ठाण्यातील नाट्यसंस्था – कलायतन
या संस्थेने शासनाच्या नाट्यस्पर्धेत अनेक पारितोषिके मिळविली. यशवंत रांजणकर यांच्या ‘जिद्द’ या नाटकाला दिग्दर्शनाचे पारितोषिक, तर अभिनयाचे प्रथम पारितोषिक चंदा रणदिवे यांना मिळाले. त्यानंतर प्र. के. अत्रे यांच्या ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकात मनोहर कारखानीस, उषा गुप्ते यांना उत्कृष्ट अभिनयाची बक्षिसे मिळाली. ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘कवडीचुंबक’ या व इतर अनेक नाटकांचे प्रयोग सामाजिक संस्थांच्या मदतीसाठी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही सादर केले गेले. अशा रितीने या संस्थेने 50 वर्षांपूर्वीच ठाण्यात नाट्यचळवळ यशस्वीरित्या रुजविली. […]
