मेघ गर्व हारण

अंहकाराचा पेटून वणवा,  थैमान घातिले त्या मेघांनी

तांडव नृत्यापरि भासली,  पाऊले त्यांची दाही दिशांनी…१,

अक्राळ विक्राळ घन दाट,  नी रंग काळाभोर दिसला

सूर्यालाही लाजवित असता,  गर्वपणाचा भाव चमकला…२,

पृथ्वीवरती छाया पसरवूनी,  चाहूल देई आगमनाची

तोफेसम गडगडाट करूनी,  चमक दाखवी दिव्यत्वाची…३,

मानवप्राणी तसेच जीवाणे,  टक लावती नभाकडे

रूप भयानक बघून सारे,  कंपीत त्यांची मने धडधडे…४,

त्याच वेळी वादळ सुटूनी,  देह घनाचा टाकी विखरूनी

गर्व हरण होऊन जाता,  अश्रू पडती नयनामधूनी….५

 

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1528 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…