नवीन लेखन...

विख्यात सरोदवादक अली अकबर खान

Eminent Sarod Player Ustad Ali Akbar Khan

विख्यात सरोदवादक अली अकबर खान यांचा जन्म १४ एप्रिल १९२२ रोजी झाला. पूर्व बंगालमध्ये जन्मलेल्या अली अकबर खान यांचे गायन वयाच्या तिसऱ्या वर्षीच सुरू झाले होते. त्यांचे घराणे हे तानसेन यांच्या घराण्याशी नाते सांगणारे आहे.

अली अकबर खान यांचे वडील पद्मविभूषण डॉ.अल्लाउद्दिन खान हे उत्तर भारतीय शात्रीय संगीतातील एक महनीय नाव होते. त्यांनी वयाच्या शंभराव्या वर्षापर्यंत आपल्या मुलाला शात्रीय गायनाचे शिक्षण दिले. परंतु त्यांना सरोद या वाद्यावरच लक्ष केंद्रित करण्यास सांगितले.

अली अकबर खान हे जोधपूरच्या राजघराण्यात सात वर्षे दरबारी गायन करीत होते. तेथेच त्यांना उस्ताद ही पदवी मिळाली होती. त्यांनी भारतासह भारताबाहेरही शात्रीय संगीताचे प्रशिक्षण सुरू केले होते. पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले खाँसाहेब पाश्चात्य आणि भारतीय शास्त्रीय संगीतातील अढळ ध्रुवतारा म्हणून गेली पाच दशके ओळखले जात होते. भारतीय अभिजात संगीताला जगभर मान्यता मिळवून देणाऱ्या उस्तादांचे पौर्वात्य व पाश्चिमात्य संगीतविश्वात असंख्य चाहते आहेत. जगविख्यात व्हायोलिन वादक लॉर्ड येहुदी मेन्युहिन यांनी तर त्यांचे ‘ग्रेटेस्ट म्युझिशियन इन द वर्ल्ड’ असे वर्णन केले होते.

वयाच्या १३ व्या वर्षी अलाहाबादला पहिला जाहीर कार्यक्रम करणाऱ्या खाँसाहेबांनी २० व्या वर्षी एचएमव्हीसाठी लखनौला ध्वनिमुद्रण केले. जोधपूर घराण्यात राजगायक म्हणून सात वर्षे काम करत असतानाच त्यांना उस्ताद हा पहिला सन्मान बहाल केला गेला. लॉर्ड येहुदी मेन्युहिन यांच्या विनंतीवरून १९५५ ला न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रम केल्यापासून त्यांना व भारतीय शास्त्रीय संगीताला साऱ्या संगीत विश्वाचे दरवाजे खुले झाले. १९५६ मध्ये कोलकात्ता येथे त्यांनी अली अकबर संगीत महाविद्यालयाची स्थापना केली. पाश्चिमात्य जगाचा शास्त्रीय संगीताकडे असलेला ओढा पाहून १९६५ मध्ये अमेरिकेत संगीत केंद्र सुरू केले. कॅलिफोर्नियात अली अकबर संगीत महाविद्यालय स्थापन केल्यानंतर स्वित्झर्लण्डमध्येही त्यांनी त्याची शाखा उघडली. भारताच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त संयुक्त राष्ट्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांना सरोदवादनाचा कार्यक्रम करण्याची विनंती भारतीय राजदूतवासाने केली होती. जगभर दौरे करणाऱ्या उस्तादांनी चेतन आनंद यांच्या आँधिया, आयव्हरी-र्मचट यांच्या हाऊस होल्डर, सत्यजित रे यांच्या देवी, बर्नाडो बटरेलुस्सी यांच्या लिटल बुद्धा इ. चित्रपटांनाही त्यांनी पाश्र्वसंगीत दिले.

उस्ताद अली अकबर खां यांचे १९ जून २००९ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..