नवीन लेखन...

संतुलन

आकाशीं सुर्य तळपला   तेजस्वी त्याची किरणें तप्त करुनी जमिनीला   वाळून टाकी जीवने   ।।   नभीं मेघ आच्छादतां    रोकती रविकिरणे तुफान पर्जन्य पडतां   महापूर त्याचा बने   ।।   सुटतां भयंकर वारा   निघून जाती ढग प्रचंड वादळाचा मारा   पर्जन्य कसे होईल मग   ।।   वादळास अडविती पर्वत   वलय त्याचे रोकूनी सारे करिती मदत   आनंदी करण्या धरणी   ।।   […]

शनिवारचं साहित्य : अव्यक्त…

तुझा ऑफिस मधला तो शेवटचा दिवस होता हात खांद्यापर्यंत वर उचलत आणि हालवत तू माझ्याकडे पहिलं, हसलीस आणि हळू आवाजात म्हणालीस “बाय” मीही तुझ्याकडे पहिलं हात खांद्यापर्यंत वर उचलत आणि आतल्या आवाजात म्हणालो “बाय” मी पूर्णपणे व्यक्त होऊ शकलो नाही चूक माझीच होती नंतर बर्याहच दिवसाने बस थांब्यावर तू अचानक भेटलीस तू अगदी फुललेल्या चेहर्याथने हासत […]

विजेचे दुःख

लपकत आली कडकडाट करुनी गेली प्रकाशमान केले जगासी सारुनी दूर अंधारासी भयाण होता अंधःकार लख्ख प्रकाश देई आधार घेई सर्वांच्या मनाचा ठाव भिती असूनही, प्रसन्न भाव करुनी शक्तीचे भव्य प्रदर्शन निर्माण झाला मनी अभिमान परि दुःखी होते तीचे मन ‘क्षणिक’  लाभले तिला जीवन   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.com      

पक्षी – मुलातले प्रेम

स्वैर मनानें भरारी घेई,  पक्षी दिसला आकाशीं स्वछंदामध्यें विसरला तो,  काय चालते पृथ्वीशीं…१, एक शिकारी नेम धरूनी,  वेध घेई पक्षाचा छेदूनी त्याचा एक पंख,  मार्ग रोखी उडण्याचा…२, जायबंदी होवूनी पडला,  खालती जमीनीवरी त्वरीत उचलून पक्षाचे,  पाय बांधे शिकारी….३ ओढ लागली त्यास घराची,  भेटावया मुलाला आजारी असूनी पुत्र त्याचा,  चिडचिडा तो झाला…४, चकित झाला बघूनी मुलाला,  अंगणी […]

दोष नव्हता तिचा…

दोष नव्हता तिचा अन् वाट ही नव्हती ती चुकली बदमाशांच्या जाळ्यात अनाहुतपणे होती फसली उन्मत्त नशेने माजून ते सैतान झाले होते विकृत ओंगळ भावनेला पूरूषार्थ समजत होते मनावरच्या आघाताने जरी नव्हती ती खचली आत्मसन्मानाची लढाई जिंकू नव्हती शकली विधात्यालाही नाही कळले  विकृत हवस ती कसली नीच त्या नराधमांनी माणूसकीलाही भोसकली आंधळ्या त्या न्यायदेवतेला होते सारे स्पष्ट […]

मेणबत्ती

जळत होती मेणबत्ती ती,  मंद मंद प्रकाश देवूनी अंधकार भयाण असतां,  भोवताली उजेड पाडूनी…१, बुडत्यासाठी काडीचा आधार, अंधारी भासली तशी प्रकाशीं असूनी ज्योत मिणमिणती,  त्या क्षणी वाटला सूर्य आकाशी….२, वाटत नाहीं मूल्य कुणाला,  भरपूर पडल्या प्रकाशाचे मेणबत्तीची ज्योत आम्हांला, शिकवी साधे तत्त्व जीवनाचे   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

आजी

विसरले जाणे येणे विसरले गणगोता माझिया सोनुल्याची फक्त आजी आहे आता ।। माझिया….. दिन उगवतो माझा त्याच्याच आवाजाने दिन मावळे रात्रीला त्याची अंगाई गाता गाता ।। माझिया….. आठ वाजले का बाई झाली दूधाची गं वेळ जीव होई कासावीस वेळेवरी आटोपता ।। माझिया….. दहा वाजले जाहली आंघोळीची त्याची वेळ आता वाजणार भोंगा जरा साबण लावता ।। माझिया….. […]

सूर्योदय

प्रभात झाली रवी उगवला दाही दिशा उजळल्या रात्रीचा अंधार जावूनी नवीन आशा अंकूरल्या   १   बरसत आहे सूर्यकिरणे पृथ्वीच्या भूतली आनंदाने पुलकित होवून धरणीमाता शहारली   २   निघूनी गेला रात्रीचा गारवा त्याच्या आगमानाने उल्हासीत होवून प्राणी जीवन नाचत राही ऊबेने   ३   पुनरपि आता झाले सुरु चक्र जीवनाचे मिळवू आज काही तरी किरण चमकती आशेचे    ४ […]

संमेलन

सम्मेलन भरली गेली पाहिजेत एकमेकांना मीठी मारून रडण्यासाठी एकमेकांना मीठी मारून हसण्यासाठी एकमेकांची सुख दुःख जानून घेण्यासाठी I सम्मेलन भरली गेली पाहिजेत जातिवाद मिटवण्यासाठी धर्मवाद मिटवण्यासाठी एकमेका बद्दलचे द्वेष मिटविण्यासाठी l सम्मेलन भरली गेली पाहिजेत सर्व धर्म समभावासाठी अज्ञानाचा अंधकार मिटविण्यासाठी गुणी गोविंदाने कसे रहावे ते सांगण्यासाठी l केवळ आपला मोठेपणा मिरविने स्वताचा मान सम्मान कमवीने […]

अणूतील ईश्वर

पदार्थाचे गुण जाणता,  एक गोष्ट दिसून येती, सूक्ष्म भाग अणू असूनी,  त्यांत सुप्त शक्ती असती…१, ह्या शक्तीची तीन रुपे, तीन टोकावर राही, अधिक उणे नी सम,  विद्युतमय प्रवाही….२, हेच तत्त्व त्या प्रभूचे,  तीन गुणांनी बनला, उत्पत्ती लय स्थीती,  यांनी सर्वत्र व्यापला…३, ब्रह्मा विष्णू महेश,  प्रतिकात्मक ही रुपे अणूरेणूच्या भागांत,  समावताती स्वरूपे…४, याच विद्युत शक्तीला,  चेतना म्हणती […]

1 248 249 250 251 252 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..