मनात राग, मत्सर, द्वेष अथवा डावलून टाकलेले पुढचे पाऊल हे स्वराज्याच्या विरोधात पडलेले पाऊल म्हणूनच गणले गेले. पण जर सर्वांचे हित, प्रेम, विश्वास टिकवून जर पाऊल पडले अन त्याला नामस्मरणाची साथ मिळाली तर स्वराज्य पुर्ती काही अशक्य नाही. […]
व्यावहारिक जगतातील अशा प्रत्येक अनुभवांनी जीवाला समृद्ध करणाऱ्या , सुख प्रदान करणाऱ्या प्रज्ञा रुपी बुद्धीचे कार्य ज्यांच्या शक्तीने चालते त्या भगवान श्रीगणेशांना प्रज्ञापती असे म्हणतात. […]
काय करायचे आहे हे पक्के झाल्याशिवाय काय करायचे नाही हे कळत नाही. म्हणून आयुष्यात काय करायचे हे ठरवणे महत्वाचे. काय करायचे ठरले की त्याविषयी जिद्द, महत्वाकांक्षा, विश्वास आपोआप निर्माण होतो. पण जर काय करायचे हेच ठरवले नाही तर सगळेच करायचे यावर समय निघून जातो अन हाती काहीच लागत नाही. […]
देवी शारदेचे भगवान श्री गणेशांसह मीलन होते अक्षय तृतीयेला. त्या दिवसाला गाणपत्य संप्रदायात शारदेशमंगल असे म्हणतात. जिच्या उपासनेने भगवान गणेशांची अक्षय्य कृपा प्राप्त होते त्या शारदेच्या प्रियतम असणाऱ्या भगवान गणेशांना तिच्याच नावाने श्री शारदानाथ असे म्हणतात. […]
हुशार, धेय्य वेडा, जिगरबाज व्यक्ती नेहमीच यश संपादन करतो पण, या सगळ्या बरोबर जर समयसुचकता, प्रसंगावधान आणि योग्य संधीची उकल असेल तर यशाबरोबर समाधान सुद्धा प्राप्त होऊ शकते. […]
व्यवहारातील ज्ञानाला विद्या संबोधिले तर या ब्रह्मविद्येला, अध्यात्मविद्येला महाविद्या असे म्हणतात. या महाविद्येच्या द्वारे ज्या ब्रह्माचे निदर्शन केले जाते अर्थात ज्याच्या स्वरूपाचे गुणगाण केले जाते त्या परब्रह्म परमात्मस्वरूप असणाऱ्या भगवान श्रीगणेशांना या महाविद्येचे स्वामी या अर्थाने महाविद्याधीश असे म्हणतात. […]
देवी वागीश्वरी म्हणजे अभिव्यक्त होणारी बुद्धी ज्यांच्या चैतन्य शक्तीच्या आधारे प्रगट होते त्या आत्मरूप भगवान श्रीगणेशांना, त्या वागीश्वरी चे संचालक या अर्थाने वागीश्वरीश असे म्हणतात. […]
प. प. वासुदेवानंदसरस्वतींच्या पार्थिवाला जल समाधी देताना त्यांचे दंड कमंडलू वगैरे त्यांच्या कमरेला बांधून पाण्यात सोडले तेव्हां त्यापैकी काही हातात लागावे म्हणून अनेकांनी नर्मदेत बुड्या मारल्या पण सर्वांच पाणी झालं. हाती काहीच लागलं नाही. […]
कृष्ण हा शब्दच कानावर पडला की चेहऱ्यावर स्मित येते. कृष्ण हा शब्द हा मुळातंच स्थितप्रज्ञ या शब्दाला निर्माण करणारा आहे असे मला वाटते. ज्याच्या पाशी सारं काही मिळवण्याची क्षमता होती त्याने केवळ मार्गदर्शन करावं आयुष्यभर. […]