नवीन लेखन...

आइस्क्रीम मात्र वितळतच होते….

तिने मला दोन-तीनदा लूक दिले,
तिसऱ्यावेळी तिने केसावरुन हात फिरवला ..
अर्थात तिच्या …
ती कोण हे मला अजून उमजत नव्हते
माझ्या डोक्याचे एक डिपार्टमेंट
ती कोण ह्याचा विचार करत होते आणि
जेवण चालू होते…
आज मी ड्रिंक्स घेत नव्हतो
का कुणास ठाऊक
कदाचित शाकाहारी जेवणाचा परिणाम असावा
परंतु तिला बघीतल्यावर मात्र
शाकाहारी जेवणाचा परिणाम काहीच होत नव्हता.
ती मला ओळखत होती हे निश्चित
परंतुतिच्या मेकअपमुळे किंवा
गेट-अप मुळे मी पार कन्फयुज
झालेला होतो…
फ्युज मात्र पार उडाला होता.
सतत ती कोण
हाच विचार येत होता आणि ती मात्र
लूक वर लूक देत होती..
शेवटी मी आइस्क्रीम घ्यायला गेलेलो ,
तशी ती पण उठली
माझ्याकडे आली…
ओळखले का …
असा आवाज ऐकला ..
आणि माझी ट्यूब पेटली..
ती कोण ते कळले ..
एका हॉटेलवर आठ ते दहा वर्षांपूर्वी भेटली होती…
नवऱ्याबरोबरआली होती ..
नवरा कामानिमित्त तिला घेऊन
आलेला होता…
आणि ही बया पण ‘ काम ‘ शोधत असताना
तिची माझी गाठ पडली होती..
हाय-हॅलो झाले…
अर्थात मीहॉटेलमध्ये एकटाच असल्यामुळे
हाय-हॅलो हा प्रकार फार काळ टिकला नाही.
नवरा मिटींग्स ला जात होता…
वेळ मिळेल तेव्हा त्याच्याबरोबरती असे .
एरवी एकटीच.
माझ्या रूमवर आली , गप्पा सुरु झाल्या.
दोन-तीन दिवस गप्पाच होत होत्या..
ती तशी डांब्रटच एकदा नवऱ्याबरोबर
असताना ओळख नाही दाखवली…
मी समजून गेलो बाई किती पाण्यात आहे ते…
परत चौथ्या दिवशीआली …
मी विषयच काढला नाही तिच्या नवऱ्याचा..
तिनेपण नाही…
ह्यावेळी म्हणाली आपण इथेच बसू
मी व्हिस्की आणली आहे…
आयला हे बेणं पार तयारीने आले होते
आता शिंगावर घावेच लागणार…
आणि तसेच झाले ..दोन पेग जाताच तिचे सुरु झाले….
मग काय सुरूच ..
त्या रात्री नवरा येणार नव्हता..
मग सगळे काही तेथेच झाले…
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहज
हॉटेलवाल्याला विचारले..
म्हणाला चेक-आऊट केले.
त्यानंतर आज भेटली ती
म्हणाली ..आमचे दोघांचे पटत नाही..
तरीपण एकत्र रहात आहोत…
मी तिच्याबरोबर बोलत होतो..
बाजूला आलो…
ती आइस्क्रीम खात होती …
बोलत होती..
मी नुसतातिच्या नवीन सौदर्याकडे बघत
ऐकत होतो…
मला आइस्क्रीम खाण्याचे भानच नव्हते..
आइस्क्रीम मात्र वितळतच होते…

सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..