नवीन लेखन...

डॉनचा जन्म





सुमारे साडेसात वर्षांच्या अंतराने ज्याच्या आयुष्यातील वर्षांचे शतक चुकले त्या एका अद्भुत बालकाचा जन्म 27 ऑगस्ट 1908 रोजी ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स प्रांतामधील कूटामुंड्रात झाला. लहान असताना तो एकटाच यष्टीने गोल्फचा चेंडू पाणी साठविण्यासाठी बांधलेल्या एका टाकीवर मारून सराव करीत असे असे ऑस्ट्रेलियातील लोकसाहित्य सांगते. वयाच्या बाराव्या वर्षी त्याने बोवराल शाळेकडून खेळताना पहिले शतक काढले. आपले काका जॉर्ज व्हॅटमॅन यांच्या नेतृत्वाखालील संघाचा खेळ पाहता-पाहता तो धावलेखकाचे काम करू लागला. एका सामन्यात त्याला खेळण्याचीही संधी मिळाली. 1920-21च्या हंगामात पिताश्री जॉर्ज ब्रॅडमन त्याला सिडनी क्रिकेट मैदानावर अ‍ॅशेस मालिकेतील एक सामना दाखविण्यासाठी घेऊन गेले आणि त्या कुमाराने आपले दृढनिश्चयी बोल अभिव्यक्त केले : या मैदानावर एक ना एक दिवस मी खेळणारच!

सर डोनल्ड ब्रॅडमन यांचे आजही शाबूत असलेले काही विक्रम असे :

  • किमान 20 कसोटी डाव खेळलेल्या फलंदाजांमध्ये सर्वोच्च (पारंपरिक) सरासरी – 99.94
  • 5 सामन्यांच्या मालिकेत सर्वोच्च सरासरी – 201.50
  • सुमारे 36 टक्के डावांमध्ये शतके. (80 डावांमधून 29 शतके)
  • क्रमांक पाचच्या फलंदाजाचा सर्वोच्च डाव – 304 धावा.
  • क्रमांक सातच्या फलंदाजाचा सर्वोच्च डाव – 270 धावा.
  • एका मालिकेत सर्वाधिक धावा – 974.
  • खेळाच्या एकाच सत्रात सर्वाधिक शतके – 6.
  • एका दिवसाच्या खेळात सर्वाधिक धावा – 309.
  • सर्वाधिक द्विशतके – 12.
  • एका मालिकेत सर्वाधिक द्विशतके – 3.
  • सलग सहा कसोटी सामन्यांमध्ये

    शतके.

  • 2000, 3000, 4000, 5000 आणि 6000 धावा कमीत कमी डावांमध्ये जमविण्याचा विक्रम. अनुक्रमे 22, 33, 48, 56 आणि 68 डाव.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..