नवीन लेखन...

ह. म. बने, तु. म. बने

माझा ज्येष्ठ मित्र हिमांशू दळवी (Himanshu Dalvi) याने  “ह. म. बने , तु .म .बने ” या दूरचित्रवाणीच्या मालिकेतील ७ जानेवारीच्या भागाची एक लिंक आमच्या WA ग्रुपवर टाकली आणि  सोबत पुण्याच्या डॉ विदया निकाळजे यांचे या भागावरील विहंगम भाष्यही पोस्ट केले. मी लगेच लिंक उघडून तो भाग पाहिला. “गोटया “, ” गंगाधर टिपरे ” आणि “उंच माझा झोका ” यानंतर दूरचित्रवाणीवरील  मालिकांकडून काहीही अपेक्षा बाळगायची नसते अशी मी मनाची ठाम समजूत घातली होती. खरे तर  “ह. म. बने , तु .म .बने ” या नावामुळे माझा (गैर )समज झाल्याने मी आजवर ही मालिकाही कधी बघितली नव्हती. पण ७ जानेवारीच्या भागाने मी निःशब्द झालो. पौगंडावस्थेतील शालेय मुलगी “स्त्री ” होण्याचा उंबरठा ओलांडत असताना अजाणता बापाचा मदतीचा हात पुढे येणे अतर्क्यच ! हा विचारही कधी मनात आला नव्हता. हे obvious नाते त्या टप्प्यावर काहीसे आक्रसते. दुरावा निर्माण होत जातो याक्षणी ! त्याबद्दल कोणाची तक्रारही नसते कधी. इतकं आपण ते शारीर परिवर्तन सहज मानतो. बदललेल्या समाजात मुळात भूमिकांकडेही वेगळ्या चष्म्यातून बघायचे दिवस आता आले आहेत. हा विषय मुळात सुचणे , त्याला अंगीभूत अभिनयाने हळुवार खुलवणे हे महा कठीण !

एकच सांगतो – त्या दिवसापासून मी ही मालिका पाहू लागलो. हरवत चाललेल्या (म्हणूनच हव्याहव्याशा ) कुटुंब संस्थेतील तीन पिढ्यांचे घट्ट भावबंध मी आवडीने बघतोय. शेवट थोडासा प्रचारकी /उपदेशपर होतो कधी कधी पण वीण मस्त. खूप दिवसांनी चांगली दैनिक करमणूक ! काही नाती आणि त्यातील अदृष्य ओलावे अशा पद्धतीने काठावर येत असतील तरी चालेल. निष्पर्ण होण्यापेक्षा असं भिजणं चांगलं नाही का ? धन्यवाद हिमांशू !

हे लेखन कधीचेच मनात होते पण काही नैमित्तिक विषय मुसंडी मारून पुढे आले. पण आजच्या भागानंतर बनेंच्या मधल्या फळीने ७ जानेवारीचा उल्लेख करून प्रेक्षकांच्या आधाराबद्दल जाहीर आभार मानले आणि मी कॉम्पुटरचा की -बोर्ड हातात घेतला. कौतुकही वेळच्या वेळी करावे. धन्यवाद “बने” कुटुंबीय ! आम्ही अधिक सजग आणि डोळस झालो.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 52 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर नऊ पुस्तके ( ६ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..