नवीन लेखन...

घाणे

आधी मूळ धाडा अष्ट गणेशांना इच्छिल्या कार्याला शुभारंभ । आधी मूळ धाडा बापुजी देवाला घरच्या कार्याला हातभार । आधी मूळ धाडा कार्ला गडावरी बैसोनी अंबारी येई माते । आधी मूळ धाडा सप्तश्रुंगावरी भगवतीची स्वारी येई कार्या । आधी मूळ धाडा कृष्णेला वाईच्या मान आजोळीचा आहे तिचा । आधी मूळ धाडा जेजूरी खंडेराया बहिणीच्या कार्या पाठी उभा […]

खरा एकांत

निसर्गाचा अप्रतिम ठेवा,   नदीकाठच्या पर्वत शिखरीं  । बाह्य जगाचे वातावरण,   धुंदी आणिते मनास भारी  ।।१।।   त्याच वनी एकटे असतां,   परि न लाभे एकांत तुम्हांला  । चित्तामध्यें वादळ उठतां,   महत्त्व नव्हते बाह्यांगाला  ।।२।।   खडखडाट सारा होता,    दैनंदिनीच्या नित्य जीवनी  । समाधानी जर तुम्हीं असतां,   शांतता दिसते त्याच मनीं  ।।३।।   एकांततेची खरी कल्पना,   मनावरती अवलंबूनी  […]

बहिणीची एक इच्छा

विसरू नकोस मजला    माझ्या भाऊराया नाते अतूट असते      घे, हे समजुनिया आठव सारे बालपण     कसे गेले खेळांत भांडत होतो, रुसत होतो    सारे केले प्रेमांत ओवाळणीची तुझी सुपारी     ठेवली मी जपुनी आठवण होता तुझी मजला    काढून बघते पेटीतुनी जाणीव  आहे मजला      संसार  जीवनाची कर्तव्ये पडली शिरावरी    तुझाच संसाराची खूप प्रेम दे वाहिनीला    संसार कर सुखाने काढून ठेव अल्पसे प्रेम   देण्या मज त्या साठ्यातुनी वर्षातून  एके दिवशी    बांध राखी प्रेमाची […]

गणेश वंदन

गजानना तू स्फूर्तीदाता तू सकलांचा विघ्नहर्ता ।।धृ।। वक्रतुंड लंबोदर मूर्ती परशु विराजे एका हाती दुजा वर देता ।।१।। पितांबर शिरी मुकुट शोभतो जास्वंदी दुर्वांनी सजतो मोदक आवडता ।।२।। विनम्रभावे तुझिया चरणी अर्पियली मी माझी झरणी उमटू दे कविता ।।३।।

कवितेचे मूल्यमापन

काव्य रचनेचा छंद लागूनी,  कविता करू लागलो भाव तरंगाना आकार देवूनी,  शब्दांत गुंफू लागलो….१, एका मागूनी दुसरी कविता, रचित मी चाललो वही भरता संग्रहाची, आनंदात गुंग झालो…२, अचानकपणे खंत वाटूनी,  निराश मी झालो निरर्थक तो वेळ दवडिला,  हेच मनी समजलो….३, बोध मिळूनी कुणीतरी सांगे, मूल्यमापन होईल वेडेपणा वा शहाणपणा,  काळ हाच ठरवील…४, करूनी घेतले तुज कडूनी, […]

मैत्रीला निरोप

शाळा कॉलेजचे सहजीवन संपते आणि निरोप देण्या-घेण्याची वेळ येते तेंव्हा मनाची घालमेल होते. जुन्या त्या आठवणींनी सुचलेल्या काही ओळी… मैत्रीला निरोप […]

बाह्य अडथळे

एकाच दिशेने जातां,    प्रभू मिळेल सत्वरी रेंगाळत बसा तुम्हीं   गमवाल तो श्री हरी तुम्ही चालत असतां,   अडथळे येती फार चालण्यातील तुमचे,   लक्ष ते विचलणार ऐश आरामी चमक,  शरिराला सुखावते प्रेम, लोभ, मोह, माया,  मनाला ती आनंदते शरिराचा दाह करी,   राग द्वेष अहंकार मन करण्या क्षीण,  षडरिपू हे विकार सुख असो वा ते दु:ख,   बाह्यातील अडथळे सारेच […]

दिलासा

ज्योतिष्याची चढूनी पायरी,   जन्म कुंडली दाखवी त्याला  । अडले घोडे नशिबाचे,   कोणते अनिष्ट ग्रह राशीला  ।।१।।   नशिबाची चौकट जाणूनी,    आशा त्याची द्विगुणित झाली  । मनांत येतां खात्रीं यशाची,   जीव तोडूनी प्रयत्ने केली  ।।२।।   प्रयत्नांती असतो ईश्वर,    म्हणूनी मिळाले यश त्याला  । आत्मविश्वास जागृत करण्या,   ‘भविष्य’ शब्द  कामी आला  ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

दुःख

दुःख असे मानव निर्मित जाणती हे सगळे परि दुःखात शोक करिती हे कुणा न कळे   ।।१।। आपण कर्म केलेले आपणचि भोगतो फळ कर्माचे आलेले तेच आपण चाखतो   ।।२।। आहे तुजसी हे ज्ञान माहीत सर्वाना खंत द्यावी सोडून नको दाखवूं भावना   ।।३।। इतरांसाठीं आहे ती भावना  उदरीं सहानुभूती पाहे इतर जनांचे पदरी   ।।४।। शोक भावना दाखवी तुझ्या […]

गझल

गझल वृत्त :- आनंदकंद समजून देव ज्यांना मी पूजले कितीदा देवून दु:ख त्यांनी मज रडवले कितीदा आलीच ना कधी ती भेटायला मला पण स्वप्नातही तिने मज झिडकारले कितीदा नादात मी गझलच्या समृद्ध फार झालो सौख्यास या अनोख्या उपभोगले कितीदा युद्धात सांडलेल्या रक्तास पाहताना जिंकूनही स्वतःला धिक्कारले कितीदा भेटेल ती उद्याला सोडू नकोस आशा या बावऱ्या मनाला […]

1 255 256 257 258 259 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..