।। मानसपूजा ।।
शुभंकर शिवशंकरच्या शुभाशीर्वादासाठी शब्दांच्या माध्यमातून साकारलेली ही मानसपूजा सादर करताना खूप आनंद होत आहे ! […]
अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…
शुभंकर शिवशंकरच्या शुभाशीर्वादासाठी शब्दांच्या माध्यमातून साकारलेली ही मानसपूजा सादर करताना खूप आनंद होत आहे ! […]
माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र म्हणतात. माघ कृष्ण चतुर्दशी निशीथ कालव्यापिनी असेल तो दिवस महाशिवरात्रीचा मानला जातो. यात निशीथ काल म्हणजे काय याची अनेकांना कल्पना नसेल. रात्रीच्या एकूण वेळेचे १५ समान भाग केले म्हणजे त्यातील प्रत्येक भागाला मुहूर्त असे म्हणतात. त्यातील आठव्या मुहूर्ताला निशीथ असे म्हटले जाते. […]
रुद्राक्ष ही भारत, नेपाळ, इंडोनेशिया ( बाली) आणि हिमालयाच्या परिसरातील अन्य प्रदेशात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. रुद्राक्ष हा मिश्र असा संस्कृत शब्द आहे, ज्यात रुद्र (शंकर) आणि अक्ष (“डोळ्यातील अश्रुचे थेंब”) हे सामील आहेत. याला रुधिरवृक्ष असेही म्हणतात. इलोकार्पस जेनिट्रस हे हिमालयाच्या पायथ्याशी गंगेच्या खोऱ्याच्या क्षेत्रात वाढते. तसेच ते दक्षिण पूर्व आशिया, नेपाळ, इंडोनेशिया, न्यू गिनी ते ऑस्ट्रेलिया, आणि हवाईमध्ये सुद्धा आढळते. […]
मार्कण्डेय पुराणाचे रचयिता मार्कण्डेय ऋषींनी हे अष्टक रचून शंकराचा धावा केला अशी लोककथा आहे. मृगशृंग ऋषींचा पुत्र मृकण्डू याला संतान नसल्याने त्याने भगवान शंकराची आराधना केली. शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला पुत्रप्राप्तीचा वर दिला, परंतु दीर्घायुषी पुत्र मंद बुद्धीचा तर अल्पयुषी पुत्र (१६ वर्षे) अत्यंत बुद्धिमान असेल असा विकल्प दिला. मृकण्ड ऋषींनी दुसरा विकल्प निवडला. तोच हा […]
बागेत पिरॅमिडसारखा दिसणारा, शोभेसाठी लावलेला जो ‘अशोक’ म्हणून ओळखला जातो, तो अशोक वृक्ष नसून ‘आशुपल्लव’ वृक्ष आणि सीतेला अशोकवनात ठेवले होते तो वृक्ष म्हणजे अशोक किंवा सीता अशोक. दोन्हींची कुळे वेगळी आहेत. सीता अशोक सीसॅल्पिनिऑइडी,लेग्युमिनोजी ) व हिरवा अशोक अनॊनेसी कुळातील आहे. मूळचा भारत-श्रीलंकेतला असलेला ‘सीता अशोक’ हा वृक्ष सुंदर दिसणाऱ्या सदाहरित वृक्षांमध्ये गणला जातो. […]
स्वाती नक्षत्राच्या पावसाचे थेंब शिंपल्यामध्ये पडल्यास ते मोती बनतात, जर ते थेंब पानावर पडले तर दव आणि सापाच्या तोंडात पडले तर त्याचे विष बनते. थेंब पावसाचे आहेत, परंतु जशी सोबत मिळाली तसे रूप बनले. जर एखाद्या पारस दगडाने लोखंडाला स्पर्श केला किंवा त्यात मिसळले तर ते सोने होते आणि जर लोखंडाला पाणी लागले तर जंक पकडतो. आपल सुद्धा तसेच नाही का? जशी संगत धरू तसे जीवन बनवू. पण मनुष्य जीवन मौल्यवान आहे. त्याचे मूल्य आपण जाणून घ्यावे. […]
एखादं शरीर जमिनीत पुरलं की काही काळाने तेही मातीमोल होतं, आपल्या आधीच्या लोकांनी केलेल्या चुका नुसत्या उगाळत बसण्यापेक्षा काही काळा नंतर त्यांना देखील तिलांजली देणं गरजेचं असतं नाहीतर काही जखमा अशा असतात ज्यांना कितीही मलम लावलं तरी त्या सुकत नाहीत, त्या नेहमी ओल्याच रहातात […]
श्रवण भक्ती ज्याची अपार त्याचे कान होती तयार नुसती मान डोले तालासंगी काय कामाची!! अर्थ– शिवशाहीर कै श्री बाबासाहेब पुरंदरे यांनी 96 व्या वर्षी त्यांच्या एका व्याख्यानात मनातलं दुःख बोलून दाखवलं होतं, ते असं ” इतक्या वर्षांनंतर मला आज असं वाटतं की जर मी व्याख्यानं देण्यापेक्षा लिखाण जास्त केलं असतं तर बरं झालं असतं.” काय शिकायचं […]
“ज्ञानेश्वरीतील संगीत शास्त्र -एक चिकित्सक अभ्यास ” या अबोली अमोल सुलाखेंच्या PhD परीक्षेला विद्यापीठातील संगीत -नाटय विभागात उपस्थित राहण्याचा दुर्मिळ योग अमोल सुलाखे नामक “धबधबा ” मित्राने अलवार घडवून आणला. हे सादरीकरण वेगळेच होते. नेहेमीचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नव्हते. निवेदनाला साथ होती -पार्श्वभूमीच्या पूर्व -ध्वनीमुद्रित तानपुऱ्याची ! साहित्य आणि संगीत क्षेत्रातील निवडक दिग्गज उपस्थित होते. […]
गाणपत्य संप्रदायात विजयादशमीच्या दिवशी विशेष पूजनीय असणाऱ्या या शमीच्या मुळाशी निवास करणाऱ्या भगवान गणेशांना श्री शमी विघ्नेश असे म्हणतात. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions