नवीन लेखन...

अनुभव

सुख दुःखाच्या लाटेमध्ये, तरणे वा बुडणे, जगेल तो त्या क्षणी, ज्याला माहित पोहणे ।।१।। पोहणे जगणे कला असूनी, अनुभव हा शिकवूनी जातो, जागरुकतेने कसे जगता, यशही त्याला तसेच देतो ।।२।। जीवनाविषयी ज्ञान मिळवण्या, कष्ट लागती महान, परि केवळ एक अनुभवी प्रसंग, सारे देतो मिळवून ।।३।। अनुभवाचे ज्ञान श्रेष्ठ हे, निसर्ग शिकवी क्षणोक्षणी, सतर्कतेने वेचून घ्यावे, दैनंदिनीच्या […]

रामाची व्याकूळता

सीतेकरीता व्याकुळ झाला अवतारी चक्रपाणी, अजब ही रामप्रभू कहाणी  ।।धृ।। पत्नीहट्ट त्याला सांगे, कांचनमृग शोभेल अंगे, मृगयेच्या तो गेला मागे प्रसंग घेई रावण साधूनी  ।।१।। अजब ही रामप्रभू कहाणी रावण नेई पळवूनी सीता दिसेना रामा कोठे आता तरुवेलींना पुसत होता वाहत होते अश्रू नयनीं   ।।२।। अजब ही रामप्रभू कहाणी वाणी ज्याच्या शक्ती शिवाची ह्रदयामाजी दया सागराची […]

निसर्गाचे चक्र

सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे उत्पत्ति स्थीति लय ह्या कालकृमणाचे  ।।धृ।। एक एक पाकळी लहानशी कळी जाई उमलून फूल त्याचे बनून सुगंधी टपोरे फूल कांही वेळ राहील कोमेजून जाई देऊनी रुप बीजाचे परत अंकूरण होई दुजा एका झाडाचे  ।।१।। सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे एक एक पाऊल टाकते मुल वाढते हसून बनते यौवन एटदार तो दहधारी […]

जखमांचे वृण

किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती. एकच गोष्ट सतत कानी पडत होती. उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा. भडीमार होत होता आईकडून शब्दांचा.. आम्ही होतो बालपणीच गांधीवादी. एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे. मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे. खेळणें, कुदणें, उड्या मारणें, त्यातच […]

स्मृति

जीवनाचा प्रवाह हा    भरला आहे घटनांनीं विसरुनी जातो  काहीं    काहीं राहती आठवणी  ।।१।। बिजे ज्यांची खोलवर    रुतुनी जाई त्या घटना देह आणि मनावर    बिंबवूनी जाई भावना  ।।२।। काळाचा असे  महिमा    आच्छादन टाकी त्यावरती परि काहीं काळासाठी    विसरुनी जातात स्मृति  ।।३।। प्रसंगी त्या अवचित    जागृत होती आठवणी पुनरपि यत्न होतो    जाण्यासाठीं त्या  विसरुनी  ।।४।। डॉ. भगवान […]

तयांना मृत्यूची वाटे भीति

अस्तित्वशक्तीला बाधा येणें,  अति भयंकर घटना ती तयांना मृत्यूची वाटे भीति….।।धृ।। गरिबीत जगती कित्येक, भ्रांत पाडे ती भाकरी एक जगण्यासाठीं झगडा देती,  तयांना मृत्यूची वाटे भीति….१, आरोग्याला धक्का बसतां शरिर जर्जर होवूनी जातां देह तारण्या धडपड होती,   तयांना मृत्यूची वाटे भीति….२, समाज रचना बघा कशी, लौकिक जाई तो राही उपाशी कुणी न दाखवी सहानुभूती,   तयांना मृत्यूची […]

मुक्तीसाठीं

रुजला पाहीजे    विचार मनांत सारेच प्रभुचे    असे ह्या जगांत जो वरी आहे मी   माझे येथे असे त्या क्षणापर्यंत  स्वार्थ मनीं वसे स्वार्थयुक्त मन   मुक्त होत नसे मुक्ती येई पर्यंत   पुनर्जन्म असे बिंबता मनांत   माझे नाहीं कांहीं प्रभूचे समजता   आत्मा मुक्त होई डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

वास्तव आणि स्वप्न

स्वप्नातही बघताना ज्याची भीती वाटते ते वास्तव असते वास्तव आणि स्वप्न एकाच नाण्याच्या दोन बाजू एक चमकते दुसरे भासते वास्तव आणि स्वप्न दोन विरुद्ध गोष्टी एक खरी दुसरं खोटी वास्तवात जगायला हिम्मत लागते स्वप्नातही वास्तव नकोसे वाटते स्वप्नात मन स्वैर होते वास्तवात मन बंदिवान होते स्वप्नात कल्पनांचे डोंगर रचले जातात वास्तवात ते सर्व कोसळतात वास्तव हे […]

ऐलमा पैलमा गणेश देवा

ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा नवरा बदलून दे, करीन तुझी सेवा. जन्मोजन्मी कसल एका जन्मी झाले बो……र मी नाही गुंडाळायची वडाला आता दोर, कोणे एकेकाळी कसा फिदा होता माझ्यावर, ओफिसातून थेट कसा घरी यायचा भरभर, न चुकता घेऊन येत असे फूल आणि गजरा व्हेलेंटाईन डे तर रोज व्हायचा साजरा. ह्यांच्या नजरा ……त्यांच्या नजरा, लागल्या आमच्या संसारा. […]

जन्मोजन्मी व्हावी वारी

धरली कास तुझ्या पायी माझा विश्वास मुखी नामघोष तुला भेटण्याची आस ।।1।। चारी वेद तुला गाती विश्वव्यापक तू कमळापती।।2।। अठरा पुराणांच्या अंती साधू संत तुला ध्याती ।।3।। क्षणोक्षणी येते तुझी मला प्रचिती सुख-दुःखात देवा तू माझा सांगाती।।4।। संत तुक्यासाठी तू सखा पांडुरंग नामयाच्या कीर्तनात गातोस अभंग ।।5।। जनीसाठी दळण, कान्होपात्रेला क्षमादान हेची तुझे गुण, ऐकून तृप्त […]

1 … 291 292 293 294 295 … 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..