नवीन लेखन...

देता आणि खाता

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे ॥ धृ ॥ सत्तेवरल्या मंत्र्याकडून भले मोठे पोट घ्यावे मऊ मऊ खुर्चीसाठी डावपेच त्यांचेच खेळावे ॥ १ ॥ गरीबशा लोकांकडून गरीबीची दु:खे घ्यावी पोटातल्या आगीसाठी हातचलाखी शिकावी ॥ २ ॥ भडकलेल्या आगीवरुन तडकण्याचा गुण घ्यावा भरलेल्याशा ‘खिशा’कडून आपला तेवढा ‘हप्ता’ खावा ॥ ३ ॥ मेलेल्याने मरत रहावे खाणाऱ्याने खात जावे […]

सलाम अब्दुल कलाम

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये सौ. इंदिरा दास  यांनी लिहिलेली ही कविता फुलवीले बालपण चिखलातून कमळ जसे फुलवीले तारुण्य काट्यांतुन गुलाब जसे प्रेरक व्यक्तिमत्त्व आपुले हृदयांत ठसे रामेश्वराचा हा राम सलाम अब्दुल कलाम… (१) अवकाश संशोधनाचे तुम्ही शिल्पकार श्रेपत्रास्त्र बनवुनी झाले स्वप्न साकार उमेदिचे पंख देणारे तुम्ही अग्निपंखकार भारताचा ‘मिसाइल मॅन सलाम अब्दुल कलाम… (२) […]

न्याहरीची तऱ्हा न्यारी

दोसा असतो कसा छान जाळीदार मन मोकळे जसे असते त्याचे आरपार इडली सदाच टम्म फुगलेली. साधीदार सांबार नसला की असते रुसलेली खमंग खुसखुशीत आप्पे गोल गोल गरम गरम असतानाच खाणार किती बोलबोल आंबट ताकातली खमंग फोडणीत उकड शिजते रटरटा डोळे मिचकावत खायचे मस्त गटगटा कुणी म्हणतात उप्पीट तर कुणी ऊपमा या साठी बऱेच पदार्थ करावे लागतात […]

दिवाळी

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये लिहिलेली ही कविता आली दिवाळी आली दिवाळी दिव्या दिव्यांच्या लावून ओळी रंगा रंगाने खुलवु रांगोळी आली दिवाळी आली दिवाळी… ।। १ ।। लाडू करंजी ती कडबोळी शेव चिवडा अन् शंकरपाळी काटेरी चकलीची मजा निराळी आली दिवाळी आली दिवाळी… ।। २ ।। अभ्यंगस्नान पहाटेच्या वेळी उटण्याचा आलेप गंध दरवळी सुरसुऱ्या फुलबाजी […]

आमची शाळा

गिरगावातील रस्त्यावरी दोन देवळांच्या शेजारी ‘आर्यन’ आहे आमची शाळा जेथे ज्ञान मिळते बाळा नाव शाळेचे लहान आहे लहानथोरांच्या मुखी आहे येथून शिक्षण घेऊन गेले देशमुखांदी मोठे झाले आम्हीही शिक्षण घेऊन जाऊ परंपरा त्यांची पुढे चालवू सर्वांना जी समान मानते ती शाळा मला खूप भावते शाळा ही आवडती असे अभिमान तिचा हृदयी वसे -यतीन सामंत ऋणानुबंध या […]

शांततेचे स्वप्न

जिथे नसावा गलबला, गलका, कोलाहल काही काळालाही शाप नसावा, लगबग वा घिसाडघाई मनस्ताप वा कसली चिंता, गोंगाटही नाही शांततेला मग धीर यावा, नीरवता जिवंत व्हावी ॥ असावी शांततेला एक वात्सल्याची झाक काळालाही नसावा वेळेचा काही धाक ऐकू यावी अंतरीची केवळ हळूवार हाक समाधि लागावी या जगाची न उरे जाग ।। जिथे विहरावा वारा मुक्त आपुलकीचा आज […]

तुझ्या मिठीत मी

तुझ्या मिठीत मी अलवार गंधाळून गेले, बंध मलमली सारे हे भास तुझा अंतरी असा रे.. घेता तू घट्ट मिठीत मग चांदणे नभात चमचमे, सैलावेल गात्रे तुझ्यात माझी हलकेच समर्पित मी होता रे.. स्पर्श तू अलगद करता जाईल मी मोहरुन रे, ओठ तू अलवार टिपता गोड होईल साखर चुंबन रे.. अत्तराचा गंध केतकी काया अधर जरा बहरते, […]

का पुन्हा पुन्हा मी

का पुन्हा पुन्हा मी गुंतून जात आहे, कशी ओढ ही मग तुझ्याकडे ओढते आहे.. नको होते मोहक तुझी आठवण ती, परी होते रोज मग तुझी गोड साठवण ती.. न विसरले तुला मी न विसरल्या भावना, अबोल वेदना हृदयात उरल्या आठवणी पुन्हा.. मन दुःखी होते असे ओढाळ होतात भावना, नको गुंतणे मग हे विरतात नाजूक जाणिवा.. — […]

जाई जुईचं अलगद बहरण

जाई जुईचं अलगद बहरण की मंद निशिगंधाच दरवळण, गुलाबाच टवटवीत होणं की प्राजक्ताचं दवात ओलं भिजणं.. कमळाच पाण्यात भावणं की मोगऱ्याच गंधित होणं, जास्वंदीचं तरारुन उमलण की झेंडूच भरभरुन डवरण.. तगरीच साधस दिसणं की चाफ्याच गंध धुंद करणं, शेवंतीच नाजूक ते फुलणं की बकुळीच अबोल होणं.. रातराणीच धुंद आल्हाद होणं की अबोलीच अबोल लाजण, फ़ुलांचं हे […]

जीवनातील प्रश्न

वर्षावती अखंड जीवनी परागकण छोटे छोटे अगणित असे चैतन्यकण अमोलिक असतो अविरत अपूर्व आनंद जपण्यात जगण्यातले सारे इवलेपण इवल्या गोजिऱ्या हळव्या कळ्या नाजूक निष्पाप कोवळ्या पाकळ्या फुलतानाही बिचकत दचकत अवघडलेल्या उबदारशा एका ओंजळीस आसुसलेल्या निर्माल्यणापूर्वी हृदयी धरुन येतील फुलवता मळे का? अथक, अखंड ध्यास हव्यासाचा धडपड मी माझा जोपासण्याचा सोडून भास मृगजळ गाठण्याचा का न वहावा […]

1 44 45 46 47 48 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..