नवीन लेखन...

सुखाचा छंद

सुखाचा छंद,न लागो जीवाला आहे तो निवारा, अपुला बरा मोहविते कायम, सुखाची जरतार वेदनेचे ठिगळ, मिरवूया जरा सुखावते सारे,फुलणारे रंगपिसारे एकचि रंग सावळा, अपुला बरा दुखावते मन, यातना कठीण गोंजारु तयाला, लाडाने जरा सुख हे क्षणिक, मृगजळ जाण शोधावा निवारा, समाधानी खरा तुझे माझे काही, कमी नि अधिक आहे त्यात सुख, मानावे जरा! — वर्षा कदम.

नाते असे जोडा लोकांशी

नाते असे जोडा लोकांशी नित्य आठवण मनात, कुणी बोला काही वागा काही आनंद कायम राहो हृदयात.. निरपेक्ष करावी भक्ती स्वामी सोडवतील चिंता, करावे स्मरण मनात सदा गजानन महाराज करतील कृपा.. ठेवावी नितांत भावपूर्ण श्रद्धा अक्कलकोट असेल स्वामींचा वास, घ्यावे दर्शन शेगावी गजानन महाराजांचे राहील माथ्यावरी महाराजांचा कृपाहात.. — स्वाती ठोंबरे.

मुखवटा

मुखवटे स्वतःचे चक्क फाडून द्यावे कि कुणाला तरी उधार जरा द्यावे जगाला, नात्याला चांगले ते दिसावे उरात दुःख बाळगून खोटे उगी हसावे चेहरा आर्त वेदनेचा न कुणाला दिसावा कृत्रिम रंगलेला रोज मुलामा चढवावा टांगते झुले ते भूत भविष्याचे सुरक्षित झापडांचा मुकुट मिरवावा नको नकोसे होते न सापडे खरा निवारा जेथे मिळे तेथे वारा स्वार्थाचा वाहणारा!! — […]

लुब्ध प्रीतीत भाव लपून आहे

लुब्ध प्रीतीत भाव लपून आहे सांग दर्पणा चेहेरा मूक का आहे? प्राजक्त फुलांत गंध बहरुन आहे सांग रातराणी हितगून तुझे अबोल का आहे? प्रत्येक प्रश्नास उत्तर कधीच नसते सांग सखे मग तू काय शोधत आहे? नजरेतल्या भावनांचे अर्थ मिटून आहे नात्यांत प्रेम माया का हरवून आज आहे? प्रत्येक अर्थाचे पड अंतरात व्यापून आहे न कळतात जाणिवा […]

अलिप्त

माझी लेखणी काही बोलते मनातलं पानांवर उतरवते शब्दांतून जाणिवा देते पण मी मात्र कधी बोलत नाही… माझी चित्र काही बोलतात हवी ती रंग छटा रेखाटतात चित्रातून भावना पोहचवतात पण मी मात्र कधी त्यात रंगत नाही…. माझे फोटो काही सांगतात हळुवार फुलांचे रंग वेचतात नजरेपल्याडचे दृश्य टिपतात पण मी मात्र त्यात कधी दिसत नाही माझी कला काही […]

उमलत्या फुलांत गंध सारे

उमलत्या फुलांत गंध सारे अलगद बेधुंद मन व्यापून आहे मोगऱ्याचे आल्हाद धुंद बहरणे जीव गुंतून हलकेच बावरुन आहे कळ्यांचे गाणे फुलांशी जोडले आहे नाजूक कळ्यांत श्वास वेढून आहे पानांत हिरव्या मन ओलं जपून आहे मोहक निशिगंध अंतरी फुलून आहे लाजून अबोली केसांत माळून आहे ओल्या स्पर्शात प्राजक्त गंधाळून आहे प्रियेचे लाजणे रातराणीत लपून आहे प्रेमाचे प्रतीक […]

हिशोब

एक दुखरी नस प्रत्येकाला दिलीय देवाने नको उतू मातू इतका लपेटून अहंकाराने आपल्या पोटापुरते कमव कि स्वाभिमानाने ओरबाडतोस कशाला दुसऱ्याचे सुख दोन्ही हाताने कितीसे लागते जगण्या चूल पेटतेच कष्टाने भाकरी पायी उगा कशाला भरतो घड्यावर घडे पापाने हिशोब नोंदला जातोच यावर विश्वास ठेव मनाने उडवू नको वाचेची धूळ सोडव प्रश्न मौनाने!! — वर्षा कदम.

एकदा तुझी नी माझी भेट व्हावी

एकदा तुझी नी माझी भेट व्हावी व्यक्त भावनांची वेल सजावी एकदा तुझी नी माझी भेट व्हावी डोळ्यांतल्या अश्रूंची मोट तुला कळावी एकदा तुझी नी माझी भेट व्हावी निःशब्द साथ हळुवार वीण उलगडावी एकदा तुझी नी माझी भेट व्हावी मनातल्या खुणांची एकजूट व्हावी एकदा तुझी नी माझी भेट व्हावी अलगद मोहर तुझी अंतरी फुलावी एकदा तुझी नी […]

मी म्हणता

माजाचे मुखवटे का असे आता गळाले का कुणी त्यांना सत्याचे आरसे दाविले मी म्हणता मी मध्ये आत आत बुडाले दलदलीत अहंकाराच्या जात जात निमाले गडगंज धनाने का कुणा असे राज्य मिळाले कितीकांचे कवड्यांमध्ये काचेचे महाल जळाले करतो मी, करतो मी करीत कर्म हे जमविले कर्माचे भोग भोगण्या मग आता का पळाले तुझ्या सारखे कितीक आले आणिक […]

कळ्यांचे दुःख फुलांना न कळले

कळ्यांचे दुःख फुलांना न कळले रविकिरणांचे दाह धरणीला न कळले नदीचे संथ वाहणे सागराला न कळले गरजणाऱ्या ढगांचे दुःख सरींना न कळले तिच्या जणीवांचे पड त्याला न कळले त्याच्या मनाचे गुज तिला न कळले मनातले भाव हृदयला न कळले अंतरीचे दुःख मनाला न कळले त्याच्या भावनांचे कोडे तिला न कळले तिच्या मनाचे बंध त्याला न कळले […]

1 84 85 86 87 88 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..