कोलाहल
कसा ? व्यक्त करावा कोलाहल मनभावनांचा विषण्ण व्याकुळ उसासे दृष्टांत ! सत्य जीवनाचा ।।१।। मूक भोगणे मनगाभारी वास्तव ! हेच जीवनाचे श्रद्धा , अश्रद्धांचेच द्वंद अकल्पी दृष्टांत जीवनाचा ।।२।। सत्य ! असत्य ! संभ्रमी उद्दिष्ट सारेच स्वस्वार्थी जाहल्या बोथट संवेदना निर्जीव अर्थ जीवनाचा ।।३।। कुणीच कुणाचे नसते ब्रह्माण्ड ! मृगजळ सारे जगणेच केवळ फुकाचे ध्यास उगा […]
