नवीन लेखन...

सर्व प्रकारच्या क्रिडा, खेळ यावरील लेखन

सलग-सहा-शतके आणि वेस हॉल

लॉर्ड्सवर यॉर्कशायरविरुद्ध शेष इंग्लंड संघाकडून खेळताना चार्ल्स फ्राय यांनी या दिवशी १०५ धावांची ‘सुंदर खेळी’ (विज्डेन आल्मनॅक) केली. ओळीने सहा प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये शतके काढण्याचा त्यांचा हा विक्रम अद्याप मोडला गेलेला नाही. १२ सप्टेंबर १९३७ रोजी भयावह कॅरिबियन द्रुतगती गोलंदाजांच्या तांड्यातील आणखी एका सरदाराचा जन्म झाला. वेस्ली विन्फील्ड हॉल त्याचं नाव. त्याच्या काळपट गळ्यातील सोन्याची साखळी तो धावू लागताच अस्ताव्यस्तपणे हले
[…]

रणजी आणि पहिले एकदिवसीय द्विशतक

राजेशाही थाटाची, पौर्वात्य किमयेची आणि उच्छृंखल अशी फलंदाजी रणजी करीत. लवचिक मनगट अनेकांजवळ असते, वेळही बरेच जण अचूक साधतात पण या दोन्ही गोष्टींसोबत उपजत नजाकत ज्या फार विरळा किमयागारांजवळ असते त्यात रणजींचा समावेश होतो. १९९७ च्या विश्वचषकातील एका सामन्यात बांद्र्याच्या मिडल इन्कम ग्रुप ग्राऊंडवर बेलिंडाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील पहिले द्विशतक झळकावले. तोपर्यंतच काय, त्याच्यानंतरही सुमारे १३ वर्षे ही कामगिरी कुणाही पुरुषाला जमली नाही.
[…]

लालाजी

ब्रिटिश वर्चस्वाखालील हिंदुस्थानातील एका ‘काळ्या’ खेळाडूने सभ्य गृहस्थांच्या खेळात त्यांच्याचविरुद्ध शतक काढावे ही ताज्जुब की बात होती. खेळ संपल्यानंतर लालाजींभोवती प्रेक्षकांचा गराडा पडला. त्यांच्या गळ्यात पुष्पहार मावेनासे झाले. अनेक महिलांनी आपल्या अंगावरील दागदागिने काढून लालाजींना भेट म्हणून दिले. राजे-महाराजांनीही लालाजींना बक्षिसी दिली. भारतातर्फे पहिल्यांदाच शतक काढणारे लालाजी हे खरोखरीचे हिरो ठरले. भारतीय राष्ट्रवाद जिवंत झाल्याचा हा ढळढळीत पुरावा होता. लालाजींना पुन्हा मात्र कसोट्यांमध्ये कधीही शतक काढता आले नाही
[…]

वॉर्नचा गुरू आणि छोट्याचे कसोटी शतक

अश्रफउलच्या दोन जन्मतारखा सांगितल्या जातात पण कोणत्याही तारखेने तो मुश्ताक मोहम्मदच्या १७ वर्षे ८२ दिवस या वयापेक्षा सरसच ठरतो. १९६०-६१ च्या हंगामात पाकिस्तानच्या मुश्ताक मोहम्मदने भारताविरुद्ध शतक केले होते. सुमारे ४० वर्षे मुश्ताकचा विक्रम टिकला.
[…]

अर्जुनने घडवला इतिहास

गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रीडाक्षेत्राला सुवर्णयश अनुभवायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तेजस्विनी सावंतने जागतिक नेमबाजी स्पर्धेत प्रोन प्रकारात सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब करत देशाची मान उंचावली. जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावणारी सायना नेहवाल करोडो भारतीयांच्या अपेक्षा घेऊन जागतिक बॅडमिटन स्पर्धेत उतरली आहे. यापाठोपाठ अर्जुन अटवाल या गोल्फपटूने भारतीय क्रीडाक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. त्याने विडहॅम चॅम्पियनशीप ट्रॉफी जिंकत विक्रम केला. […]

यष्टीवेधी बर्टी आणि सच्चूचे पहिले शतक

कसोटी इतिहासातील यष्टीमागील बळींचे शतक पूर्ण करणार्‍या पहिल्या व्यक्तीचा जन्म ९ सप्टेंबर १८९४ रोजी झाला. त्याने बूट खुंटीला टांगून ठेवले तेव्हा त्याच्या ग्लोव्ह्जवर १३० बाद-खुणा उमटलेल्या होत्या आणि त्यापैकी केवळ अठ्ठ्याहत्तर खुणा झेलांच्या होत्या. तब्बल ५२ फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या बर्ट ओल्डफील्डने यष्टीचित केले होते.
[…]

“हातासाठी” मांस आणि व्हिक रिचर्डसन

क्रिकेटमधील यष्टीरक्षणाचे काम पाठीला त्रासदायक तर असतेच पण ग्लोव्ह्जमुळे मनगटाच्या पुढील भाग ‘हवाबंद’ होत असल्याने हातांसाठीही त्रासाचे असते. आता तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे मोठ्या रबरी मोज्यांच्या आतून घालण्याजोगे पातळ मोजे उपलब्ध झाले आहेत पण एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या ‘पावात’ एका यष्टीरक्षकाने यावर नामी युक्ती शोधून काढली होती.
[…]

इंग्लंडस्य प्रथम दिवसे… नि हटन-पुत्र

६ सप्टेंबर १८८० हा इंग्लंडमधील कसोटी क्रिकेटच्या आरंभाचा दिवस ठरला. डॉ. विल्यम गिल्बर्ट ग्रेस यांच्याकडून या दिवशीच शतक निघावे हा अनोखा योगायोग होता. केनिंग्टन ओवलवरील या कसोटीपूर्वी क्रिकेट जगतात केवळ तीनच कसोट्या खेळल्या गेल्या होत्या…रिचर्ड हटनच्या अठ्ठेचाळिसाव्या वाढदिवशी लेन हटन परलोकवासी झाले ही मात्र नक्कीच नोंद घेण्याजोगी गोष्ट आहे. वाढीचा ठरलेला असा दिवस नसतो पण अर्थ समजावा म्हणून नाईलाजाने असे शब्द वापरावेच लागतात. असो
[…]

नुसत्याच घोषणा

सरकार केंद्रातले असो की राज्यातले घोषणा करून लोकांना लॉलीपॉप देण्याचे निव्वळ नाटक करीत असते. […]

क्रिकेटच्या गाथेच्या जन्मदात्याचा जन्म आणि विंडीजचे एदिसा पदार्पण

विश्वास बसणे अवघड आहे पण तो वेगवान गोलंदाजी करायचा. वेगवान गोलंदाजी करीत असताना त्याने घेतलेले बळी एका सामन्यामागे दहा भरतात ! १८५० मध्ये लॉर्ड्‌सवर झालेल्या सामन्यात जॉन विज्डेनने प्रतिस्पर्धी संघातील दाहीच्या दाही फलंदाजांचे एकाच डावात त्रिफळे उडविलेले होते ! प्रथमश्रेणी सामन्यात एका डावात दहा बळी घेणारे गोलंदाज त्यानंतरही झाले पण विज्डेनच्या या अचाट पराक्रमाची बरोबरी कुणीही करू शकलेले नाही.
[…]

1 32 33 34 35 36 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..