नवीन लेखन...

विस्तीर्ण समुद्र किनारी

विस्तीर्ण समुद्र किनारी, फिरत फिरत निघाले, वाळूत चालताना ठसे, पावलांचे उमटलेले, –!!! दूर क्षितिजी सूर्यबिंब, घाईत होते चालले, रंगांची आरास पाहून, अचंबित की झाले,–!!! ढगांमागून निघाला, संधिप्रकाश आता, दिसू लागला धरणीवर, पखरुन घातलेला, –!!! याच ढगांवर स्वार होऊन, निघाला सोन्याचा गोळा, आभाळाला सप्तरंगी, आज साज चढवलेला,–!!! किती रंगांची रासक्रीडा, गगनी होती चाललेली, चकित होऊनी धरा, कशी […]

मोहमाया दलदल

दलदल होता चिखल मातीची,  पाय जाती खोलांत प्रयत्न तुमचे व्यर्थ जाऊनी ,  न होई त्यावर मात…१, सावध होवूनी प्रथम पावूली,  टाळावे ते संकट मध्यभागी तुम्ही शिरल्यानंतर,  दिसत नाही वाट….२, मोह मायेची दलदल असती, सदैव भोवताली चुकूनी पडतां पाऊल तुमचे, खेचला जातो खाली…३, जागृतपणाचा अभाव असतां,  गुरफूटूनी जातो मोहमायेच्या आकर्षक गुणाला,  बळी तोच पडतो….४, वेगवान त्या जीवन […]

अबोलीची केशरी वेणी

अबोलीची केशरी वेणी, नेसले केशरी साडी, अस्सल सोन्याने मढले ग, जसा जाईचा जणू बहरच ग, केशरी सुंदर टिळा लाविते, मोगऱ्याचे फूल केशी ग, भोवती दरवळ भारते ग, टपोरे मोतीच पेडी गुंफते ग, हाती गुलाब घेऊन माझ्या, प्रियाची वाट मी पाहते ग, गुलाब प्रतिक ना प्रेमाचे, गुलाबी पाकळ्या गाली ग,–!!! लाजलाजूनी म्हणते मग, कोण त्यांचा खरा वाली […]

मद, मोह, क्रोध, वासना

मद, मोह, क्रोध, वासना शरीरांतर्गत किती भावना,माणूस नावाची जादू भारते, नेहमीच मज हे दयाघना,–!!! लोभ मत्सर इर्ष्या नीचता, माणसातही आढळते क्रूरता, संपून माणुसकी, वृत्ती दानवी, दाखवतो आपली बा हीनता,–!! तरीही माणूसपण असते, एखाद्या सज्जन हृदयात, माणुसकीचे महत्व जाणे, कितीही असेल संकटात,–!! असा सज्जन प्रेम मानतो जगातील मोठी शक्ती, हेच प्रेम असे त्याचे, जगण्याची विशाल उक्ती,–!!! मुके […]

बाळ चिमुकले

बाळ चिमुकले, गोड हासले, रांगत आले , पायाला धरुनी, उभे राहिले, बाळकृष्ण ते, मला भासले, — वदनांतून कोवळे, ध्वनि उमटले, बोबड्या स्वरांनी, मज जिंकीयले, उचलून घेता , कसे आनंदले, हात हलवून , मज कुरवाळले, कोण लहान, मग वाटले, कुशीत त्याच्या, मीच शिरले , हलके हलके, त्याने थोपटले, गा,—गा कर , मज म्हणाले, निश्चिंत जीव,—!!! निश्चिंत मन […]

वेळेचे मूल्य

मूल्य नाही कुणा, तूं दिल्या वेळेचे गमावून टाकी,  जाणूनी फुकाचे….१, लागत नसते,   दाम वेळेसाठीं म्हणून दवडे अकारणा पोटीं….२, वस्तूचे मूल्य ते,  पैशांनीच ठरते समज सर्वांची,  अशीच असते…३, वेडे अहा सारे,   कसे होई मूल्य वेळ जातां मग,  आयुष्य जाईल…४, वेळ दवडतां,   कांहीं न राहते सर्वच जीवन, व्यर्थ तें ठरते….५   — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

दोघे एका डहाळीवरच झुलू

दोघे एका डहाळीवरच झुलू, निसर्गाचे ,देणे किती पाहू, बघ, रसरशीत खाली फळे, दोघे मिळून चवीने खाऊ,–!!! पक्ष्यांची जात आपुली, निसर्गमेवा”आपुल्याचसाठी, मानव त्याचा बाजार मांडे, निसर्गराजा, फिरवी कांडी, एका वृक्षा,– किती फळे, रसाळ,गोड,चविष्ट मधुर, तुझ्यासमवेत स्वाद वाढे, फळ बने आणखी रुचिर, प्रेमसंगत वाढून आपुली, एकमेकांचे उष्टे’ खाऊ,–!! त्यागातच प्रेम असते, सखे, दुनियेस दाखवून देऊ,–!! दोन “सांसारिक” जीव […]

आज मज कळो यावे

आज मज कळो यावे,का रिकामे आपुले आभाळ, अनभिषिक्त प्रेम चांदणे, नाहीसे का आज ओढाळ,–!!! मंदमंद प्रेम प्रकाश, हळूहळू नाहीसा होई, जीवनीचा तम मग, बघ, कसा वाढत जाई,–!!! रोज रोज अमावस, असे कसे चालायाचे, रात्रंदिनी निष्प्रभ खास, चंद्र – चांदणे मज भासे,—!!! अनुभवल्या जिथे पोर्णिमा, चंदेरी धवल लख्ख, तेच प्रेमाभाळ वाटे, धूसर तममय मख्ख,–!!! कुठे गेला माझा […]

हिरवेगार तृणपाते

हिरवेगार तृणपाते, वाऱ्यावर डोलत होते, मजेत इकडून तिकडे, मान करत गुणगुणत होते,— लहान बालिश वय कोवळे, कंच हिरव्या रंगात खुलत, खुशीत झोके घेत होते, बाळां काय ठाऊक असे, किती कठीण असते जगणे-? मौजमजा आणि हुंदडणे, करत करत एकदम कोसळणे वास्तवाशी सामना होतां, भलेभले धुळीस मिळती, हे तर इवलेसे तृणपाते, कितीशी असेल लढाऊ शक्ती,-? कुणीतरी आले तिकडून, […]

सुवर्णचंपक फुलला अंगणी

सुवर्णचंपक फुलला अंगणी, त्याची शोभा उठून दिसे,पिवळी सोनेरी केशरट फुले, फांदोफांदी मोहक जुळणी,-! नजर ठरेना झाडावरी, उन्हाची मजा घेते सावली , ‌ फुलांतून इवले कवडसे, डंवरून कसे झाड फुलोरी,–! वरचा संभार सांभाळत चाफा, खंबीर उभा राही, सोनसळी अभिषेक फांद्यातून मग चालू होई,–!!! फुलां -फुलांतील दरवळ, वाऱ्यावरती मस्त सुगंध, कोणाचाही आत्मा तृप्त, झाड स्वतः तरी तप्त, –!!! […]

1 210 211 212 213 214 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..