नवीन लेखन...

विठूचे पद मजला लाभावे

विठूचे पद मजला लाभावे देह मातिचा बनण्यां कांचन, अन्य कशास हवे ?   नच माहित, मेघांच्या मागे विठ्ठल दिसतो कां कुणां  ? असती कां क्षितिजापल्याड श्रिठ्ठलवस्तीच्या खुणा  ? विठू भक्तहृदयीं वसतो, पण, ठाम मला ठावें  ।।   अगणित जैसे तारे गगनीं, देवदेवता अनंत जगतीं त्या सार्‍यांचें वंदन-अर्चन-पूजेनें जन मागत मुक्ती मात्र माझियासाठी सारी विठूचीच नांवें  ।। […]

आधाराचा हात देई पंढरीचा नाथ

ठेचकळे आंधळा मी काळोख्या पथात आधाराचा हात देई  पंढरीचा नाथ  ।।   चुकीचाच धरला रस्ता, असा चालतो मी – विषयवासनांच्या पंकीं अजुन लोळतो मी मद-मत्सर-मोह यांचा संग नसे जात  ।।   जरी मी न जाऊं शकलो कधी पंढरीला मंदिरीं न पाहूं शकलो विटेवर हरीला भाग्यवंत परि मी, विठ्ठल भेटला मनात ।।   पाडुरंगनाम येतां एकदाच माझ्या […]

वयाचे गणित

वयाचे हे गणित काही मनाला माझ्या कळेना ते तरुणच राहिले शरीर काही साथ देईना आठवणी तेव्हाच्या रंगबिरंगी किती फुलपाखरासारख्या केव्हाच उडून जाती प्रेम, राग, लोभ.. प्रत्येक श्वासात झळकती आता तेच सारे मला मुलींच्या डोळ्यात दिसती आरसा तेव्हाचा हाती धरिला तेव्हाचं प्रतिबिंब काही मिळेना तेव्हाची मी कुठे हरवले श्वास घेताघेता जगणंच का मी विसरले? पण मग जाणीव […]

नांव पांडुरंग कसें ?

(गझलनुमा गीत)   रंग तुझा सावळाच, नांव पांडुरंग कसें ? लक्ष भक्त पाहतात लक्ष तुझे रंग कसे  ?   हात कटीवर ठेवुन  विटेवरी स्तब्ध उभा रूप तुझें ठायिं ठायिं तरि भक्तांसंग कसें ?   रौद्र ऊन थंडी वा मुसळी पाऊस असो दुर्लक्षुन ऋतु, नामीं वारकरी दंग कसे ?   नाचतात वैष्णवजन, देहभान विस्मरुनी वेड असें लावतोस […]

मला विठ्ठलाचा विरह सोसवेना

अजूनी दिसेना पंढरीचा राणा मला विठ्ठलाचा विरह सोसवेना  ।।   बुवा-साधु-स्वामी यांचे पाय वंदिले मी पुराजी नि पंडित यांचे पंथ धुंडले मी परी विठ्ठलाच्या दारीं कुणी पोंचवेना  ।।   पांडुरंगभेटीपुढती  खुजे सप्तस्वर्ग दुबल मी, दुर्गम दुष्कर नरजीवनमार्ग पदोपदीं सहा रिपूंची रोखतसे सेना ।।   अंधच मी, पाहिन कैसे सुंदर तें ध्यान ? मूढ पुरा , गूढ […]

माझी शाळा

WhatsApp वरुन आलेली कविता  आयते शर्ट ते बी ढगळ, चड्डीला आमच्या मागून ठिगळ!! त्यावर करतो तांब्यानी प्रेस, तयार आमचा शाळेचा ड्रेस!! खताची पिशवी स्कूल बॅग, ओढ्याचं पाणी वाॅटर बॅग!! धोतराचं फडकं आमचं टिफीन, खिशात ठेवुन करतो इन!! करदोडा आमचा असे बेल्ट, लाकडाची चावी होईल का फेल ? मिरचीचा ठेचा लोणच्याचा खार, हाच आमचा पोषण आहार!! रानातला रानमेवा भारी मौज, […]

साद आईची

WhatsApp वरुन आलेली कविता  महिनेमागून महिने, शेवटी वर्ष सरुन जाते वृध्दाश्रमाच्या पायरीवर , वाट तुझी पाहाते भिजून जातो पदर , अन मन रिते राहाते कधी मधी मात्र , तुझी मनीऑर्डर येते पैसे नकोत यावेळी , तूच येऊन जा बाळा मला तुझ्या , घरी घेऊन जा तुझा बा होता तोवर , काळ बरा गेला तुझी आठवण काढत , उघड्या डोळ्यांनी […]

आम्ही मिडलक्लासवाले

दिवस बदलले तरी ‘Middle Class’ जात नाही आणि त्याचं आम्हाला काहीही वाटत नाही. दुधाची साय, तुपाची खरवड तिळाची वडी, पुरणाची पोळी, आईच्या जेवणाची सर पिझ्झाला येत नाही. हॉटेलात गेले तरी मेनूवर ‘दर’ दिसत राही रिक्षा केली तरी मीटरवरून नजर हटत नाही. जीन्स घातली तरी साडीची हौस सुटत नाही. घरातून निघताना आजही पाया पडायला विसरत नाही. शो […]

साक्षीदार

‘घटना’ जेव्हां घडली अघटित  । कुणीही नव्हते शेजारी  ।। कां उगाच रुख रुख वाटते  । दडपण येवूनी उरीं  ।।   जाणून बुजून दुर्लक्ष केले  । नैतिकतेच्या कल्पनेला  ।। एकटाच आहे समजूनी  । स्वार्थी भाव मनी आला  ।।   नीच कृत्य जे घडले हातून  । कुणीतरी बघत होता  ।। सर्वत्र दिशेनें तो व्यापूनी आहे  । हेच सारे […]

आले पावसोजींच्या मना !

  आले लहरी पावसोजींच्या मना सुट्टीत जावे मामाच्या गावा,   फोनवरून झालं बोलणं दिवस ठरला एकदाचा, गाड्या सगळ्या फुल झाल्या पेच पडला तिकिटाचा !   पाऊसोजी म्हणाले आईला काळजी नसावी, आपले आहेना ‘मेघ’ विमान, आई म्हणाली पावसोजीला प्रवास खूप दूरचा, सांभाळून चालव वाहान !   ठेव जवळ जलाचा साठा वाटेत लागली तहान जर जलाचा आहे तुटवडा […]

1 … 302 303 304 305 306 … 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..