नवीन लेखन...

बाई

एक बाई पाहिजे… घराला मायेच घरपण देण्यासाठी, चार भिंतींना बांधून ठेवण्यासाठी एक आई पाहिजे… संस्कारांची शिदोरी देण्यासाठी, मायेनं कुशीत घेण्यासाठी एक ताई पाहिजे… हक्काने पाठीशी घालण्यासाठी, मनातलं गुपित सांगण्यासाठी एक उमलती जाई पाहिजे… आपलं बालपण पाहण्यासाठी, प्रेमाचा झरा वाहण्यासाठी एक जाईची आई पाहिजे… आपलं सुखदुःख वाटण्यासाठी, साठीला साथ देण्यासाठी एक मायेची अंगाई पाहिजे…. निवांत घरट्यात विसावण्यासाठी, […]

हळव्या अबोल मनाचे

हळव्या अबोल मनाचे चांदणे ते निरागस रात्रीस होतात अनेक भास आत खोलवर.. तुटतो तारा आकाशातून हलकेच मग एक मन कुणाचे मोडते न कळे काही कुणास.. क्लेश मनास खोलवर अनेकदा अबोल होता मोह होतो अलगद मग नकळत मनात तेव्हा.. कुणी आनंदी हसरे सुखी आयुष्यात असता कुणाची कथा तुटत्या ताऱ्यासारखी आल्हाद विखुरता.. नकोच कुठला अंतरी लोभ, मोह, माया […]

शेवटी जगणं सोडू नको

जाणिवा ओल्या हव्या सखे शब्दांचं कोरडेपण नको शुभेच्छा ते श्रद्धांजली एकाच मापात तोलणं नको दिवसामागून रात्री जातात तसेच प्रहर ढकलू नको एक एक क्षण जगून घे शेवटी राहीलं जगायचं असं नको भेटून घे हवं त्याला नुसते आभासी चेहरे नकोत नाहीतर किमान बोलून बघ फक्त लेखणीचे खेळ नकोत माझ्यातला ‘मी’ शोधून बघ एकांत हवाचं एकटेपण नको छंदांत […]

चिऊताई

चिऊताई चिऊताई भिजतोय गं मी, दार उघड तू नको माझ्या घरात,जा कुठेतरी दड चिऊताई चिऊताई कुडकुडतोय गं मी, दार उघड उठ जा इथून रे, मला नाही सवड चिऊताई चिऊताई खिडकीचे तरी कवाड उघड खिडकीतून येईल पाणी नकोचं ती धडपड चिऊताई चिऊताई मनाचे तरी दार उघड मला ऐकायचीचं नाही तुझी बडबड चिऊताई चिऊताई मी गेलो, आता तरी […]

एकदा कोणी तरी आयुष्यात असे भेटावे!

एकदा कोणी तरी आयुष्यात असे भेटावे! दुःख न सांगता मन हलके व्हावे, पुन्हा दुःखाला सामोरे जावे.. एकदा कोणी तरी आयुष्यात असे भेटावे! दुःख त्याचे अश्रू माझे असावे त्याचे दुःख मी ओंजळीत धरावे.. एकदा कोणी तरी.. आयुष्यात असे भेटावे, वाट तो पाऊल मी व्हावे चालता चालता थकावे, आधारासाठी त्याच्याकडे पहावे.. एकदा कोणी तरी आयुष्यात असे भेटावे, उन्ह […]

वठलेल्या वडाला मोह

वठलेल्या वडाला मोह आम्रतरुचा झाला आहे काष्ठवत फांद्यांवर पर्ण पिसारा फुलून आहे.. मनातील सारे न कळून आहे प्रेमाच्या सावलीत भाव रडून आहे दुःखाच्या मागे व्यथा निःशब्द आहे वठलेला वड आज फकीर आहे.. न कळत्या दुःखाना वेदनेची अस्पष्ट करुण किनार आहे मरणाची वाट जवळ येईल कधीही अंतरात दुःख विरजून अनामिक आहे.. आम्रतरुचा झोका मदमस्त एकाकी वड उन्मळून […]

खरी संक्रात

आज संक्रातीचा गोड सण शुभेच्छांसाठी आला ताईचा फोन सांगे खुशाली अन मोकळे करे मन जिवाभावाच्या गोडव्याचा सण आज संक्रातीचा गोड सण सांगे ती केलीत घरी, किती पंचपक्वान्न सुग्रास ताटभरुन आहे इथे अन्न सोबतीला आहे पुरण नि वरण आज संक्रातीचा गोड सण विचारे आता खुशाली भाच्याला पण सांग म्हणे काय छान जेवलास जेवण केलेस का नवे कपडे, […]

वासनेचा बाजार

तिच्या शरीरावरील जखमांच दुःख सहज न दिसतं देह विक्री करतांना मात्र तीच मन रोज मरतं.. चारचौघीसरखं सामान्य जगणं तिलाही नक्कीच हवं असतं पांढरपेशा दुनियेत मात्र तीच अस्तित्वही डागाळलेलं असतं.. ती ही असते एक सजीव स्त्री हेच दुनियेत विसरल जातं रोज नव्याने शरीर विकतांना भावना मारणं नशिबी उरतं.. ती ही असते एक कोमल स्त्री पण पुरुषी वासनेत […]

भोग

तुला जाणवल कसं माज जगणं, सोसणं वाट पाहून राह्यले कधी सरल ह्ये जिणं घाम गाळू तरी किती किती जुंपू गं कामाला दिस सरूनही जातो थार नाही गं जीवाला तुज्या अंगणी सडा गं जाई जुई चमेलीचा कशी गुंफू केसात गं गुंता घामाच्या बटांचा सण येती आणि जाती बाया जिवाने नटती बघू बघू तुटती गं काया उनात रापती […]

नेणिवांच्या पलीकडे जाणिवांच्या आधी

नेणिवांच्या पलीकडे जाणिवांच्या आधी फुलले क्षण भाव विभोर मनात काही कसली चाहूल मनात काहूर का उठती मीच मला शोधते हरवले अंतरी गुज काही भाव कल्लोळ अंतरात मन ओढ कशाची न कळत लोचनात आपोआप दाटे पाणी मोगऱ्याचा घमघमाट अंतरात वेढून जाई हसले लाजून कुणी ते लाजणे हृदयस्थ होई स्पर्श मोहक खुणावतो निःशब्द काही वेळूच्या बनी मुरली मोहक […]

1 83 84 85 86 87 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..