नवीन लेखन...

प्लास्टिकचा इतिहास भाग-२

१९५२ साली प्रा. झिग्लर यांनी बनवलेल्या पॉलिथिलीनमध्ये ॲलिम्युनिअम ट्रायअल्कील व टीटॅनियम टेट्राक्लोराइड यापासून बनवलेला साहाय्यक पदार्थ प्रक्रियेसाठी वापरला होता. नंतर प्रा. नाटा या इटालियन शास्त्रज्ञाने हा साहाय्यक पदार्थ बदलून त्याऐवजी प्रोपिलीन वापरले. त्यामुळे पॉलिथिलीन अधिक मजबूत बनले. १९५६ मध्ये पॉलिअॅसिटलचा आणि १९५७ साली पॉलिकार्बोनेटचा उदय झाला. १९६५ ते बहुगुणी १९८५ या २० वर्षांत इंजिनीयरिंग प्लास्टिकचा उदय यात झाला. पॉलिसल्फोनस, पॉलिमिथाइल पेंटिन,पॉलिथिलीन टेरेथेलेट, अॅरोमेटिक पॉलिएस्टर्स, पॉलिइथर, इथर द्रव किटोन्स,स्फटिकरूप पॉलिमर्स इत्यादींचा समावेश आहे.

प्लास्टिकमध्ये जसजशी सुधारणा होत गेली तसतशी त्यापासून वस्तू बनवणाऱ्या यंत्रातही बदल करावा लागला. सुरुवातीला बनवलेल्या साच्यामध्ये (एक्सट्रडर) बदल करावे लागले. पहिला साचा फक्त गुट्टापर्चा (गुट्टापर्चा-मलाया द्वीपकल्पामधील पर्चा नावाच्या झाडापासून मिळणारे रबर) रबरासाठी उपयोगी पडणारा होता. असेच बदल इंजेक्शन मोल्डिंग यंत्रातही होत गेले.

दुसऱ्या महायुद्धानंतर ब्लोमोल्डिंग आणि व्हॅक्यूम फोर्मिंगने वस्तू बनवायला सुरुवात झाली. ब्लोमोल्डिंग पद्धतीने पोकळ बाटल्या, डबे, पिंपे इत्यादी वस्तू बनू लागल्या. प्लास्टिक हे सेंद्रिय व संघटित पदार्थ आहेत. ते काही नैसर्गिक पदार्थांपासून बनविले जातात किंवा संपूर्णपणे कृत्रिम पदार्थापासून बनवलेले असतात. काही प्लास्टिक्स रबरासारखी असतात. मात्र प्लास्टिकला पुरेशी ताकद `असते. हाय डेन्सिटी पॉलिथिलीन हे लो डेन्सिटी पॉलिथिलीनपेक्षा गुणधर्मात सरस असते. ताण सामर्थ्य, दाब सामर्थ्य अधिकच्या तापमानाला टिकून राहण्याची क्षमता हे ते गुणधर्म होत. सोसायटींच्या गच्चीवर ज्या पाण्याच्या टाक्या असतात त्या हाय डेन्सिटी पॉलिथिलीनपासून बनवलेल्या असतात. या टाक्या खूप जाड असतात व त्या वर्षानुवर्षे टिकतात. त्या सतत उन्हात असल्या तरी उन्हाने तडकत नाहीत.

प्लास्टिक बनवण्यासाठी सेल्युलोज (कापूस व लाकडापासून), स्टार्च (शेती उत्पादनातून), झाईन (मक्यातील प्रोटीन), केसिन (गाईच्या दुधापासून), एरंडेल, तेल, लाख, रबर किंवा कधी कोळसाही वापरतात.

अ.पां. देशपांडे, (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..