नवीन लेखन...

लाटांचा न्यारा स्वभाव

लाटांचा न्यारा स्वभाव ,उंच उंच उचंबळती, खडी एक भिंत बनवत, सागरात उभ्या राहती, थेंबांची नक्षी हालती, पुढेमागे होती मोती,–!!! पुन्हा पुन्हा खेळत खेळत , मजेत धुंदीतनाचत– नाचत, एकमेकींवर आदळत आपटत, किती संख्येने उभ्या राहती,–!!! सागर मात्र शांत राही, लेकींचा आपल्या खेळ पाही त्याचीच मजा लुटत लुटत, कसा काय तटस्थ राही,–!!! शांतता धीरगंभीरता, आणतो तरी कुठून एवढी, […]

शेतकरी प्रीमियर लीग

सदरची कविता कोणावर टीकाटिप्पणीसाठी नसून शेतकऱ्यांच्याबद्दल वाटणाऱ्या दुजाभावाबद्दल आहे याची कृपया नोंद घ्यावी […]

सत्य, अहिंसा, साधी राहणी

सत्य, अहिंसा, साधी राहणी, महात्मा गांधींची विचारसरणी तत्वांची सगळ्या किती हेटाळणी, ‌ कोण आणतो सांगा आचरणी, –!!! असत्याच्या आधाराने, हिंसक, मारक, वर्चस्वाने, वागतात पोकळ दिमाखाने, राष्ट्रपुरूषाची मनोरथे”च निराळी,-! स्वातंत्र्याचा वाईट अर्थ, सगळे स्वैराचाराचे भक्त, माणसाचे वागणे नि:सत्व, गांधींच्या तत्वांना तडा जाई,–!! सोदाहरणाने राष्ट्रपित्याने, स्वच्छतेचा मार्ग शिकवला, आम्ही घाणीच्या बुजबुजाटाने, समतोल निसर्गाचा बिघडवला,-! घर , गाव शहर […]

कवच

आघात होवूनी परिस्थितीचे,  सही सलामत सुटत असे संकटाची चाहूल लागूनी,  परिणाम शून्य तो ठरत असे…१ दु:खाची ती चटकती उन्हे,  संरक्षणाची छत्री येई कोणती तरी अदृष्य शक्ती,  त्यास वाचवोनी निघून जाई….२ दूर सारूनी षडरिपूला,  मनावरती ताबा मिळवी प्रेमभाव तो अंगी करूनी,  तपशक्तीला सतत वाढवी…३ तपोबलाचे बनूनी कवच,  फिरत होते अवती भवती दु:खाचे ते वार झेलूनी,  रक्षण त्याचे […]

पाहताना तुला मनात

पाहताना तुला मनात,बिंब डोळियांत हाले, सामावत साऱ्या चरांचरांत, हृदयात प्रेमपक्षी बोले,–!!! जिथे तिथे तू दिसतेस, खाणा-खुणा तुझ्याच ना, गंधखुळा वेग मनाचा, प्रीत पाखरू उडतेच ना,-!!! काळजातच तुझे अस्तित्व, जिथे पाहतो तिथे तू, हसून बोलाविशी मला, जशी खूण करून तू ,–!!!! तुझ्या गाली पडे खळी, गोड गुलाबी रंग तिचा, पाहून तुला कोलमडती, मी एकटाच का तसा,–!!! कुठून […]

चल, चांदण्यांची सैर करू

चल, चांदण्यांची सैर करू, अंबरी, ढगां-ढगांत विहरू, कडेकडेने मेघांच्या,जाऊ, हळूच,मऊ मऊ दुलईत शिरू,-!! मिचकावून डोळे आपुले, चांदण्यांची वरातच पाहू, सुंदर चमचमत्या प्रकाशात, त्यांची आभा नीट न्याहाळू,–!! काळ्याशार गालिच्यावर नभांत, वावरते प्रकाश–झोत पाहू, इकडून तिकडे हलत्या प्रवासी, चंद्राचीही धांदल बघू,—!! कोण त्यांच्यात अधिक सुंदर, मनी मानसी स्पर्धाच लावू, चंद्राचा मुखडा लोभसवाणा, पाहून आपण अचंबित होऊ,–!! धरेवर ती […]

रंग पहा नभांगणात

रंग पहा नभांगणात,रोज कसे जमतात, एकत्र येऊन फिरतात, पंचमी साजरी करतात,–!! निळेशार राखाडी पांढरे, मेघांची लगीनघाई, इकडून तिकडे जाती कुठे ? बघणाऱ्यांना ठाऊक नाही,–!!! प्रभात काळी एकेक रंग, उषा क्षितिजावर उधळते, पिवळे निळे काळे तांबडे, त्यात सोनसळी भर असे,–!!! कुठून येई,लख्ख प्रकाश , खजिनाच वर वर येई, ढगांआडून प्रकाशदाता, सगळ्यांना आपुले दर्शन देई,–!!! सकाळ होता राज्य […]

काळजाच्या भेटी

काळजाच्या भेटी, आलीस सई गाठी, खूण पटता आत्म्यांची, किती आनंदी दिठी,–!!! ||१|| काळजाच्या भेटी आलीस सखे राती पूर गप्पांचा येता , वाढत जाय भरती,–!!! ||२|| काळजाच्या भेटी , आलीस मैत्रिणी, जिवांचे दुवे सांधीत, घट्ट हृदयाची नाती,–!!! ||३|| काळजाच्या भेटी, आलीस सये पाठी, सुखदुःखांच्या हिंदोळी, दोघी बसू एकाच झुली,–!!! ||४|| काळजाच्या भेटी , आलीस तू सहेली, सह […]

काळ घेई बळी

जात असता गाडी मधूनी,  दुर्घटना ती घडली अचानकपणे एक दुचाकी, आम्हा पुढे धडकली प्रयत्न होऊनी योग्य असे, थोडक्यात निभावले वखवखलेल्या काळालाही, निराश व्हावे लागले. घिरट्या घालीत काळ आला,  झडप घातली त्याने वेळ आली नव्हती म्हणूनी,  बचावलो नशिबाने अपमान झाला होता त्याचा,  सुडाने तो पेटला थोड्याशाच अंतरी जावूनी,  दुजाच बळी घेतला. डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

काजळी धरल्या वाती

तेवत होती ज्योत दिव्याची, प्रकाश देवूनी सर्व जनां आनंदी करण्या आनंद वाटे, तगमग दिसे तिच्या मना, शांत जळते केंव्हां तरी,  भडकून उठते कधी कधी फडफड करित मंदावते,  इच्छा दाखवी घेण्या समाधी जगदंबेच्या प्रतिमेवरती,  प्रकाश टाकूनी हास्य टिपते हास्य बघूनी त्या देवीचे,  चरण स्पर्शण्या झेपावते अजाणपणाच्या खेळामधली,  स्वप्न तरंगे दिसूनी येती दिव्यामधले तेल संपता,  काजळी धरल्या दिसे […]

1 211 212 213 214 215 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..