नवीन लेखन...

सर्व प्रकारच्या क्रिडा, खेळ यावरील लेखन

किरण मोरे आणि झुलू धमाका

या मालिकेत त्याने 16 झेल लपकले आणि फलंदाजांच्या सरासरीमध्ये त्याच्याहून सरस फक्त एकच जण होता ! नियमित (मान्यताप्राप्त) फलंदाज अपयशी झाल्यानंतर हमखास ‘चालणारा’ फलंदाज म्हणून किरणची क्षमता या पहिल्या मालिकेतच दिसून आली. त्यानंतर सुमारे सात वर्षे तो भारताचा नियमित यष्टीरक्षक राहिला.
[…]

मुष्टिवीर जॉन डग्लस आणि सर्वात ‘लांब’ प्रथमश्रेणी सामना

…आपला नेहमीचा गोलंदाज सिडनी बार्न्सला सोडून जॉनीने त्या कसोटीत गोलंदाजीची सुरुवात केली होती. सिडही कच्च्या गुरुचा चेला नव्हता. कप्तानाला भर मैदानावर तो कचाकचा बोलला आणि गोलंदाजी करण्यासाठी जॉनीने पुन्हा चेंडू हातात घेतला नाही. सिडच्या धैर्याचे केवळ कौतुकच केले जाऊ शकेल – 1908च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (लंडन) जॉनीने अंतिम फेरीत स्नोवी बेकर या ऑस्ट्रेलियाई खेळाडूला पराभूत करून मध्यम वजनगटातील मुष्टियुद्धाचे विजेतेपद मिळविले होते !
[…]

एकाला 10 बळी आणि पाचही दिवस फलंदाजी

…सरेच्या गोलंदाजाने आपल्या घरच्या मैदानावर एकाच डावात दहा गडी बाद करण्याचा पराक्रम केला. 29-11-43-10. 7 झेलबाद आणि 3 यष्टीचित. अर्धा डझन फलंदाज शून्यावरच बाद. […]

दोन्हीकडचे इलाही आणि क्लेअर कॉनर

… एकाच खेळाडूने दोन वेगवेगळ्या संघांकडून कसोट्या खेळणे ही अत्यंत दुर्मिळ (आणि आता जवळपास अस्तंगत झालेली) कामगिरी ज्या काही थोड्यांच्या नावावर आहे त्यापैकी इलाही एक आहेत. भारतात असताना बडोद्याकडून ते प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले.
[…]

दादा लॉईड आणि सोबर्सचा (ष-फ)-टकार

…नॉटिमगहमशायरच्या गॅरी सोबर्सने त्याच्या एका षटकातील समग्र कंदुके सीमारेषेवरोनिया दिगंतात धाडिली. पंचम कंदुक रॉजर डेविस नामक क्रीडकाच्या करांमध्ये विसावला खरा पण तोलभंगाने कंदुकासह तो मर्यादारेखा स्पर्शिता झाला.
[…]

पाकिस्तान, पैसा आणि पचका – दौरा आता आवरा !

पाकिस्तानमधील परिस्थिती पाहुण्या खेळाडूंनी जिवंतपणे परत घरी पोहचण्यासारखी नसल्याने पाकिस्तानमध्ये खेळायला आजकाल कोणताही आंतरराष्ट्रीय संघ तयार नसतो. त्रयस्थ भूमीवर सामने खेळविणे हा त्यावरील एक उपाय होता पण त्रयस्थ ठिकाणे ही निकाल-निश्चितीची निश्चित सुविधा असलेली ठिकाणे बनलेली आहेत. भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघाला शारजामधील कोणत्याही सामन्यात सहभागी होण्यास बंदी घातली आहे ती या कारणामुळेच. (ही गोष्ट अनेकांना माहित नसेल. आठवा. शारजात आपण शेवटचे कधी खेळलो?) […]

हॉब्जचे त्रिशतक आणि बिफीचा तिहेरी बार

…60,000 प्रथमश्रेणी धावा जमविणारा हॉब्ज हा एकमेव फलंदाज आहे – मोठे डाव खेळलेला नसूनही. त्याला डॉन ब्रॅडमनसारखी मोठ्या डावांची ‘सवय’ असती तर हा आकडा किती फुगला असता याची कल्पनाही करवत नाही.
[…]

“अ‍ॅशेस”ची जन्मकहाणी

… मेलबर्नमधील काही महिलांनी इंग्लिश कर्णधाराला टेराकोटापासून (तांबड्या रंगाची भाजलेली माती) बनविलेले एक रक्षापात्र भेट दिले. याच्यात नेमके काय होते हे मात्र अजूनही ‘रक्षापात्रा’तच आहे! (तो गुलदस्ता नव्हताच.) ती एक बॅट जाळल्यानंतर निर्माण झालेली राख होती, एक विटी जाळल्यानंतर झालेली राख होती इथपासून ते एका महिलेने आपले एक खास अब्रूझाकू वस्त्र जाळल्याने तयार झालेली राख होती असे अनेक उल्लेख आढळतात.
[…]

फिरक्या थरथरन्‌ आणि नावाचा घोळ

…मुरलीदरनचे सात चेंडू ‘नो-बॉल’ ठरविण्यात आले. त्याच्या मारकतेला प्रतिस्पर्ध्यांनी केलेला हा पहिला सलाम होता! प्रथम 1996 आणि नंतर 1999मध्ये आंक्रिपने त्याची गोलंदाजीची शैली नियमांमध्ये बसत असल्याचे स्पष्ट केले. या वेळपावेतो त्याने ‘दूसरा’ टाकावयास प्रारंभ केलेला नव्हता. ‘दूसर्‍या’शिवायच आपल्या कंदुकाच्या फिरकलीलांवर फलंदाजाला थरथरविण्यास मुरली आता राजरोसपणे तयार झाला.
[…]

1 33 34 35 36 37 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..