…लहान असताना तो एकटाच यष्टीने गोल्फचा चेंडू पाणी साठविण्यासाठी बांधलेल्या एका टाकीवर मारून सराव करीत असे असे ऑस्ट्रेलियातील लोकसाहित्य सांगते. वयाच्या बाराव्या वर्षी त्याने बोवराल शाळेकडून खेळताना पहिले शतक काढले. आपले काका जॉर्ज व्हॅटमॅन यांच्या नेतृत्वाखालील संघाचा खेळ पाहता-पाहता तो धावलेखकाचे काम करू लागला. […]
… प्रथमश्रेणी सामन्यांमधील ज्या शतकांच्या वेळेविषयी वाद नाही त्यांमध्ये पर्सीच्या या शतकाचा कमी वेळेच्या बाबतीत पहिला क्रमांक लागतो. त्याच्या या विक्रमाची बरोबरी एकदा झालेली आहे. […]
1954 ते 1969 या 15 वर्षांच्या कालावधीत ससेक्स संघाने काऊंटी चॅम्पिअनशिप स्पर्धेत खेळलेल्या सर्वच्या सर्व 423 सामन्यांमध्ये केनचा संघात ‘खेळणार्या अकरा’मध्ये समावेश होता! ओळीने 15 वर्षांत 4-2-3 सामने! 1953 ते 1969 या कालावधीतील (सलग) 17 हंगामांमध्ये 1,000 धावा काढण्याचा पराक्रम त्याने केलेला आहे. […]
… धावफलकात त्याची नोंद नाबाद अशी आढळते. विज्डेनच्या वार्षिकांकात तो ‘पोटदुखी’मुळे निवृत्त झाला अशी माहिती मिळते. खरी बात मात्र औरच आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर तो 31 धावांवर नाबाद होता आणि अख्खी रात्र त्याने पोर्ट आणि ब्रॅन्डी पिण्यात घालवली होती. त्याच्या चित्तवृत्ती दुसर्या दिवशी फलंदाजीस उतरताना मद्यमय झालेल्या होत्या आणि आपण मैदानावरच उलट्या करू अशी शक्यता त्याला ‘त्या’ अवस्थेतही अस्वस्थ करीत होती. […]
…प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये दोन्ही डावात शतके काढण्याचे पराक्रम इंग्लिश जनतेला नवीन नव्हते पण एकाच दिवशी दोन्ही डावांत शतके? रणजींनी हा अचाट पराक्रम या दिवशी करून दाखविला. […]
…आपल्या पुनर्प्रवेशानंतरच्या पहिल्याच चेंडूवर बीफीने ब्रूस एडगरला झेलबाद केले आणि सर्वाधिक कसोटी बळी घेण्याच्या डेनिस लिलीच्या (तत्कालीन) विक्रमाशी बरोबरी केली. ग्रॅहम गूच त्याला खोचकपणे आणि मार्मिकतेने विचारला झाला, “अरे बीफी, तुझ्या संहिता (स्क्रिप्ट्स) लिहिते कोण?” […]
… आणखी दोन वर्षांनंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या विनंतीवरून आंक्रिपने सामन्याचा निकाल बहालीवरून ‘अनिर्णित’ असा बदलला. थांबा. मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या सूचनेवरून (हा क्लब अत्यंत जुना आणि प्रतिष्ठित असून क्रिकेटच्या नियमांवर आजही त्याचेच राज्य आहे) पुढच्याच वर्षात आंक्रिपने सामन्याचा मूळ निकाल पुनःस्थापित केला. […]
सकाळी सकाळी ग्राऊन्समनने खेळपट्टीवरील आच्छादने काढली आणि तो सर्दच झाला…खेळपट्टी खणून ठेवण्यात आलेली होती जागोजागी. धक्का पण तो पडला ब्रिटिश. खेळपट्टी दुरुस्त करून खेळापुरती योग्य करविण्यास किती वेळ लागेल याचे गणित तो करू लागला. ते शक्य असल्याची जाणीव त्याला झाली पण… […]
‘वेळ कसा मारुन न्यावा’ नावाचे पुस्तक वाचून आल्याप्रमाणे यॉर्की कप्तान वागत होता. ते त्याने वाचलेले नसेल तर कुणीही रसिक प्रेक्षक बसल्या बसल्या या शीर्षकाचे पुस्तक लिहून पूर्ण करू शकला असता! इंग्रजांना हे खपणार नव्हतेच. कप्तान ब्रायन क्लोज खपला. […]