दिव्य शक्ति

व्याकूळ झाला जीव प्रभू तुझ्या दर्शना अर्पितो मी भाव तुझीया चरणा //१// तेजांत लपले तुझे दिव्य स्वरुप नयना न जमले टिपण्या ते रुप //२// निनादाच्या स्वरी तुच आहेस संगीत कर्ण अवलोकन न करी ऐकण्या तुझे गीत //३// पुष्पातील सुवास तुंच आहेस सुगंध न येई घ्राणेद्रियास ओळखता तो आनंद //४// मधुर रसाची फळे सर्वात तु बसलास जिव्हेला […]

चंद्राचे कायम स्वरूप

ठेवून पाऊल चंद्रावरी      अभिमान तुला वाटला / मान उंचावूनी आपुली       वर्णन करीता झाला // चंद्र आहे ओबड धोबड      तेथे सारे खडकाळ असे / झाडे झुडपे पशु पक्षी         हवा पाणी कांही नसे // नमुने आणले दगड मातीचे      चंद्रावरी तू जाऊन / शुष्क आहे वातावरण              असेच केले वर्णन // बघितले बाह्य रूप             ह्या रजनीकांताचे / थोटका पडलास तू […]

प्रेम झरा

नाही गेली अटूनी माया, आजही वाहते झऱ्यासारखी, उगांच कां तू खंत करशी, न होशील मज पारखी ।।१।। वाहत असता फुटले फाटे, जीवनातील वळणावरी, जो तो घेई उचलूनी वाटा, नशीबी असेल त्याच्या परि ।।२।। कसा राहील ‘साठा’ आता, मनसोक्त ते जाण्या वाहूनी, तृप्त करील परी तृष्णा तुझी, ओंझळभर घेता पिऊनी ।।३।। कुणीतरी आहे पाठीराखा, आनंदाने  चालत रहा, […]

उमलणारी फुले

चोर पावली येता तुम्हीं, साव असूनी खऱ्या फुलराण्या स्वर्गामधल्या, नाजुक नाजुक पऱ्या निद्रिस्त जेंव्हा विश्व सारे, संचारी भुमंडळीं स्वागता रवि उदयाचे, उमलताती सकाळीं चाहुल न ये कुणासी, तुमच्या अगमनाची प्रफुल्लतेनें मन देते, पोंच सौंदर्याची आकर्शक ते रंग निराळे, खेची फुलपाखरें मधू शोषण्या जमती तेथे, अनेक भोवरे सुगंध दरवळून वातावरणीं, प्रसन्न चित्त करी जागे करीती जगास, चैतन्यमय […]

होळी

आजकाल होळीला मी तिच्या आठवणींच्या रंगा व्यतिरीक्त दुसर्याआ रंगात रंगत नाही तिने तिच्या प्रेमाने माझ्या चेहर्यातवर चढविलेला रंग आजही कशाने फुसला जात नाही त्या रंगावर आता कोणीही कितीही प्रेमाणे रंग लावला तरी तो आता चढतच नाही. का कोणास जाणे आता मला निसर्गातील कोणत्याच रंगाबद्दल आकर्षण वाटत नाही. आता होळी रे होळी ! ओरडत कोणावर प्रेमाने पाणी […]

थांबव, विज्ञाना तुझे शोध

थांब विज्ञाना, नको लावूस शोध नष्ट करुनी भावना, नको गमवू आनंद / धृ / उंच मारुनी भरारी पोहंचला चंद्रावरी दाही दिशा संचारी नष्ट केलास तू , चांदण्यातील आनंद १ थांब विज्ञाना, नको लावूस शोध फुलांतील सुवास फळांतील मधुर रस पक्षांचा रम्य सहवास नष्ट केलास तू, निसर्गातील सुगंध २ थांब विज्ञाना, नको लावूस शोध नदीतील संथता ओढ्यातील […]

1 200 201 202 203 204 237