नवीन लेखन...

चांगुलपणाचा अनुभव

ता. २९ जुलै ची गोष्ट.

आमचे मित्र ,बोरकरच्या लग्नाचे वाढदिवसाची पार्टी गोरेगावला होती.

मी बीकेसी येथील कार्यालयातून निघालो. व कल्याणवरुन पत्नी, मुली गाडीत निघाल्यात. संजय जाधवच्या महीन्द्रा XUV( MH 46 AP00000) गाडीतून .

मी खारघर येथे त्यांना join झालो.पवई IIT पुढील मार्गावरुन निघालोत सर्व.
ट्राँफीक मधून गाडी चालली होती. मुली ,वहीनी गाण्यांच्या भेंड्या खेळत होत्या.सुकूचा आवाज छान असल्याने गाणे ऐकणे म्हणजे मजाच असते.

असं सारं सुरु असताना ….
संजय गाडी चालवत होता.तोही नवीनच ड्राँयव्हरसारखा गाडी चालवत होता.
आरे येथील ओव्हरब्रीजवर अचानक गाडी बंद पडली.
क्लच संपुर्णतः आत दबल्या जात होता.
गेअर टाकणे आता मुश्कील झाले होते. खुप प्रयत्न करुनही गाडी दुसर्‍या, तिसर्‍या गेअरवर सुरु होत नव्हती. गाडी बरोबर मधल्याच लेनमध्ये बंद पडली होती. मागाहून येणार्‍या गाड्या सारख्या हार्न वाजवत होत्या. आता आमच्या गाडीमुळे ट्रँफीक वाढली ..
इतर जाणार्‍या गाड्यांचे ड्राँयव्हर लोकं आम्हाला शिव्या देत…रस्त्यावरच कशी गाडी उभी करता? समजत नाही का…….? वगेरे वगेरे.
वाढदिवसाची वेळ ८:३० अशी असताना.,
आम्ही येथे सर्वजण अडकुन पडलो होतो.
रीक्षा पाहावी म्हणून मी खाली उतरण्याचा प्रयत्न करावा तर भराभर गाड्या जवळून पुढे जात होत्या.
शेवटी कसाबसा उतरलो.

पण मागे चालत जाणे मुश्कील जात होते.

पुलावरुन तीन लेनच्या रस्त्यावरुन पायी चालणार्‍याचे कामच नव्हे ते!!

एक रीक्षावाला थांबला.. त्या रिक्षात फँमीलीला बसवून पुढे पाठवून दिले. तेव्हा 10:30 वाजले होते.

आता संजय व मी गाडी कशी सुरु करावी वा येथुन रस्त्यामधून कशी रस्त्याकडेला लावावी याचा विचार करत होतो.
महिन्द्रा कं.नीची फ्री टोल नंबर शोधून तो पर्यंत टो ची गाडी ला बोलावले. पण तो यायला एकतरी तास लागणार होता.
आता लोकं,ड्राँयव्हरच्या शिव्या ऐकण्यापेक्षा ट्रँफीक कंन्ट्रौल करावी म्हणून गाडीखाली उतरुन ते काम करु लागलो.
बापरे! किती गाडीवाले आमचे एकदम जवळून गाड्या नेत होते.. भीतीच वाटत होती. पायावरुन वा अंगावरुन गाडी येइल का यांची!

असे अर्धा तास तरी कसरत करीत ट्रँफीक पोलीसाचे काम करायला मिळाले.. किती कठीण असते ..हा अनुभवही येत होता…
इतक्यात एका टँक्सीवाला थांबला.
काय झाले?
कसे?
का सुरु होत नाही?
असे प्रश्न विचारुन
गाडीची चाबी मागून गाडी सुरु करण्याचा प्रयत्न करु लागला. बोनेट उघडून ,गाडीखाली झोपुन सर्व प्रकारे प्रयत्न तो करु लागला.

त्याला बिचार्‍याला काही होवू नये… गाड्या त्याच्या पायावरुन जावू नये म्हणून आता आमची जबाबदारी वाढली..
येणार्‍या गाड्या रोखुन आमचे दुरुस्तीचे काम सुरु होते..

विस तीस मीनीटे प्रयत्न करुनही गाडी काही हालेना!!

त्याने एखाद्या गँरेजवाल्याला बोलवायचे सांगून निघून गेला.

बिचारा एवढ्या गर्दीत आम्हाला स्वतःहून मदत करणारा निस्वार्थी माणूस..
जगातील चांगुलपणावर विश्वास वाढला.

त्याचे नांव विचारायचे राहूनच गेले..

थोड्या वेळांनी दोन मोटारसायकलवरुन चार ट्रँफीक पोलीस आमचे जवळ थांबलेत..
विचारपूस करून आमचा त्रास बघून ते आता त्यांचे काम करु लागूले.. जास्त पुढे राहून गाड्या थांबवू नका..
गाड्या अंगावर येतील .असा सल्लाही देवू लागले.

एकाने गाडी ढकलत नेण्याचा शक्कल लढवली.सगळ्यांना ती पटली.
संजय गाडीत ड्राँयव्हरच्या शीटवर बसला.
तीन पोलीस व मी गाडीला धक्का देवू लागलो.
एक पोलीस ट्रँफीक ला साँभाळतहोता.
अशाप्रमाणे आमची मिरवणूक अंदाजे अर्धा वा पाऊण कीमी अंतर धक्का देत देत गाडी ओव्हरब्रीज संपेपर्यंत खाली ढकलत आणली.
एका कंन्ट्रक्शन सुरु असलेल्या इमारतीजवळ गाडी लावली.

थोड्या वेळाने कंपनीचे टोइंग व्हँन आली. गाडी घेवून गेली..
ट्रँफीक पोलीसांनी केलेली मदतीमुळे आम्हाला फार मोठा आधार मिळाला..
रस्ता मोकळा झाला..

जगात चांगुलपणा ही आहे . हे कळले..

पोलीस तसेच तो टँक्सीवाला यांच्यामुळे..

नेहमी लक्षात राहील असा होता हा अनुभव.

— श्रीकांत पेटकर

Avatar
About श्रीकांत पेटकर 43 Articles
श्रीकांत बापुराव पेटकर हे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्‍यांना लेखनाची आवड असून त्‍यांची 'आणि मी बौद्ध झालो' या अनुवादित पुस्‍तकासोबत कल्‍याण, शांबरीका खरोलिका, बेहोशीतच जगणं असतं,कविता मनातल्या , चांगुलपणा अवती भवती अशी एकूण आठ पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत.इंद्रधनुष्य हा कथासंग्रह . पेटकर यांनी सामाजिक जाणिवेतून माहिती अधिकाराचा वापर, नागरिकांना वीज बचतीचे महत्‍त्‍व पटवून देणे, परिसरातील विधायक काम करणा-या व्‍यक्‍तींना प्रकाशात आणणे असे विविध पातळ्यांवर प्रयत्‍न केले आहेत. पेटकरांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्‍यांच्‍या चित्रांची आतापर्यंत दोन प्रदर्शन आयोजित करण्‍यात आली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..