूमिकेला ते नेहमी न्याय द्यायचा प्रयत्न करत असत. त्यांच्या अभिनयाबाबत समीक्षकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नचिन्हाला मा.जितेंद्र यांनी गुलजार यांच्या खुशबू, किनारा आणि परिचय या सारख्या चित्रपटांमधून आपल्या संवेदनशील अभिनयाद्वारे चोख उत्तर दिले. टी.रामाराव, के.बापय्या, के.राघवेंद्र राव यांच्या दक्षिणेकडील लोकप्रिय चित्रपटांच्या रिमेकमध्ये जितेंद्र प्रामुख्याने अभिनय करत असत.

जितेंद्र यांनी आजवर जवळपास १६० चित्रपटांमध्ये अभिनय केलेला असून अधिकांश चित्रपटांमध्ये नायकाची भूमिका साकारलेली आहे. त्यांची जोडी सर्वात जास्त अभिनेत्री रेखा यांचेबरोबर जमली. त्यांनी एकूण ३१ चित्रपटांमध्ये एकत्र व २६ चित्रपटांमध्ये नायक-नायिका म्हणून अभिनय केला. राजकुमार कोहली यांच्या मल्टीस्टारर चित्रपटांत मा.जितेंद्र यांना नेहमी विशेष भूमिका असायची. त्यात प्रामुख्याने जानी दुश्मन, नागीन या चित्रपटांचा उल्लेख करता येऊ शकेल. ‘फर्ज’ या चित्रपटापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झालेल्या मा.जितेंद्र यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत यशाची मुसंडी पुन्हापुन्हा मारली. मा.जितेंद्र यांची कारकीर्द संपृष्टात आली असे वाटत असतांनाच हिम्मतवाला, खुदगर्ज या सारख्या चित्रपटांद्वारे त्यांनी पुन्हा नवी इनिंग सुरु केली. मा.जितेंद्र यांनी सर्वच नायिकांसोबत नायक म्हणून अभिनय केला. १९९०च्या दशकातील जवान दिलोंकी धडकन असलेल्या माधुरी दीक्षित सोबत देखील दोन चित्रपटांत त्यांनी नायक रंगवला. त्या कालावधीत केवळ स्मिता ‘पाटील यांचाच नायक होणे राहून गेले. मा.जितेंद्र यांनी संतांन, औलाद या शीर्षकाच्या एक नाही तर दोन-दोन चित्रपटांत भूमिका केल्या. मात्र चित्रपट निर्माते म्हणून त्यांना अपयश आले. त्यांची निर्मिती असलेले दीदार-ए-यार, आग और शोला, तमाचा हे चित्रपट तिकीट खिडकीवर साफ कोसळले. मात्र कन्या एकता कपूर हिने बालाजी टेलेफिल्म्स द्वारे यश मिळवत त्याची कसर भरून काढली. ८०च्या दशकात अमिताभ यांचेनंतर जितेंद्र हेच व्यायसायिक चित्रपटांतील यशाचे समीकरण होते. मात्र असे आले तरी मा.जितेंद्र यांना अभिनयासाठी कधीच कुठला पुरस्कार मिळाला नाही. पुरस्कार तर लांबच पण पुरस्कारासाठी साधे नामांकन देखील मिळालेले नाही. मात्र कारकीर्दीच्या उतरणीला त्यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी अनेक ‘लाईफटाईम अचिव्हमेंट’ पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. २००४ साली अटलांटिक येथे ‘लिजेंड ऑफ इंडियन सिनेमा’ आणि २०१४ साली ‘दादासाहेब फाळके’ या पुरस्कारांनी देखील त्यांना गौरविण्यात आले. मा.जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूर अभिनयात ‘स्टार’ होऊ शकला नसला तरी मुझे कुछ कहना है, गोलमाल, क्या कुल है हम, खाकी, गोलमाल रिटर्न्स, गोलमाल ३ यासारख्या चित्रपटांत लक्षवेधी ठरत यश मिळवून गेला. तर मुलगी एकता कपूरने एक अत्यंत वेगळी वाट निवडली. बालाजी टेलेफिल्म्स नावाची तिची निर्मिती संस्था अनेक मालिकांची तसेच चित्रपटांची निर्मिती करते. या क्षेत्रात एकता कपूरने तिचे स्वतंत्र करत एक वेगळाच ठसा उमटवला आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

जितेंद्र यांची काही गाणी.


जितेंद्र यांचे जीनेकी राह व परीचय चित्रपट.

https://www.youtube.com/watch?v=PymR1vjKzXc

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..