माझ्या कल्पनेतील विमान…
माझ्या स्वप्नातील विमान जमिनीवर स्थिरावताच माझ्यातील माणुसकीही क्षणात मेली होती… © कवी – निलेश बामणे […]
माझ्या स्वप्नातील विमान जमिनीवर स्थिरावताच माझ्यातील माणुसकीही क्षणात मेली होती… © कवी – निलेश बामणे […]
लाट उसळतां ती क्रोधाची, बळी घेतले कित्येकाचे हिंसाचाराच्या लाटेमध्यें, सर्वस्व गमविले कांहींचे…१, फार पूरातन काळीं आम्हीं, चालत होतो एक दिशेनें कुणीतरी फोडून वाटा तेव्हां, विखरूनी टाकिली कांहीं मने…२, त्याच क्षणाला बिज रूजले, धर्मामधल्या विषमतेचे ईश्वराकडे त्या जाण्याकरितां, मार्ग पडती विविधतेचे….३, विविधतेनें संघर्ष आणिला, भेदभावाची भिंत उभारूनी विवेकाला गाडून टाकले, उफाळणाऱ्या भावनांनी, चूक कुणाची सजा कुणाला, कालचक्राची […]
निरोगी असतां तुम्ही, नामस्मरण करा प्रभूचे, ठेवू नका उद्या करीता, महत्व जाणा वेळेचे ।।१।। शरिराच्या नसता व्याधी, राहू शकता आनंदी, आनंदातच होऊ शकते, चित्त एकाग्र ते ।।२।। व्याधीने जरजर होता , चित्त होई अस्थीर, स्थिरतेतत दडला ईश्वर, जाणता येतो होऊनी स्थीर ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
अकारण कां नांवे ठेवता सदैव कैकयीला । चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला ।।धृ।। जेव्हां दशरथ युद्धास जाई । कैकयी त्याच्या सेवेत राही ।। राजनीति अन् युद्धनीति ही । अवगत झाली सारी तिजला ।।१।। चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला नजीकच्या त्या देशामधूनी । रावणादी असुरी शक्ती वाढूनी ।। सामान्य जनाला जर्जर करुनी । हा हाः […]
एक होती अनु फुलासारखी जणू डोळे फिरवी गर्र गर्र पाऊल टाकी भरभर तिला लागली भूक गडू दिला एक बघितला रिकामा गडू तिला आले रडूं आईने दुध भरले कांठोकांठ ओतले तिला हवय जास्त दूध आहे मस्त रडरड रडली आदळ आपट केली सांडूनी गेला गडू पाठींत बसला मात्र धम्मक लाडू डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
लीन दिन ती होवून पुढती, झुकली होती त्यावेळी । हात पुढे आणि नजर खालती, ज्यांत दिसे करूणा सगळी ।। लाचार बनूनी पोटासाठी, हिंडे वणवण उन्हांत सारी । वादळ वारा आणिक पाऊस, संगत घेवून फिरे बिचारी ।। मदतीचा हात दिसे, जागृत होता भूतदया । जनसामान्यात असती मानवतेतील ही माया ।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
शरीर एक साधन, साध्य करण्या प्रभूला ठेवूनी ती आठवण, चांगले ठेवा देहाला…१ व्यायाम व आहार, असतां नियमित सुदृढ ते शरीर, असते मग बनत…२ सुदृढ असता देह, करावे मनाला शांत टाळत असतां मोह, न येई तो भावनेत…३ षडरिपू हे विकार, काढा विवेकांनी निर्मळ ठेवा शरीर, पवित्रता राखूनी…४ देह आहे मंदीर, गाभारा तो मन आत्मा तो ईश्वर, आनंद […]
जीवनातील वाटे वरती, कडेकडेने उभे ठाकले परि वाटसरूंना सारे ते, यशातील अडसर वाटले…१, वाट चालतां क्रमाक्रमानें, बाधा आणून वेग रोकती ध्येयावरल्या उच्च स्थळीं, पोहचण्या आडकाठी करिती…२, षडरिपूचे टप्पे असूनी, भावनेवर आघांत होतो सरळ मार्गाच्या विचाराला, आकर्षणाचा खेंच बसतो…३, पवित्र निर्मळ भावनेमध्ये, रंगाच्या त्या छटा उमटती गढूळपणाच्या वातावरणीं, सारे कांहीं गमवूनी बसती….४, थोडे राहता गाफील तुम्ही, जाळ्यामध्ये […]
उंच उंच जावूनी झाडे चुंबीत होती गगनाला । चंद्र चांदणे, भव्य पर्वत आणिक नदी नाला ।। किती आनंद तो मनी जहाला बघूनी निसर्ग शोभा । गुंग होऊनी नाचू लागलो सुटला चित्त ताबा ।। सुंदर वाटे रूप आपले बिंब बघता दर्पणी । पोंच मिळते समाधानाची केवळ अंतर्मनातूनी ।। पूजा करीता तल्लीन होई मूर्ती बघूनी देवाची । शक्तीमान […]
कसे मानूं उपकार निसर्गा तूझे मी उघडोनी जीवन द्वार आलास तूं कामी तुझ्या मोरानें दाखविले नृत्य राघूच्या वाणीनें शिकविले सत्य कोकीळेचे गान सप्तसुरांच्या लहरी चित्रकलेचे ज्ञान इंद्रधनुष्या परि मुंग्याची वारुळे दाखवी वास्तूकला कोळ्याची जाळे शिकवी हस्तकला घारीची भरारी स्वछंद केले मनां मैनेच्या उदरीं जाणला प्रेमळपणा विजेची चपळता चंचल बनवी धबधब्याची प्रचंडता श्रेष्ठत्व जाणवी निसर्गातील विवीधता देई […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions