नवीन लेखन...

व्यथा

गरिबाची लुट श्रीमंताला सुट अन्यायाची धामधुम खुप झाली . आता माझी सटकली…. धान गेला; कापुस गेला सोयाबिननेही दगा दिला कवडीमोल मदतीचा माञ झाला गलबला. वागण्याची रित ही खुप झाली. आता माझी सटकली……….. निर्यातीला नाही वाव देशी मालाचे पाडले भाव कर्जाच्या डोंगराखाली दाबला सारा गाव. दुजाभावाची रित ही जुनी झाली. आता माझी सटकली …………. “निती” ला उभं […]

दोन मनें द्या प्रभू

आपल्याला इच्छा आहे | प्रभू तुमच्या नामस्मरणाची | परंतू ऐकून घ्या |कहाणी आमच्या अडचणींची ।। […]

अनर्थ

अर्थेचा लाविती अनर्थ ही अनर्थात अर्थ शोधिती माकड वानर मानवजात ही असामान्यता मानिती डरकाळी फोडिता तयाला शेर इ काश्मिर म्हणती आणि तमाने लाभ मारिता गर्दभ पदी स्थापिती कशी ही उलटी जनता रिती ।।१।। नरेचि केला नारयण जगी दांभिक जन फसती नारायण न वसे जगी या नाते आकाशी परंतु जेव्हा येता लग्ना स्वसुता सौदामिनी जातो कोठे विश्वभाव […]

रेणूके जगदंबे आई

रेणूके जगदंबे आई रेणुके जगदंबे आई    दर्शन दे मजला तुझ्या मंदिरी आलो   पावन हो तू भक्तिला    ।।धृ।। तुझे अजाण बालक    करितो खोड्या अनेक न होई चित्त एक तूंच समजोनी घेई    मम चंचल मनाला   ।।१।। रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला जमदग्नीची कांता    परशूरामाची तूं माता मनीं तुजला भजतां आशिर्वाद तूं देई     आनंदानें सर्वांला  ।।२।। रेणूके जगदंबे […]

आमचे ध्येय व दिशा

कोठे चाललो आम्ही,  जसे वाहती वारे, दिशा नसे आम्हाला, जसे फिरती भोवरे   ।।१।। धावत सुटला एकसारखा, प्रत्येकाचा वेग निराळा, कोठे चाललास? विचारतां  हासत राहतो बावळा   ।।२।। नाही कुणा ध्येय  निश्चित असे एक, परिस्थितीच्या ओघांत, वाहत चाललो अनेक ।।३।। जीवन कशासाठीं कळले नाही कुणां जन्मलो म्हणून जगावे  हेच वाटते सर्वांना ।।४।। तशातच तरले कांहीं  उध्दरुन ही गेले […]

एक मालवणी कविता !!!

चिंचो, आवळे, काजू आणि गरे, कोकणी माणूस लय लय बरे…. शिवीगाळये घालतत खरे, मनांत त्यांच्या काय नाय बरे….. करवंदा खावची तर कोकणात जावचा, डोंगरातून फिरतांना, मजा लय गावता…. नदी किनारी झाडा बघा नारळाची, पाणी पिता तेतूरला, स्वर्गच गावता….. हिरवी हिरवी गार आंब्याची तोरा, काजीचो रंग बघा लाली लाल जरा…. जांभळाचो रंग जांभळो सगळ्यांका ठाऊक हा, पण […]

अश्याने पुढारलेले बनू का?

|| हरी ॐ || आपल्या देशाला थोर परंपरा ऋषींची, संतांची आणि देशभक्तांची ! विज्ञान आणि तंत्रज्ञानात नाही ताबेदारी कुणाची, उकल करू पाहतो न समजलेल्या ग्रहांची ! अश्या थोर इतिहासाला आणि प्रयासाला, बट्टा लागला देश हिताला समलिंगी संबंधाचा ! नाही पटत मनाला, कीव येते बुद्धीची समलैंगिक संबंधींची ! घटनेप्रमाणे लोकशाहीत मतस्वातंत्र सर्वांना, तरी समलिंगी स्वैराचार नाही पसंत […]

श्रेष्ठत्वात न्युनता विसरते

विशालतेच्या गुणामध्यें उणीवतेचा लपतो भाग चंद्रातील सौंदर्यामुळे आम्ही विसरतो त्याचा डाग नदिकांठची चिखलमाती सांचलेली दिसते परि निर्मळ प्रवाह वेगांत वाहून ती जाते अथांग सागराच्या उदरीं नवरत्नाच्या खाणीं विसरुन जातो खारेपणा दुर्लक्ष त्यास करुनी सुंदर दिसे रुबाबदार तो पक्षी राज मोर आवाज नसे चांगला परिं नाचतो बहरदार आकर्षक वाटते मनास फूल गुलाबाच लक्ष्य खेचले जातां विचार नसतो […]

ऊर्जेचा करा योग्य उपयोग

खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरीता, शक्तीस द्यावी दिशा चांगली, जीवन यशाकरीता ।।धृ।। बागेतील फुले सुंदर, फुलपाखरांचे रंग बहारदार, मोहक इंद्र धनुष्याकार, निसर्गातील रम्यतेमध्यें शोधा, ईश्वरी गुणवत्ता, खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरीता ।।१।। भजन पूजन प्रभूचे, भक्ति-भाव मनाचे, उपवास करी देहशुद्धीचे, तपसत्वाच्या शक्तीनें करा, आत्म्याची मुक्तता , खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता ।।२।। गरिबासी […]

उगवत्या सूर्याला नमस्कार

उगवता सूर्य, नमन करती त्याला, विसरती सारे सुर्यास्ताला    ||धृ|| ऐश्वर्याची झलक, श्रीमंतीचे सुख बिनकष्टाची संपत्ती, लक्ष मिळवण्याती माना डोलावती, डामडोलाला   ||१|| उगवता सूर्य. नमन करती त्याला प्रथम हवे दाम, तरच होई काम पैशाच्या भोवती, सारेच फिरती पैशाचे गुलाम, मानती पैशाला    ||२|| उगवता सूर्य, नमन करती त्याला सत्तेची नशा, दाखवी जना आशा स्वतःसी समजे थोर,  असुनीया शिरजोर […]

1 396 397 398 399 400 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..