विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी इत्यादी या सत्तेतच काम करतात. नियमबद्धतेमुळे व्यावहारिक जगतात नवीन निर्मिती शक्य होते वस्तुस्थिती हे व्यावहारिक सत्तेचे मुख्य लक्षण आहे. भौतिक वास्तवात आज आहे त्यावरून पुढे काय होईल ते आपण सांगू शकतो व जे इष्ट वाटेल ते घडवून आणू शकतो. भौतिकीचे सर्व नियम व संशोधन हे या व्यावहारिक स्तरावरच घडत असते. अगदी आईन्स्टाईनचा सापेक्षता सिद्धांतदेखील वास्तविक काय आहे ते सांगतो. […]
पंढरीच्या वारीत एकाचवेळी संतपरंपरा आणि लोकपरंपरा गुण्या-गोविंदाने नांदताना दिसतात. संतांना लोकोद्धाराची तळमळ असल्यामुळे त्यांनी लोकजीवनाच्या सर्व स्तरांचे बारकाईने निरीक्षण केले होते. […]
काही लोकांना ते ज्ञात असते. काहींना त्याची अनुभूती येते तर काहींना तो निव्वळ योगायोग वाटतो. मी ही अशीच योगायोग आणि अनुभूतीच्या उंबरठ्यावर अडकले आहे. नुकताच पीठापुर आणि कुरवपूर यात्रेचा योग गुरुकृपेने जुळून आला. त्या दरम्यान असे सुंदर अनुभव आले, जे सामान्य माणसाच्या विज्ञान निष्ठ बुद्धीला ही कोड्यात टाकणारे होते. […]
आपण रामायणातले काही प्रसंग पाहिले तर लक्षात येईल यात कसे अध्यात्म आहे ते ! फक्त काही नावे व प्रसंग पाहू, विस्तार मर्यादेमुळे अधिक सूक्ष्मपणे विचार करणे अशक्य आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे. […]
त्रिपुरसुंदरी म्हणजे सर्वोत्कृष्ट सौंदर्य. तिन्ही लोकात सुंदर. तथापि त्रिपुर याचा अर्थ विविध अभ्यासकांनी अनेक प्रकारे अर्थ लावलेला दिसतो. त्रिपुर म्हणजे त्रिगुणात्मक शिव आणि त्याची अर्धांगिनी ती त्रिपुरसुंदरी. […]
ख्रिस्तपूर्व ३१०२ या वर्षात कुरूक्षेत्रावर महाभारत युध्द सुरू होण्याच्या ऐन वेळी अर्जुनाच्या मनावर स्वकीयांवरील प्रेमापोटी मळभ आले. ते मळभ दूर सारून त्याला पुन्हा क्षात्रधर्मानुसारचे आपले कार्य करायला उद्युक्त करण्यासाठी म्हणून भगवान श्रीकृष्णानी त्याला रणभूमीवर केलेला उपदेश‚ आणि त्या अनुषंगाने अर्जुनाला आलेल्या शंकांचे निरसन करावे म्हणून सविस्तर सांगितलेले ज्ञान‚ यातून हा गीतोपनिषदाचा ग्रंथ बनला आहे जो ‘श्रीमद्भगवद्गीता’ अथवा सुटसुटीतपणे ‘गीता’ या नावाने ओळखला जातो. आजच्या प्रचलित मराठी बोलीत रूपांतर केलेली गेय स्वरूपातली गीता लोकाना समजणे सोपे जाईल अशी प्रामाणिक मनोभावना यामागे आहे. माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडेल अशी आशा करतो. […]
हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान, नारळ हे फळ पवित्र मानतात. त्याला धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ म्हणतात. नारळचा वापर सगळ्यात जास्त मंदिरांमध्ये केला जातो. दिवाळी, दसरा, गणपती पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणात नारळ अर्पण केले जातात. या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हटले जाते, कारण या झाडाच्या सगळ्या अंगाचा उपयोग करता येतो. […]
आज भारत देशामध्ये सर्वत्र ‘महाशिवरात्री’ हा दिवस भक्तिभावाने साजरा केला जात आहे. शिव मंदिरामध्ये बेल पत्र, धोतऱ्याचे फूल, दूध.. घेऊन रांगेत उभे राहून दर्शनाची वाट बघणारे भक्त दिसत आहेत. व्रत, उपवास करून ईश्वराकडे मनोमन आपली इच्छा पूर्ण व्हावी अशी याचना सर्व करतात. पण ज्याची मनोभावे पूजा केली जात आहे त्या ईश्वराची खरी ओळख तसेच मंदिरातली अनेक प्रतीकात्मक रुपकांची ओळख आज आपण करून घेऊ या. […]