नवीन लेखन...

आठवणींचे शिंपले

आठवणींच्या लाटांमधले मी शिंपले जेव्हा वेचत जातो सुखस्वप्नांचे संचित काही जणू अलगद वेचत जातो ओंजळीत भरून मग ते किनाऱ्यावर जरा टेकतो गाज सागरी ऐकत ऐकत सांजदीवा लुकलुकतो कुठूनसा मग वाहत येतो धुंद ओला पश्चिमवारा हळू हळू मग उमगत जातो सुखस्वप्नांचा अर्थ खरा…. — आनंद

पराधिनता

अटळ दान, जीवा मृत्यूचे त्याला कधीच घाबरू नये सात्विक, वात्सल्यामृताचे कधीच विस्मरण होऊ नये प्रीतभाव! उर्मी स्पंदनांना त्याचा तिरस्कार करू नये भोग भाळीच्या दुष्टचक्रांचे भोगता, ईश्वरा विसरु नये जन्ममरण! सत्य चराचराचे असत्य! कधीच समजू नये पराधिनता, हा जन्म मानवी देह! अमर्त्य कधी समजू नये विवेकी! सदा सत्कर्म करावे आविचार, मनांतरी करू नये स्मरावे! कृपावंती दयाघनाला अश्रद्धा! […]

सहज मिटल्या डोळ्यांत

सहज मिटल्या डोळ्यांत का तू अलगद आठवावा पाऊस मनात रिमझिम का तू मनात आल्हाद मिटावा कसली ही भूल मनीची आरक्त मी तुझ्यात व्हावी न उलगडले गुपित मज हे का तुझी वाट मी पाहवी कसले हे चांदण टिपूर हृदयाची हितगुज उमलावी न बोलता मी अबोल अशी अंतरीची साद तुला कळावी येशील का रे तू असा नदीकाठी मी […]

वरवर आनंद ती दाखवत होती

वरवर आनंद ती दाखवत होती अंतरी दुःख अबोध खूप होती तडजोड संसारात सदा मग देहाची आहुती तिचीच होतं होती न कळल्या वेदना तिच्या कुणाला न कळली दुःख कुठलीच काही रोज ती रडणारी व्याकुळ हरिणी मायेत हरवुन अबोध दुःखद होती न प्रेम,न माया कौतुक कसले नाही रुक्ष संसारात गुरफटून मन मारुन होती मन नव्हते जुळतं न भाव […]

जगी न्याय आंधळा

हा न्याय आंधळा, ती प्रीत आंधळी धन सत्य न्यायदा, धन सत्य प्रीती।।धृ।। या युगी धनी ज्येष्ठ वडीलधारी जगी गुणी,निर्धन कनिष्ठ होई मंदिरात, धनिका दर्शन आधी निर्धनास, दर्शनही दुर्लभ होई ।।१।। कलियुगाची हीच रित असली कुठली नाती अन कुठली प्रीती कोण ते जन्मदाते, बंधुभगिनी सखी, संतती कर्तव्याची नाती ।।२।। जो तो हवा तसा धावत सुटला विवेक सारा […]

चहा सोबत जोडली

चहा सोबत जोडली जातात हळुवार नाती, आणि स्वातीच्या मनात साहित्यिक वरील मायेचे सोबती चहा घ्यावा सुमधुर मोजावा कशाला किती, चहाचा आग्रह करते सदा साऱ्या रसिकांची स्वाती किती घ्यावा चहा तो मन भरत कधीच नाही, रसिकहो माझ्या काव्यांसोबत होऊन जाऊदे एक कप चहाची वर्णी — स्वाती ठोंबरे.

कृपा भगवंती

मीच स्वतःला ओळखुन आहे मी केवळ एक माणूस आहे भौतिक सुखे सारीच लाभली आत्मिक! सुखदा सत्य आहे न आता मनी दुश्वास कुणाचा आता स्पंदनी या तुप्तता आहे नेत्री, आठव सारे दवबिंदू परी अंतरी संवेदनांची जागृती आहे ना आता सुखदुःखांची गणती भोगप्रारब्ध, सारे भोगले आहे हवे कशाला, कुठलेच हेवेदावे हरिनामी आता मोक्षमुक्ती आहे जे जगले, ती कृपा […]

येशील तू कधी भेटाया सख्या

येशील तू कधी भेटाया सख्या ती वाट मी अलगद पाहते गंध अत्तरी केवड्याचे सभोवती सुवास दरवळून आल्हाद वाहे ती कातर वेळ संध्या समयी केशरात सांज अलगद भिजे संध्या छायेचा खेळ मनोहर सांज केशरी सूर्य साक्षी असे ये सख्या नभ शामल वेळी ती वेळ धुंद क्षण बावरे तुझा स्पर्श मधाळ मोहून मिठीत तुझ्या मी गंधाळते घे तू […]

भातुकली

बालपणीची मैत्रीण माझी भातुकलीतील ती सवंगडी निरागस तो खेळ आगळा मी राजा, ती राणी भाबडी ।। कितीतरी हा काळ हरवला पण आज तीच राणी मनी ती दूर, दूर तर मी हा इथे आठवण, तिची नित्य मनी ।। मला वाटते, भेटावे तिजला अन बोलावे सारे गुज मनीचे जे घडले ते आता घडुनी गेले पुनर्जन्मी! खेळ खेळू मनीचे […]

शब्दगीता

कल्लोळ मनभावनांचा सावट, निमिष वेदनांचे अंतरंगात, सावळबाधा नेत्री उपवन भावफुलांचे ।। ऋतूगंधली, कुसुमसुमने गंधाळ सारा प्रीतभारला उमलता, नित्य शब्दफुले प्रणयगंधी गुछय फुलांचे ।। शब्दाशब्दात, भास तुझा मनी भावनांचे चंद्रचांदणे ओठी झरते काव्यप्रतिभा भावनांत थेंब गंगाजलाचे ।। देहात नांदते, तूं कुमुदिनी आळविता मीच प्रतिभेला शृंगारुनी, प्रसवे शब्दगीता भाग्यच! हेची मम भाळीचे ।। — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. […]

1 64 65 66 67 68 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..