नवीन लेखन...

मुक्त मी

मोकळं ढाकळं बोलली म्हणून तिला स्वैर समजू नकोस बिनधास्त व्यक्त झाली म्हणून तिला बदफैल ठरवू नकोस स्वतंत्र अस्तित्व बाळगते म्हणून तिला बेजबाबदार मानू नकोस आभूषणे, पेहराव असा म्हणून हिणवून कावळ्यागत टोचू नकोस मनात तिच्या जरा डोकावून बघ कपड्यावरून मापं मोजू नकोस स्त्री असण्याआधी ती माणूस आहे एवढं किमान कधी विसरू नकोस!! — वर्षा कदम.

कुणी कुणाचं नसत

कुणी कुणाचं नसत, फक्त मन आपलं असतं. सुखाचे सोबती खूप असतात! दुःखात वाटेकरी कुणी नसतात. प्रत्येक टप्पा इतरांसाठी असतो, मग आपलं जगणं कुणासाठी असतं? इच्छा,मोह पण आपले नसतात मनाच्या ताब्यात ते दडलेले असतात! काही अस स्वतःच माणसाचं आयुष्यात शाश्वत असं नसतं. तरीही आयुष्यभर माझं,माझं म्हणुन माणूस त्यात गुरफटतो! जीव देणारा,नेणारा सूत्रधार दिसत नाही कधी, पण अस्तित्व […]

कवीचा जन्म

रणरणत्या ग्रीष्मास सोसता केलीस एक कविता, इथेच जन्म झाला एका कवीचा कोसळत्या धारा झेलून, किळस नाहीं चिखलाचा वेड्या हाच श्रावण ओलेत्या कवितांचा शोधशी सौन्दर्य पानापानांतून, पान गळताना…. दुखावणारा होई हळव्या मृदू मनाचा दिवस रात्रीचे, जगरहाटीचे बंधन झुगारणारा त्या काळावर स्वार होणारा स्त्री पुरुष ही जात नाहीं भेदभाव मानणारा होई ममत्व बाळगणारा भावना नऊ रसांच्या उत्कट दाटता […]

कुंद कळ्यात प्रीत बहरुन आहे

कुंद कळ्यात प्रीत बहरुन आहे धुंद फुलांत गंध मोहरुन आहे मोहक स्पर्शात भाव मुग्ध आहे केतकीच्या बनात मोर नाचरा आहे आरक्त लोचनात आठवण भरुन आहे गंधित स्पर्शात तन बेधुंद हलकेच आहे अलगद अंतरात गुज अलवार आहे स्वर अबोल सारे लय गुफूंन आहे स्वातीचे शब्द रसिकांच्या मनात आहे स्वातीचे सर मोती रसिकांच्या हृदयात बंदिस्त आहे — स्वाती […]

गरिबाघरचा पाऊस

पावसात नेहमीच शोधू नका प्रेमाची हवा कधी वळून माज्या गळक्या छताकडेही पहा टपटप गळतंय आभाळ लावू कुठं कुठं ढिगळं, घर वाहतंय हो माझं जरा पहा यावेळी डांबर, सिमेंट कि ताडपत्री कसं नि काय परवडलं कि घेऊन जाईल समदं ही वादळी हवा भांड्यानी भरलं घर, ओघळ वाहती जागोजागी कशापायी येतो पाऊस सालाची बेगमी होई माती दरसाली असं […]

बोलणं

बोलणं म्हणजे काय तर मनातील भावना व्यक्त करणं!अगदी साधं, सहज,सुंदर,रागाचं,लोभाचं कसही असावं,पण बोलणं असावं. शब्द आणि त्याचे अर्थ इतके सुंदर असतात. की मोह पडावा असे.माणसाने प्रत्येक वेळेला व्यक्त व्हायला हवे असही काही नाही.कधी समोरच्याचे विचार,बोल ऐकणं हे पण खूप सुंदर असतं…. प्रत्येकाला मन असतं,आणि त्या मनात सतत काहींना काही चालू असत. वेगवेगळ्या भावनाचं कल्लोळ होणं म्हणजे […]

फुलता पारिजात

सांगू कशी वाऱ्याला थांबव तुझे आघात गारवा फार सुखावे झोम्बे नुसता झंझावात सांगू कशी रजनीला उतरू नकोस चांदण्यात सारे शीतल वाटे मन फुलता पारिजात सांगू कशी धरतीला न्हाऊ नकोस पावसात मृदगंध अत्तर कोठे सापडेल या जगतात सांगू कशी मनाला झुलू नकोस आनंदात सारे घडे मनाजोगे संपेलच विरहाची रात्र!! — वर्षा कदम.

प्रीत

अशा झुंजूमुंजू समयी सखया याद तुझी यावी केशरी लाली नभाची गाली माझ्या चढावी कलकलाट कोकिळेचा तीव्र असा होत जाई आठवे ती हुरहूर सारी मन कातर कातर होई ओढ अशी कशी ही बाई जग सारे विसरून जाई कधी पुन्हा भेट अपुली जी होता होत नाही ये एकदा तू परतुनी मनी चिंब ओलावा लेउनी शुष्क कोरडी ही माती […]

एक नातं

एका धाग्याची रे वीण एका नात्यात रे जिणं गाठ बांधून पदरी आले आता तुझ्या घरी एका खोप्याचं जगणं तुझं माझं काही देणं जीव जीवाला जागलं सारं मायेनं झाकलं एका दु:ख काही घाव दुजा सारखाच भाव आता नाही रं वेगळं सारं मीपण गळं नातं नवं, नवी दिठी पर अशी कायम राहो विटी कुणी हटलं, म्हटलं तरी राहो […]

आठवण

आज सख्या रे मी खरेच तळमळले आठवणीने तुझिया आतून हळहळले एक लकेर ‘त्या’गाण्याची अन क्षणात प्रीतीचे अपुले ऋतू मज स्मरले तो किनारा एक सळसळता अन वाळूत दोघांचे होते ठसे उमटलेले मूक एक शेवटची भेट अन हातात हात अखेरचे घट्ट गुंफलेले पापण्यांच्या कडा ओलेत्या अन चिंब धारा त्यात आपण भिजलेले किती रे ऋतुमागून ऋतू हे सरले आहे […]

1 85 86 87 88 89 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..