नवीन लेखन...

असामान्य व्यक्ती

सामान्यांतूनी असामान्य निर्मिती,  ध्येय असावे खरे,

कोळशाच्या खाणीत सांपडती,  चमचमणारे हिरे…..१,

उदार होवूनी निसर्ग देतो,  समान संधी सर्वा,

परि तेच घेती खेचूनी तिजला,  सोडूनी जीवन पर्वा……२,

जीवन म्हणजे अमूल्य देणगी,  समज असते काहींना

व्यर्थ न दवडावे सहजपणें, विचार असे क्षणाक्षणा……३,

जीवन कोडे नाहीं उमगले,  कुणास आजवरी

अर्थ आगळे अन् ध्येय निराळे,  काढती आपल्या परी….४,

निर्जीव सजीव सर्वांचि मिळूनी, उभारला संसार

हर घटकाने सहभागी व्हावे,  लावूनी हातभार….५,

सर्व जगापरी जगत असतां,  जगे इतरांसाठी

सामान्यातील असामान्य ठरेतो,  ह्याच विश्वापाठीं……६

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2131 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..