Web
Analytics
कवितेचे मूल्यमापन – Marathisrushti Articles

कवितेचे मूल्यमापन

काव्य रचनेचा छंद लागूनी,  कविता करू लागलो
भाव तरंगाना आकार देवूनी,  शब्दांत गुंफू लागलो….१,

एका मागूनी दुसरी कविता, रचित मी चाललो
वही भरता संग्रहाची, आनंदात गुंग झालो…२,

अचानकपणे खंत वाटूनी,  निराश मी झालो
निरर्थक तो वेळ दवडिला,  हेच मनी समजलो….३,

बोध मिळूनी कुणीतरी सांगे, मूल्यमापन होईल
वेडेपणा वा शहाणपणा,  काळ हाच ठरवील…४,

करूनी घेतले तुज कडूनी,  कोणत्या तरी शक्तीने
कर्तेपणाचा भाव तुझ्यातील,  सोडून दे तू मनाने….५,

असेल हे जर कृत्य त्याचे,  काळजी त्याला यशाची
सैनिक तू लढत रहावे,  आशा सोडून जिंकण्याची….६

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 

 

 



About डॉ. भगवान नागापूरकर 1193 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सिंधूदुर्गाच्या संरंक्षणासाठी बांधलेला किल्ले पद्मगड

सिंधुदुर्गाचे महत्त्वाचे भौगोलिक स्थान ओळखून शिवरायांनी याच्या संरक्षणासाठी मालवणच्या सागरतीरावर ...

डोंबिवलीतील ग्रंथालय व वाचनालये

सुशिक्षितांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंबिवलीत अनेक समृद्ध ग्रंथालये आणि ...

बिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापुर

कोल्हापुर शहराच्या महाद्वार रस्त्यावर हे मंदिर आहे. याला बिनखांबी गणेश ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवतीचा किल्ला

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे असलेला निवतीचा हा किल्ला पर्यटकापासून बराच दूर आहे ...

Loading…