नवीन लेखन...

आजचा आरोग्य विचार – भाग एकोणतीस

५८. डोक्याचं लालभडक कुंकु गेलं पण तोच लालभडकपणा डोक्यावरून उतरून ओठावर येऊन चिकटला. लिपस्टीक लावण्याने ओठ अधिक आकर्षक दिसतात. आपण सुंदर दिसावं. पण आपल्याकडे कुणी वाईट वासनामय नजरेनं बघू नये, शृंगार एवढा सोज्वळ असावा. हा झाला भारतीय दृष्टीकोन.
आणि प्रत्येक स्त्री पुरूषाचं लक्ष आपल्याकडेच वेधलं जावं यासाठी केलेला भडक आणि कडक शृंगार नक्कीच अभारतीय आहे.
हे नवीन पिढीला पटणार पण नाही, आणि पचणार पण नाही. त्यात काय एवढं असं म्हणून ओठाचा चंबू करून सेल्फी काढायला निघून पण जातील.
सोज्वळपणा, शालीनपणा ही भारतीयत्वाची ओळख आहे असं म्हटलं तरी चुक ठरणार नाही.

५९. सौंदर्याचे मापदंड ३६२४३६ या नियमात बसवले ते काय भारतीयांनी ? आणि या मापदंडात बसविण्यासाठी स्वतःला औषधांमधे बुडवून घेणारी मायारूपी चित्रनगरी.
एका बाजूने मनावर साधा संयम आणता न आल्याने व्यसनामधे बाथटबपर्यंत आकंठ बुडून गेलेली दुनिया….
तर दुसऱ्या बाजूने स्वतःला, स्वतःच्या वाढत्या वयाला जगापासून लपवून ठेवायला भाग पाडणारी सौंदर्य प्रसाधने, नको तेवढे डाएटींगचे फॅड आणि अघोरी शस्त्रक्रिया….
हे सर्व अभारतीय आहेत. एवढे फक्त लक्षात यावे.

सुंदर दिसण्यासाठी काय करावे, याचे भारतीय मापदंड वेगळेच आहेत.
पूर्वी स्वयंवर व्हायची तेव्हा राजकन्या कोणता वर निवडायच्या ? त्यात केवळ बाह्य सौंदर्याचे मापदंड नव्हते !
तर जीवनातील कर्तृत्व, नजरेतील तेज, स्वभावातील शालीनता, वागण्यातली सज्जनता, बाहुंचा पराक्रम, मनाची क्षमावृत्ती, व्यवहारातील प्रामाणिकपणा, व्यवसायातील सचोटी, आणि बलदंड शरीर. असे काहीसे मापदंड होते.

आमचे आदर्शच बदलून गेलेत. झगमगत्या पाश्चात्य सिनेसृष्टीतील नट नट्या, हेच आजच्या पिढीचे आदर्शाचे मापदंड बनल्याने माझे व्यक्तीमत्व कोणा एका भारतीयासारखे व्हावे, असा आदर्श भारतात शिल्लकच नाही काय ?

आज पाश्चात्यांचे गुलाम झाल्याने आमचे व्यक्तीमत्व विकासाचे मापदंड आम्ही कधीच कालबाह्य करून टाकलेत. त्यामुळेच एका सिनेमार्त॔डाच्या संशयास्पद निधनापुढे शंकराचार्यासारख्या एका धर्ममार्तंडाचे निर्वाण झाकोळले गेले.

होलिकादेवीची पूजा असणाऱ्या भारतीय होलिकोत्सवाचा आम्ही अगदी पार पाश्चिमात्य शिमगाच करून टाकला आहे.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..