प्राणिमात्रा विषयीं दया

चाललो होतो मित्रासह    सहल करण्या एके दिनीं

आनंदाच्या जल्लोषात आम्हीं    गात होतो सुंदर गाणीं   १

 

वेगामध्यें चालली असतां    आमची गाडी एका दिशेने

लक्ष्य आमचे खेचले गेले    अवचित एका घटनेने   २

 

चपळाईनें चालला होता    काळसर्प तो रस्त्यातूनी

क्षणांत त्याचे तुकडे झाले    रस्त्यावरी पडला मरूनी   ३

 

काय झाले कुणास ठाऊक    सर्व मंडळी हळहळली

जीव घेणाऱ्या प्राण्यालाही    सहानुभूती ती लाभली    ४

 

अंत:करणीं दया भाव तो    असतो ईश्ररी गुणधर्म

जीवमात्रीं वसला असूनी    निर्मितो आपसातील प्रेम   ५

 

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1443 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…