नवीन लेखन...

देवपूजेतील अंतिम उपचार – मंत्रपुष्प – भाग ३ 

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग १०६
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक ११
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ६२

आवाहनं न जानामी न जानामि विसर्जनम् !
पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर

“हे सर्वेश्वरा !
मला तुला कसे बोलवावे ते कळत नाही. तुझे विसर्जन कसे करावे याचीही पूर्ण माहिती नाही. मधे कोणते उपचार करतात, याचे काही नियम असतील तर ते मला माहिती नाहीत. मंत्र, क्रिया, भक्ती याचेही मला परिपूर्ण ज्ञान नाही. तरीपण मी शुद्ध अंतःकरणाने केलेली ही पूजा तू मान्य करून घे.

तुझ्या दर्शनाने, पाप, दुःख, दारिद्र्य नष्ट होते. सुख संपत्ती यांची वाढ होते, ज्यांनी तुला अनुभवले आहे ते सगळेच जण असेच सांगत असतात.

हे देवा , मी तुला मनापासून शरण आलो आहे. माझे तू रक्षण कर. माझ्या हातून अनेक चुका अपराध घडत असतात. तरी हे देवा, तू उदार अंतःकरणाने या दासाला क्षमा कर.”

अशी प्रार्थना परमेश्वराला पूजा समाप्त होताना केली जाते.

उपचार पाच असोत, वा सोळा. हा दैनंदिन दिनचर्येचा भाग आहे. रोज पूजा करीत असताना, तेच कर्म रोज रोज करत असताना सुद्धा तीच क्षमायाचना परत परत का करायची ? त्या चुका कधी सुधारण्याचा प्रयत्न केला नाही का ? उत्तरे शोधण्याचा प्रयास, किंवा चुका जाणून घेण्याचा अभ्यास केला नाही का ? असे प्रश्न मनात निर्माण झाले.
आपल्याच परमेश्वराची पूजा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला नाही, म्हणून ही क्षमायाचना.

पूजेचं सोडून द्याहो, एकवेळ पण आपण आपल्या जीवनाकडे तरी एवढ्या गांभीर्याने पाहिले आहे का ? त्याबद्दल कधी कोणाची क्षमा मागायची वेळ आली तर क्षमा मागायची कोणाची असा प्रश्न निर्माण होईल.

माझा जन्म कशासाठी झाला आहे ?
मी ज्यांच्या पोटी जन्म घेतला, त्यांचा आणि माझा ऋणानुबंध काय आहे ?
माझे या जन्माचे इति कर्तव्य काय आहे ? माझ्या मृत्यूचे रहस्य काय आहे ?
मी जगून काय मिळवायचे आहे ?
आणि जगण्यासाठी मी काय करायला हवे ?
याचेही ज्ञान मला नाही. मला नेमके काय करायचे आहे, हे मला शेवटपर्यंत कधी कळलेच नाही. शेवटपर्यंत म्हणजे मृत्यु समोर दिसेपर्यंत.

जगण्याचा एकही नियम मला माहिती नाही, त्यामुळे मृत्यु म्हणजे नेमकं काय हेच मला जगताना कळले नाही. तो जाणून घेण्याचा प्रयत्न मी कधी केलेला नाही. त्यामुळे माझ्या या जगण्यामध्ये असंख्य चुका प्रज्ञापराध होत असतात. नियम तोडले तर त्याचे प्रायश्चित्त म्हणून मला रोग भोगावे लागतात. आणि एक रोग कमी करत असताना, त्याच त्याच चुका करीत राहिल्याने नवीन रोग जन्माला येत आहेत. त्याच त्याच चुका होत राहिल्याने पुनरपि जननम पुनरपी मरणम् हे चक्र कधी संपलेच नाही.

हे परमेश्वरा, मला या जन्ममृत्युच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचे आहे. यासाठी मला तू अंतिम सत्य सांग. मला एवढे कळते आहे, की माझे अंतिम सत्य तूच आहेस. तरीदेखील माझी बुद्धी मला वेळोवेळी तुझ्यापासून लांब नेते. माझ्या बुद्धीला तू स्थिर बनव.

निरोगी आयुष्याचा खरा अर्थ मला समजावून देण्यास केवळ तूच समर्थ आहेस. हे मला आता उमगले आहे. ही पण तुझीच कृपा आहे.

— वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
२६.०७.२०१७

आजची आरोग्यटीप

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..