नवीन लेखन...

गणपती बाप्पा मोरया

एक विनंती…
श्री गणेशाचे आगमन काही दिवसांवर आले आहे.
घरगुती तसेच सार्वजानिक गणपतींच्या मुर्तिंची बुकिंग करण्यास देखिल सुरुवात झाली आसेल. सर्व गणेश भक्तांना एक विनंती आहे की गणेशमूर्ती बुक करताना मूर्ति फ़क्त श्री गणेशाचीच असावी याची दक्षता घ्या. मूर्ति सोबत ईतर कोणताही देव (साईं बाबा, गजानन महाराज, लक्ष्मी/सरस्वती माता) तसेच कोणताही प्राणी/पक्षी (मच्छी च्या तोंडातील गणपति, गरुडावर बसलेला गणपति) नसावा.

शंकर आणि पार्वती माते सोबत असणर्र्या गणेश मूर्तिचा विचार सुद्धा करू नये. कारण, मित्रांनो विसर्जन करताना आपण या सर्वांचे विसर्जन करतो. हे पूर्णपणे अयोग्य आहे. विसर्जन फ़क्त गणेश मूर्तीचे करायचे असते आणि नकळत आपल्या हातून ईतर देवतांचे विसर्जन होते ते पूर्णपणे अयोग्य आहे. मूर्तिकार एकेक शक्कल लढवून अशा सुंदर आणि सुबक मूर्त्या बनवतात पण आपलं आपण ठरवायचं योग्य-अयोग्य काय आहे.

खाली आपल्या लाडक्या गणेशाच्या आरती चा अर्थ दिला आहे.

आरती चा अर्थ समजुन ती म्हणल्यावर अजुन चांगला देवा प्रतीचा भाव चांगला होतो.

आणि हा अर्थ गणपती बसायच्या आत सगळ्या पर्यंत पोहचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करा.

सुखकर्ता दु:खहर्ता.
म्हणजे :- (सुख देणारा दुःख हरण करणारा)

नुरवी
म्हणजे :-दुःखाचा समुळ नाश करतो.

पुरवी प्रेम कृपा जयाची.
म्हणजे :-त्याची कृपा झाली की प्रेमवर्षाव. भक्ताला लाभ होतो.

कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।।१।।
म्हणजे :- त्याच्या कंठात मोत्याची माळ झळाळत आहे ।।१।।

जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।
दर्शनमात्रे मन : कामना पुरती ।।धृ।।
म्हणजे:-हे देवा ,तुझा जयजयकार असो !
तु मंगलाची प्रत्यक्ष मूर्तीच आहेस । तुझ्या केवळ दर्शनानेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ।।धृ।।

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
म्हणजे:- हे गौरीकुमारा रत्न जडवलेला मुकुटाचा पुढील भाग तुझ्या कपाळी आहे ।

चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
म्हणजे :-कुंकू आणि केशर मिश्रित चंदनाची उटी तु लावली आहे ।

हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
म्हणजे :-हिरयानी जडलेला मुकुट तुझ्या मस्तकावर शोभून दिसत आहे.

रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ।।२।।
म्हणजे :-तुझ्या पायांतील वाळ्यांतील घूंगरां चा रुणझुण असा मंजूळध्वनी होत आहे ।।२।।

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
म्हणजे :-मोठे पोट असणारया ,पीतांबर नेसलेल्या, कमरेला नागाचे बंधन (कडदोरा) असलेला.

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
म्हणजे :- सरळ सोंड व वाकडे तोंड असणारया,म्हणजे वक्रमार्गाने (वाईट मार्गाने) चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करुन त्याना सरळ मार्गावर आणणारया, त्रिनयना (३ नेत्र असणारया).

दास रामाचा वाट पाहे सदना ।
म्हणजे :- हे गणपते मी रामाचा दास ( समर्थ रामदासस्वामी) माझ्या घरी मी तुझी आतुरतेने वाट पहात आहे.

संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।।३ ।।
म्हणजे :- हे सुरवरवंदना – सर्वश्रेष्ठ देवां कडून वंदिल्या जाणारया हे गजानना, सर्व संकट प्रसंगी तु मला प्रसन्न हो. माझा संभाळ कर.

निर्वाणी – अखेरीच्या, देहत्यागाच्या वेळी तु माझे रक्षण कर ही तुझ्या चरणी नम्र प्राथना .

— समर्थ रामदास स्वामी.

((संदर्भ :- आरतीसंग्रह अर्थासह सनातन लघुग्रंथ )).

लक्षात ठेवा ‘संकटी’ पावावे संकष्टी नाही

तुमच्या आयुष्यातला आनंद विघ्नहर्त्याच्या कानाइतका विशाल असावा.

अडचणी उंदराइतक्या लहान असाव्यात.

आयुष्य त्यांच्या सोंडेइतके लांब असावे

आणि

आयुष्यातले प्रत्येकक्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत.

॥गणपती बाप्पा मोरया॥

 

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..