नवीन लेखन...

उमलणारी फुले

चोर पावली येता तुम्हीं,  साव असूनी खऱ्या फुलराण्या स्वर्गामधल्या,  नाजुक नाजुक पऱ्या ।।१।। निद्रिस्त जेंव्हा विश्व सारे,  संचारी भुमंडळीं स्वागता रवि उदयाचे,  उमलताती सकाळीं ।।२।। चाहुल न ये कुणासी,  तुमच्या अगमनाची प्रफुल्लतेनें मन देते,  पोंच सौंदर्याची ।।३।। आकर्शक ते रंग निराळे,  खेची फुलपाखरें मध शोषण्या जमती तेथे,  अनेक भोवरे ।।४।। सुगंध दरवळून वातावरणीं,  प्रसन्न चित्त करी […]

चिमुकल पाखरू

चिमुकल पाखरू आल माझ्या आगनी जन्म घेऊन माझ्या घरी वाढवल मी लाडाणी शाळा शिकवली मी तिला गुणवान बनवले न्यानाने, मुलगी असली तरीही मुलाची कमी कधी भासत नाही मला तिचे हसने ,तिचे खेळने हाच आधार माझ्या जिवनाला जानार लग्न करुन मला सोडुन घोर लागला या गरीब बापाच्या मनाला चिमुकल पाखरु आल माझ्या अंगनी. — आर. एस्. शिरसाठ […]

धुळ साचते

धुळ साचते पुस्तकावर,टि.व्ही.वर खिडक्यांवर,दारावर आणि कुलुपावर धुळ करते कब्जा सार्‍यांवर… किती दिवस झालेत माणसांचा घरात नाही वावर घरमालक मस्त गेलाय फिरायला घर सोडून वार्‍यावर…. धुळ पसरते चादर सार्‍या वस्तूवर आणि कुणी आलंच तर ठसे उमटणार घरभर ठेवते नजर चोरावर.. धुळंच सांभाळते सारं घर तुम्ही घरी नसल्यावर… — श्रीकांत पेटकर (मागील वर्षी आजच्या दिवशी.. १०/१०/२०१७ला केलेली कविता […]

मुलाचा पाळणा

माझा गं बाळ राजा, पाळणी खेळतसे पैंजण वाजतसे, त्याच्या पायात छमछमा । माझा गं बाळ राजा, घरात रांगतसे मनगटी रूततसे, त्याच्या हाताला सांभाळा । माझा गं बाळ राजा, पाऊल टाकतसे सोनसरी चमकतसे, त्याच्या गळ्यात चमचमा । माझा गं बाळ राजा, दुडूदुडू धावतसे साखळी रूळतसे, त्याच्या कमरेत रुणझुणा । माझा गं बाळ राजा, भुकेचा हळूवार भरवते खीर, […]

ढोंगी साधू महाराज

सोडत नसतो केव्हाही,  निसर्ग आपुल्या मर्यादा, चमत्कार तो करीत नसतो, नियमित चालतो सदा   १ साधूबाबा महाराज ते    कित्येक आहेत ह्या जगती नांव घेवूनी प्रभूचे     चमत्कार दाखविती   २ अज्ञानाने भरलो आम्ही, विश्वास वाटतो त्यांचा चमत्कार दाखविण्यामध्ये    हात नसतो प्रभूचा    ३ तो तर महान असूनी     क्षुल्लक त्यासी ह्या गोष्टी प्रेमभावना घेण्या तुमच्या     कशास पडेल तो कष्टी   ४ नष्ट […]

मी स्वतः ला शोधत असतो

कविता तीही लिहित असते कविता मीही लिहित असतो ती चंद्र- चांदण्यांची बात करते मी स्वतः ला शोधत असतो ती जर चंद्र – चांदण्यांतून हटली मी जर स्वत:मधून निघालो तर तिला मी दिसेल आणि मला ती त्यानंतर दोघांच्याही भावना उलगडत जातील एकमेकांना जे कधीच आजपर्यंत दोघांकडूनही बोललं गेलं नाही जे तिच्याही मौनप्रेमातून हरवलं जे माझ्याही निशब्दतेतून निसटलं […]

जीवन गुलाबा परि

जीवन असावे गुलाबा सारखे सहवासे ज्याच्या मिळताती सुखे….१, सुगंध तयाचा दरवळत राही मनास आमच्या समाधान होई….२, नाजूक पाकळ्या कोमल वाटती सर्वस्व अर्पूनी गुलकंद देती…३, विसरूं नका ते काटे गुलाबाचे बसती लपूनी खालती फूलाचे….४ , सुखाचे भोवती सावट दु:खाचे जीवन वाटते झाड गुलाबाचे….५   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com      

जातीच्या पल्याड …

गोचिड जसा जनावराचे रक्त पितो तसे माझ्या देशाचे रक्त पीतेस रक्त पिऊन तर्र ..झिण्गाट झालीस … सोड ना आता तरी आमचा पिच्छा किती दिवस छळणार आहेस तूझच वेसण लागलय आख्ह्या देशाला .. तू जल्मताच आम्हाला चिटकटेस सोडून जातात ग नाती – गोती पण तू मेल्यानन्तरहि पीछ्या सोडत नाहीस मी मेल्यानंतर माझ्या मुलाला चीतकतेस .. जुळलेल्या मनाची […]

डोहाळे जेवण

ओटी भरण आज कौतुकाचे हवे नको काय ते तूच सांगायचे ओटी भरण आज कौतुकाचे ।।धृ।। शालू हिरवा जरतारी काठ चंदनाचा पाट पक्वान्नांचे ताट श्रीखंड खिरीला रंग केसराचे ।।१।। मोगरा अंबोली, दवणा मरवा, रूपाराणीला या, मखरी मिरवा, मुखावरी तेज विलसे गर्भाचे ।।२।। सुगंधित वाळा, उटी चंदनाची हौस पुरवा फळांची फुलांची, डोहाळे जेवण रात-चांदण्यांचे ।।३।। कौसल्येचा राम, देवकीचा […]

नवरात्रीचे नवरंग

नवरंग नवरात्रीचे ! प्रतीक शक्ती-भक्तीचे !! पिवळा रंग सोन्याचा ! शुद्ध तेजस क्षणांचा ! हिरवा रंग सृष्टीचा ! वृध्दी,सुख-समृध्दीचा !! करडा रंग भाग्याचा ! निरामय आरोग्याचा !! केशरी रंग निर्मितिचा ! राजमंगल पताकांचा!! पांढरा रंग शांतीचा ! एकोपा अन मैत्रीचा !! लाल रंग कुंकवाचा ! सर्व मांगल्य मांगल्याचा !! निळा रंग अस्मानाचा ! निर्मळशा हृदयाचा !! […]

1 250 251 252 253 254 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..