अनादि कालापासून चालत आलेल्या सृष्टिचा गाडा सुरळित चालविण्यासाठी परमेश्वराने नानाविध अवतार धारण करुन जगताला सन्मार्गाला लावण्याचे कार्य केले. धर्माला आलेली ग्लानी दुर करून, सज्जनांचा सांभाळ केला. प्रंसगानूरुप घेतलेल्या अशा अनेक अवतारावरून त्या त्या देवतेची उपासना सुरू झाली. या उपासनेचा क्रम असाच पुढे वाढत जाऊन, त्यातून मग अनंत पंथ, असंख्य संप्रदाय निर्माण झाले. या असंख्य संप्रदायाचे पुढे अगणित पंथ प्रमुख, धर्मगुरू निर्माण झाले. पुढे याच प्रमुखांचे, धर्मगुरूंचे वारस आणि अनुयायी वाढत गेले. […]
भक्तवत्सल भक्ताभिमानी पुर्णब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा हातून घडणे ही फार मोठी आणि देवदुर्लभ गोष्ट आहे. ज्या स्वामींच्या दरबारात ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवता हात जोडून उभ्या आहेत. लक्ष्मी ही स्वामींचे पाय दाबत आहे. ईंद्र चोपदार झालेला आहे, काळ शरण आलेला असून पडेल ती स्वामी आज्ञा शिरसावंद्य मानत असतो. […]
गंधर्व संगीत श्री वरदविनायक सिध्दगणेशा हे मंगलमुर्ती हे श्रीगणराया घेऊनी सोबत सप्तसुरांना यावे तुम्ही हो श्रीगणराया । शब्द माझीया हृदयी वसती अर्थ शब्दांना तुम्हीच द्यावा द्यावे सूर तुम्ही मम शब्दांना संगीतही द्यावे त्यांना गाया । नाही सूर अन् नाही संगीत काय अर्थ मग मम शब्दांना करितो विनती हात जोडूनी सूरसंगीत तुम्ही द्या गणराया । देता संगीत […]
जय देवा जय देवा जय मोहिनी देवा शरण आलो तुजला सुखी मजसी ठेवा ।। समुद्र मंथन करुनी चौदा रत्ने काढिली सर्व देवांना ती तु अर्पण केली । अम्रुत वाटप करता तंटा बहू झाला वाटप करणेसाठी मोहीनी रुपे तु आला ।। रुप बदलून राहू देवासह आला नजर चुकऊनी अम्रुत प्राशु लागला नजरेतुन तुझ्या तो नाही […]
अक्कलकोट निवासी जगद्गुरू परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र हे सर्वांग सुदंर आहे. स्वामींच्या चरित्राचे पठण केल्याने साधा भोळा प्रांपचिक भक्त ते हटयोगी साधकापर्यंत सर्वांना हवे ते प्राप्त होते. दु:खित, पिडीत, मुमुक्षू जिवांना आधार देऊन दु:ख मुक्त करणारे दीनजनउध्दारक स्वामी महाराज हे केवळ शुध्द भक्तीभाव आणि निर्मळ मनाने केलेल्या अल्प साधनेने ही अतिप्रसन्न होतात. […]
ज्ञानेश्वरांना माणूस फार अचूक कळला होता. या माणसाला जगवण्यासाठी काय ज्ञान द्यावे लागेल हे त्यांना फार चांगले उमगले होते. यामुळेच त्यांनी वेदांमधून कडसून काढलेल्या भगवदगीतेचा भावार्थ सांगायचे ठरवले असावे. तो भावार्थ असावा, अनुवाद नसावा हा त्यांच्या प्रज्ञाचक्षुंचा दूरगामी निर्णय. […]
तुम्ही भलेही कट्टर ‘नास्तिक ‘ असाल , तरी तुम्हास एक विनंती आहे ,हे स्तोत्र (केवळ १०८ ओव्यांचे आहे . तुमचा फारसा वेळ घेणारे नाही ) किमान एकदा तरी वाचा , एक साहित्यिक प्रकार म्हणून किंवा एक चारोळ्याचा संग्रह म्हणून . तुम्ही एका वाचनात ‘आस्तिक ‘ होणार नाहीत ,पण वाचनातून मिळालेला आनंद अप्रतिम असेल याची खात्री मी देतो . […]
अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, कणकवलीचे भालचंद्र महाराज किंवा नागडेबाबा इत्यादी कोणत्याही अवतारांबाबत माझा सखोल असा अभ्यास नसला, तरी एक निरीक्षण आहे आणि ते माझ्यापुरतं खरं आहे हे मला पटलेलं आहे. अर्थात, माझं मत आपल्याला मान्य असायलाच हवं, असा काही माझा आग्रह नाही. मला या अवतारी पुरुषांबद्दल काय वाटतं ते मी या लेखात मांडायचा प्रत्न केला आहे. या लेखातून कोणाच्या भावना दुखावाव्यात असा माझा हेतू नाही. […]
आम्हाला सांगण्यात आले कि राम वनवासातून आयोध्येत याच दिवशी परत आले म्हणून आपण गुढ्या तोरणे उभारतो. पण निषिद्ध असलेल्या बांबूवर ,कडू लिंबाचा पाला लावून ,पालथा तांब्या हे सर्व अशुभ एकत्रित करून “गुढी उभारली जाते हा काय आनंदोत्सव आहे ? खुद्द आयोध्येत अथवा उत्तरेकडील कुठल्याही राज्यात अशी गुढी उभारली जात नाही . […]