नवीन लेखन...

चहा

लवंग, आले दालचिनीचा सुगंध सारा भरून घ्यावा डोळे मिटूनि निवांत रेलून घोट चहाचा हळूच घ्यावा वेळ असो दुपार तीनाची की पहाटेचा असो गारवा चहास का लागे निमित्त कोणते? कधीही द्यावा कधीही घ्यावा चाहते असे चहाचे मिळता योग दुर्मिळ जुळून यावा स्थळकाळाचे बंधन सोडून मस्त गप्पांचा फड रंगावा मात्र एकट्या सांजवेळी घोट चहाचा हळूच घ्यावा पापणीतल्या सुखस्वप्नांना […]

मनाच्या तळ्यात कितीक सल भिजले

मनाच्या तळ्यात कितीक सल भिजले दाटले उमाळे भाव निःशब्द गहिरे साचले अश्रू खोल गहिऱ्या जाणिवांचे डोळ्यांत अश्रुंचे ओंथबले पाट कित्येक ओले काहूर मन कितीक कढ अंतरी मिटवले वणवा पेटतो वनी पानांचे हिरवेपण जळते मेलेल्या भावनेत नवं संजीवनी न येते पसरुनी वणव्यात दाह करपून होरपळे न फुलतो वसंत बहरात कधी कुठे न पाने फुले मोहरुन न पुन्हा […]

भोग

तुला जाणवल कसं माज जगणं, सोसणं वाट पाहून राह्यले कधी सरल ह्ये जिणं घाम गाळू तरी किती किती जुंपू गं कामाला दिस सरूनही जातो थार नाही गं जीवाला तुज्या अंगणी सडा गं जाई जुई चमेलीचा कशी गुंफू केसात गं गुंता घामाचा, बटांचा सण येती आणि जाती बाया जिवाने नटती बघू बघू तुटती गं काया उनात रापती […]

महिला दिन साजरा होतो

महिला दिन साजरा होतो.. पण महिला होतात व्यक्त मनातून,बोलतात अंतरातून, मोकळ्या होतात सहजतेतून ??? खरच महिला दिन साजरा होतो का शुभेच्छा देऊन ??? तिच्या मूक वेदनेची हळवी सल की निःशब्द भावनांची जखम तिच्या हास्यमागे करुण दुःख की हसऱ्या डोळ्यांत दुःखद ओल तिच्या अव्यक्त मनात असंख्य काहूर की तिच्या खोट्या आनंदात दुःखी चाहूल सहन करतीये ती आज […]

तू

कधी तू तळपत्या तलवारीची तीक्ष्ण धार कधी तू मृदू आणि कोमल बहावा अलवार कधी तू वज्राहून कठीण माळावरचा कातळ कधी तू बेफाम फुललेला गर्दगुलाबी कमळ कधी तू मर्द मराठी गडी रांगडा कधी तू न सांगता समजणारा मनकवडा कधी तू रुक्ष नि बोचरा निवडुंग कधी तू वेडावणारा चाफ्याचा सुगंध कधी तू तांडवाचा रुद्र अंगार कधी तू बेधुंद […]

वृक्षसंमेलन

कारखान्या विष, सोडले हवेत गादी पैसे खात, सुजलेली वाहनी गराडा, या भूतलावरी लोट धुरांवरी, स्वार असे प्लॅस्टिकने पहा, वेढले वेष्टन पृथ्वी जे आसन, डळमळे रसायनी शेती, विषच पेरले बियाणे रूजले, संकरीत बोडखे डोंगर, देखवेना डोळा कोणा कळवळा, येईल का? पाणी जो मागतो, नित्य देवाकडे लक्ष नसे थोडे, वृक्षाकडे तडातडा तोडी, बांधावरी झाड जरा नाही चाड, वृक्षाप्रती […]

वाटा वेड्या वाकड्या

वाटा वेड्या वाकड्या हरवून साऱ्या गेल्या ओल दव भिजल्या वनी प्राजक्त फुलांत हरवल्या.. गंध मंद आल्हाद दरवळे पावलोपावली बहर खुणा देह भिजल्या हळव्या मनी पर्ण ऋतूंचा मोहर नवा.. मन अलवार धुंद मोहरे पर्ण पाचूचा हिरवा नजारा ओल हळव्या एकांत क्षणी रक्तीमा गाली विलसे लाजेचा.. वसंताचे आगमन होता ऋतुराज बेधुंद बहर मना वसंताचे हलकेच साज लेणे सजली […]

पाऊस येतो

आला तोच सुगंध ज्याचा आठ मास विसर पडतो, आला तोच मातीच्या गंधाचा अत्तर जीव वेडावून भान हरपतो, आला तोच सोहळा ज्याचा सृष्टीला परमानंद होतो, भिजवून धरतीला आकंठ चराचरातून निर्मळ करतो, आला पाऊस तोच पुन्हा जो दरसाली नित्यनेमाने येतो, तरीही नेहमी नव्या जुन्या आठवणींचा पूर पुन्हा वाहून आणतो, आला शहारा तोच तेव्हाचा डोळे अलगद मिटून घेतो, तू […]

या मनाचे त्या मनाला

या मनाचे त्या मनाला शब्द सारे भाव उलगडते काव्यांत जीव व्याकुळ कवितेचे लेणे कवीला लाभाते.. या हृदयाचे त्या हृदयाला शब्द सारे बंदिस्त होते बहरतो कवी कवितेत आल्हाद कवीचे मन वेगळे जरा असते.. या अंतरीचे त्या अंतराला शब्दसाज कवितेत गुंफून राहते मरेल कवी या दुनियेतून जरी कवीच्या कवितेचे नक्षत्र अमर होते.. — स्वाती ठोंबरे.

आयुष्याच्या संध्याकाळी

आयुष्याच्या संध्याकाळी संपते जीवाची ही वात गात्र कुरकुरू लागली मन भरून सारखं तुला पाहू वाटतं थरथरे माझे हात घेण्या तुझा हात हाती एक जीव एक प्राण तुझ्या माझ्या संसाराची जन्मभर साथ दिली आता सोडून चालले एकला समजू नको तुला पाहतील हे डोळे तो येईलचं आता काळाच्या कुशीत न्यायला जरा विसावते आता मग जमेल जरा जायला जाईन […]

1 79 80 81 82 83 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..