नवीन लेखन...

प्रितीची नवी ओळख 

रिमझिम पाऊस आला सृष्टी रोमांचित झाली प्रेमाच्या वर्षावात दोघं होती नहाली थोडावेळ एकाच छत्रीत दोघं होती चालली स्पर्शाला टाळत नंतर आडोशाला स्थिरावली मी हलकेच नजर तिच्याकडे वळवली ओल्या गालावरून लाज होती घसरली सोसाट्याचा वारा तरी ती नाही घाबरली नकळत थोडीशी माझ्या बाजूला सरकली थंड वाऱ्याच्या स्पर्शाने जरी ती शहारली संयमाला टेकून हलकेच कुडकुडली मध्येच विज कडाडली […]

ओढ प्रितीची

गालावरील लाली तुझ्या आजही टिकून आहे धुंदी गुलाबी ओठांची अजूनही तशीच आहे । पाहून मजकडे स्मीतहास्य तू आता नको करु गालावरची गोड खळी ती घायाळ करीत आहे । माळू नकोस तू तव केसात गजरा तो सुगंधी नहालेल्या केसांचा सुगंध धुंद मज करीत आहे । खट्याळ तव नजरेने मजकडे तू पाहू नको भाव तव डोळ्यातील बेहोश मज […]

उगवत्या सूर्याला नमस्कार

उगवता सूर्य, नमन करती त्याला, विसरती सारे सुर्यास्ताला    ||धृ|| ऐश्वर्याची झलक, श्रीमंतीचे सुख बिनकष्टाची संपत्ती, लक्ष मिळवण्याती माना डोलावती, डामडोलाला   ||१|| उगवता सूर्य. नमन करती त्याला प्रथम हवे दाम, तरच होई काम पैशाच्या भोवती, सारेच फिरती पैशाचे गुलाम, मानती पैशाला    ||२|| उगवता सूर्य, नमन करती त्याला सत्तेची नशा, दाखवी जना आशा स्वतःसी समजे थोर,  असुनीया शिरजोर […]

प्रतिक्षा

भिंत ओलेती मनाची तुझ्या आठवणी झिरपलेल्या, धुळीत थेंब टपोरे , देती आठव ओल्या बटा तुझ्या झटकलेल्या, तुझ्या हास्याची जाळी काढी नक्षी त्या छताला, प्रतिबिंब तुझे झळकते जेव्हा पाहतो स्वतःला, किती भकास उदास तुझ्याविना घर मनाचे गं जन्म देण्यास आतूर जडावलेले गर्भ घनाचे गं, झाली जीर्ण वास्तू मनाची तुझे येणे होत नाही, अवकळा येते त्या घरास जिथे […]

जीवन घटते सतत

क्षणा क्षणाला घटते जीवन,  जाण त्याची येईल कोठून मोठे प्रसंग आम्ही टिपतो,  तेच सारे लक्षांत ठेवतो, जीवनाच्या पायऱ्या मोजता,  मना विचारा काय राहता ढोबळतेचा विचार होतो,  सूक्ष्मपणाला विसरूनी जातो, मृत्यू येई तो हर घडीला,  जाण नसते त्याची कुणाला गेला क्षण तो परत न येई,  आयुष्य तेवढेच व्यर्थ होई, समाधान जे मिळे तुम्हाला,  देता किंमत प्रत्येक क्षणाला […]

प्रभूची खंत

मी आलो रे तुझ्या दारीं, मला म्हणतात श्रीहरी झोपलो होतो सागरी, तंद्री मोडी कुणीतरी, ।। शांतीने पडू देईना, तुझी ती तपसाधना, लक्ष माझे खेची कुणी, प्रश्न पडला तो मनी  ।। तूच दिसला नयनी, आई-बापा मांडी देऊनी, माझे लक्ष तुझकडे, परि तू बघेना थोडे, ।। आई – बापाच्या सेवेत,  गुंगलास तूं सतत, तुझी शक्ति मला छळे, तें […]

स्त्री

लाजेची मशाल नयनी, नाकात नाजूक नथनी, लाल ओठ गुलाबी छान, स्त्री तू सौंदर्यांची खाण… झुपकेदार शेपूट कुंतलेचं, मुक्त कमरेवरी रुळलेलं, शान तूझ्या मोहक स्त्रित्वाची, गुंफुनी गजऱ्यामध्ये माळलेलं… उडे ऐटीत डौल पदराचा, कुंपण घाली मंद वारा, झाकाळलेल्या या रुपासमोरी, फिक्या त्या लखलखणाऱ्या तारा… कामिनी गं तु योवणाची, वसुंधरेची अभिमानास्पद मान, अंकुश घाली स्त्रिशक्तिवर, हे शृंगारिक देह वरदान… […]

हास्य वेदना

पाहूनी आरशात रुप स्वताचे उगीचच स्वतःशी हसलीस तू चेहऱ्यावरील तुझ्या.हास्यामागे वेदना लपविल्या होत्यास तू । पाहणारास दिसत होते सदैव तेच हास्य तुझीया चेहऱ्यावरी नाही कुणाला दिसली कधीच त्या हास्यामागील वेदना तुझी । हासत असता अचानक तुझ्या अश्रू दोन ओघळले गालावरी नाही कुणाला त्या अश्रूत दिसल्या वेदना किती जपल्या होत्या ऊरी । सुरेश काळे मो. 9860307752 सातारा […]

प्रतारणा

वाटते पाहू नयेच स्वप्न ना ते भंगण्याची भिती करु नये प्रेम कुणावर ना प्रेमभंगाची ही भिती । घेऊनी स्वप्ने ऊराशी तव जीवनी मी आले स्वप्न ते सत्य करण्या रात्रंदीन मी एक केले । वाटले तुझ्या समवेत नाही कठीण काही जगात मिळता साथ तुझी मजला काय आहे कठीण जगात । परी फसगत अशी जाहली मम स्वप्ने ती […]

मनाच्या नदीने वाहतच रहावं

मनाच्या नदीने कसं वाहतच रहावं झाले गेले सारे ते विसरून जावं वाटेवरच्या वळणावर थोड्यावेळ थांबावं अपरिचित काही मनांना प्रेमानं जोडावं मनाच्या काठावर कधी शांत बसावं चिंता विवंचनांना अलगद पाण्यात सोडावं येणाऱ्या साऱ्या प्रवाहांना आपल्या पोटात घ्यावं जिवलगांच्या दूःखांना कसं प्रेमाने सहावं मनाच्या नदीने कसं वाहतच रहावं मनाच्या नदीने कसं संयमाने वहावं संतापाच्या परिणामांना शांत प्रेमानं भरावं […]

1 261 262 263 264 265 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..