नवीन लेखन...

राजकारण, राजकीय व्यक्ती, राजकीय पक्ष यासारख्या विषयांवरील लेखन

काश्मिरी पत्रकारांचा अहवाल फुटीरवाद्यांना अनुकूल

लष्कर-सीमा सुरक्षा दल आणि पोलिसांनी गेल्या वर्षभरात दहशतवाद्यांचा बंदोबस्त केल्यामुळे, काश्मीर खोर्‍यात शांतता आणि निर्भयतेचे वातावरण आहे. परिणामी यावर्षी भूलोकीचे हे नंदनवन परदेशी आणि देशातल्या पर्यटकांनी गजबजले आहे. राजधानी श्रीनगरमध्ये हजारो स्त्री-पुरुष पर्यटक रात्री उशिरापर्यंत शहरातून फेरफटका मारतात. पर्यटकांच्या वाढत्या संख्येने राज्याच्या पर्यटन उद्योगालाही चांगले दिवस आले आहेत. हजारो काश्मिरी नागरिकांना रोजगारही मिळाला.
[…]

मंत्रालयाच्या आगीपासून धडा घ्या! नागपूरला खर्‍या अर्थाने उपराजधानी करा!

मंत्रालयाला लागलेल्या आगीत सरकारची आपत्कालीन संरक्षण यंत्रणा भस्मसात झाली. आणीबाणीच्या प्रसंगी ज्या यंत्रणेवर विसंबून राहावे, तीच आपत्तीची बळी ठरत असेल, तर मुळातच कुठेतरी भयंकर चूक होत असल्याचे मान्य करावे लागेल. हा संदर्भ केवळ मंत्रालयाच्या आगीपुरता मर्यादित नाही. या सरकारच्या धोरणाने संपूर्ण राज्य आणि त्यातही गरीब शेतकरी वर्ग अगदी नेमाने संकटाच्या आगीत होरपळत असतो. त्यातही विदर्भातील शेतकर्‍यांची दैना अधिकच अस्वस्थ करणारी आहे. सरकारने आपले अर्धे मंत्रालय नागपूरला हलविले, तर किमान या शेतकर्‍यांना हे सरकार आपल्यासाठी काही करू इच्छिते याचे समाधान तरी लाभेल.
[…]

मेकालेच्या शिक्षणाने आमच्या संवेदना शून्य केल्यात..!

इंग्रजांना हद्दपार करून ६५ वर्षे झालीत, भारतीयांच्या संवेदना नष्ट करणाऱ्या लॉर्ड मेकालेच्या कथित शिक्षण पद्धतीला केव्हा हद्दपार करणार आहोत ? जाती, धर्म,पंथ, प्रांत, भाषा या शुल्लक बाबींवरून लढण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या कलंकाला केव्हा पुसणार आहोत ?
[…]

“अभिनंदन,आमीर खान तुझे त्रिवार अभिनंदन…!!!”

‘आमीर खानने माफी मागावी’ अशी मागणी करणाऱ्या डॉक्टरांनी, फसवेगिरी करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाही करण्याची मागणी कधी केली काय ? लोकांचा जनआक्रोश ओढवून घेईपर्यंत डॉक्टरांनी हे प्रकरण ताणू नये, अन्यथा त्याचे परिणाम निश्चितच भोगावे लागतील. यापूर्वी योगगुरु स्वामी रामदेवबाबांनीही वैधकीय व्यवसायावर वारंवार कोरडे ओढले, आणि सत्य जगासमोर मांडले आहे. […]

म्यानमार भारत संबंध :चीनची भारतावर मात

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेल्या म्यानमार भेटीला विलक्षण महत्त्व प्राप्त झाले. पंचवीस वर्षांनंतर म्यानमारला भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. आँग स्यान स्यू की यांच्या लोकशाही लढ्याची फलनिष्पत्ती होत असताना भारताने म्यानमारपुढे केलेला मैत्रीचा हात महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. महत्त्वपूर्ण करार करून मनमोहन सिंगांनी मुरब्बीपणा दाखविला आहे.
[…]

वादग्रस्त एनसीटीसी…

देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शासन सध्या आस्तत्वात असलेल्या संस्थांना सक्षम करण्याचे जाहीर करते, त्यासाठी समित्या नेमते, समित्या अहवाल देतात, पण अंमलबजावणी शून्य. त्याची चर्चा पुन्हा दुसरा दहशतवादी हल्ला झाल्यावरच होणार. राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचेही असेच होणार असेल तर त्याची गरजच काय?  यांना आपण का सक्षम करत नाही. त्यांना आधुनिक तंत्रज्ञान असलेली उपकरणे, वाहतूक तसेच शस्त्र का पुरवले जात नाही? ज्या संस्था आस्तत्वात आहेत त्यांनाच जर आपण सक्षम करू शकत नसू तर त्यात आणखी एका संस्थेची भर घालण्याची आवश्यकताच काय? 
[…]

चीनची आर्थिक घुसखोरी

आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने वर्चस्ववादी भूमिका घेणा-या चीनचे व्यापारीही आता दादागिरी करू लागल्याचे दिसते. आपल्या वस्तू घेण्यास भाग पाडायचे आणि नंतर पैशाच्या वसुलीसाठी पठाणी मार्ग अवलंबायचा. शांघायजवळील यिवू शहरात एस. बालचंद्रन या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याचा झालेला छळ हा त्याच मानसिकतेचा परिपाक म्हटला पाहिजे.
[…]

“औद्योगिक अस्पृश्यता आणि फाजिल उत्सवप्रियता”

मी मायमराठी प्रेमळ व तेजाळ संस्कृति रक्तातच भिनलेला आहे! तेव्हा उत्सवप्रियतेच्या विरूध्द टोकाची भूमिका घेणारा आहे, असा गैरसमज कृपया होऊ देऊ नका. फक्त माझी अट एवढीच आहे की, कंत्राटदारीसारख्या मुख्य व मराठी घरं नासवणार्‍या इतर अनेक अवदसांना (कॅपिटेशन फी घेणारे शिक्षणसम्राट, भ्रष्ट नोकरशहा व राजकारणी इ.) लाथ मारून बाहेर काढून मराठी घरांमधून ’गोकुळ‘ निर्माण झालं पाहिजे, गणपतीच्या रिध्दी-सिध्दी परप्रांतियांच्या नव्हे, तर प्रथम आमच्या घरात पाणी भरताना दिसल्या पाहिजेत […]

अन्याय्य ’मजूर-कंत्राटदारी‘ प्रथेचा निषेध

तुम्ही ‘पांढरपेशे‘ आहात की ‘श्रमजिवी‘ आहात, याच सद्यस्थितीतील ‘कंत्राटदारी‘ नावाच्या अमानुष ‘शोषण-तंत्राला काहीही सोयरसुतक असण्याचं कारण उरलेलं नाही! १ते२ टक्के निर्दय बुध्दिमंत बाळांनी व राजकीय मनगटशहांनी चालविलेल्या, या आधुनिक सरंजामदारी व्यवस्थेनं उत्पादन, सेवा इ. सर्वच क्षेत्रात धुडगूस घातलाय.
[…]

1 34 35 36 37 38 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..