घाणा (आधुनिक)
दीपक दादाची फियाट हिरवी करवली मिरवी सुनीता ताई मांडवाच्या दारी कसली खट्पट् नेहमीची कटकट गाडीची ती मांडवाच्या दारी अडली मोटार उठ धक्कामार प्रदीप बाळा मांडवाच्या दारी कसली फट्फट् गाडी झाली स्टार्ट दिपकाची
दीपक दादाची फियाट हिरवी करवली मिरवी सुनीता ताई मांडवाच्या दारी कसली खट्पट् नेहमीची कटकट गाडीची ती मांडवाच्या दारी अडली मोटार उठ धक्कामार प्रदीप बाळा मांडवाच्या दारी कसली फट्फट् गाडी झाली स्टार्ट दिपकाची
गुरूचा महीमा थोर | उघडूनी जीवनाचे द्वार || सांगूनी आयुष्याचे सार | मार्ग दाखविती तुम्हां ||१|| वाटाड्या बनूनी | भटकणे थांबवूनी || मार्गासी लावूनी | ध्येय दाखवी तुम्हां ||२|| न कळला ईश | न उमगले आयुष्य || दु:ख देती जीवन पाश | बिना गुरू मुळे ||३|| अंधारातील पाऊल वाट | ठेचाळण्याची शक्यता दाट || प्रकाशाचा किरण […]
सासरच्या वाटे गुलाब भेटे कोण पाव्हणं आलंय ग बाई सासरे पाव्हणं आलेत ग बाई सासर्यांनी काय आणलंय ग बाई सासर्यांनी आणली मिठाई मिठाई मी खात नाही सांगा मी येत नाही दाराचं लॅच लावा ग बाई गेटच्या वॉचमनला सांगा ग बाई ।।१।। सासरच्या वाटे गुलाब भेटे कोण पाव्हणं आलंय ग बाई सासुबाई पाव्हण्या आल्यात ग बाई सासुबाईंनी […]
आली दारात वरात गुलमोहर फुलला, लक्षुमीच्या स्वागताला सडा फुलांचा घातला । आली दारात वरात दारी तोरण हिंदोळे पैंजणांच्या चाहुलीने मोर मण्यांचे जाहले । आली दारात वरात लिंबलोण आणा कुणी दृष्ट लागू नये तिला सून माझी बहुगुणी । आली दारात वरात दार आडवी बहीण म्हणे – अडविते आज उद्या पाठीशी घालीन । आली दारात वरात पूस डोळे […]
देवी शारदे शारदे मांडीयेला गजर तुझ्या कृपेने उजळू दे परिसर ।।धृ।। तुझ्या हातात हातात विद्वत्तेची बीन तुला बसाया बसाया मोराचे आसन रूप आगळे आगळे शोभे श्वेतांबर ।। तुझा प्रसाद प्रसाद लाभो भाविकाला विनम्र होऊ दे होऊ दे अष्ट सिद्धीकला सार्या भक्तांचा भक्तांचा होऊ दे उद्धार
आधी मूळ धाडा अष्ट गणेशांना इच्छिल्या कार्याला शुभारंभ । आधी मूळ धाडा बापुजी देवाला घरच्या कार्याला हातभार । आधी मूळ धाडा कार्ला गडावरी बैसोनी अंबारी येई माते । आधी मूळ धाडा सप्तश्रुंगावरी भगवतीची स्वारी येई कार्या । आधी मूळ धाडा कृष्णेला वाईच्या मान आजोळीचा आहे तिचा । आधी मूळ धाडा जेजूरी खंडेराया बहिणीच्या कार्या पाठी उभा […]
निसर्गाचा अप्रतिम ठेवा, नदीकाठच्या पर्वत शिखरीं । बाह्य जगाचे वातावरण, धुंदी आणिते मनास भारी ।।१।। त्याच वनी एकटे असतां, परि न लाभे एकांत तुम्हांला । चित्तामध्यें वादळ उठतां, महत्त्व नव्हते बाह्यांगाला ।।२।। खडखडाट सारा होता, दैनंदिनीच्या नित्य जीवनी । समाधानी जर तुम्हीं असतां, शांतता दिसते त्याच मनीं ।।३।। एकांततेची खरी कल्पना, मनावरती अवलंबूनी […]
विसरू नकोस मजला माझ्या भाऊराया नाते अतूट असते घे, हे समजुनिया आठव सारे बालपण कसे गेले खेळांत भांडत होतो, रुसत होतो सारे केले प्रेमांत ओवाळणीची तुझी सुपारी ठेवली मी जपुनी आठवण होता तुझी मजला काढून बघते पेटीतुनी जाणीव आहे मजला संसार जीवनाची कर्तव्ये पडली शिरावरी तुझाच संसाराची खूप प्रेम दे वाहिनीला संसार कर सुखाने काढून ठेव अल्पसे प्रेम देण्या मज त्या साठ्यातुनी वर्षातून एके दिवशी बांध राखी प्रेमाची […]
गजानना तू स्फूर्तीदाता तू सकलांचा विघ्नहर्ता ।।धृ।। वक्रतुंड लंबोदर मूर्ती परशु विराजे एका हाती दुजा वर देता ।।१।। पितांबर शिरी मुकुट शोभतो जास्वंदी दुर्वांनी सजतो मोदक आवडता ।।२।। विनम्रभावे तुझिया चरणी अर्पियली मी माझी झरणी उमटू दे कविता ।।३।।
काव्य रचनेचा छंद लागूनी, कविता करू लागलो भाव तरंगाना आकार देवूनी, शब्दांत गुंफू लागलो….१, एका मागूनी दुसरी कविता, रचित मी चाललो वही भरता संग्रहाची, आनंदात गुंग झालो…२, अचानकपणे खंत वाटूनी, निराश मी झालो निरर्थक तो वेळ दवडिला, हेच मनी समजलो….३, बोध मिळूनी कुणीतरी सांगे, मूल्यमापन होईल वेडेपणा वा शहाणपणा, काळ हाच ठरवील…४, करूनी घेतले तुज कडूनी, […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions