कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
दृष्टीची भ्रमंति
बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी १ चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे २ वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले ३ मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणार्या दृष्टीपटाला स्थिरावली ना दृष्टी […]
चिमणी
बऱ्याच दिवसानंतर मोकळ्या नभात उडताना एक चिमणी दिसली चिव – चिव करत घरात माझ्या नजरेसमोरून ती उडत गेली आमच्या घरासमोरच्या पूर्वीच्या मोकळ्या अंगणाची आठवण करून गेली मागे कधी आजीने सांगितलेल्या चिमणीच्या गोष्टीची आठवण देऊन गेली बऱ्याच दिवसापासून फक्त चित्रात दिसणारी चिमणी आज प्रत्यक्षात सामोरी आली बऱ्याच वर्षानंतर आमच्या घरात जणू ती नवीन पाहुनीच आली चिमण्या घटता […]
देहाला कां शिणवितां ?
शरिरातील अवयव सारे, यंत्रावत् असती आपल्यापरी कार्य करुनी, कार्यारत राहती यंत्रामधल्या मुख्य गाभ्याला, आत्मा म्हणती कुणी अविरत मिळे चैत्यन्य शरीराला, त्याचे कडूनी शुद्ध अशुद्ध संस्कार सारे, अवयवी घडती त्याच रुपें आत्म्याकरवी, परिणाम तो होती खाणें शुद्ध पिणेशुद्ध विचार निर्मळ, पवित्र ते संगम होता योग्य साऱ्यांचा, शुद्धीकरण घडते उपास तापास करुनी कांहीं, शिणविती देहाला हट्टयोग साधूनी कित्येक, […]